'ऑनलाइन' ह्या इंग्रजी शब्दातील अर्थ मराठीत कोणत्या शब्दांत व्यक्त झाला आहे अथवा करता येईल?
Please provide context
'ऑनलाइन' ह्या इंग्रजी शब्दातील अर्थ मराठीत कोणत्या शब्दांत व्यक्त झाला आहे अथवा करता येईल?
--
-- आपण 'मराठी अनुवादक' या इ-कट्ट्याचे सदस्य असल्याने आपल्याला हे पत्र पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाचे पत्ते-
सर्व सदस्यांना पत्र पाठवण्यासाठी- marathi-...@googlegroups.com
सदस्यत्व रद्द करण्यासाठी marathi-anuwad...@googlegroups.com
अधिक माहितीसाठी https://groups.google.com/d/forum/marathi-anuwadak?hl=en
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Anuwadak" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to marathi-anuwad...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
दोघांना धन्यवाद.
संदर्भ दिला नाही त्याबद्दल क्षमस्व.
संदर्भ: 'ऑनलाइन कोर्स'. म्हणजे ऑनलाइन हे विशेषण.
संदर्भ सांगितल्यावर सुचवलेले पर्याय बदलू शकतील. तरीसुद्धा, सर्व पर्याय विशेषणरूपी असल्याने, त्यांवर ह्याच पत्रात प्रतिक्रिया देत आहे.
जाल-संजीवित म्हणजे 'जालाने ज्याला संजीवित केले आहे असे ते'? एखादे यंत्र आधीच चालू असेल तर त्याला जालाने संजीवनी दिली आहे असे म्हणता येईल का?
निरंतर-संलग्न हे जालाशी संबंधित आहे असा बोध होत नाही. तो होणे आवश्यक आहे असे वाटते.
संपर्कित हा शब्द प्रस्तुत अर्थाच्या संदर्भात अतिव्याप्त वाटतो. उदाहरणार्थ, जालचा वापर न करता जिच्याशी संपर्क साधला आहे अशी व्यक्ती ही संपर्कित व्यक्ती ठरू शकते.
कंसात मूळ इंग्रजी शब्द लिहीन. सूचनेबद्दल आभार.
एखादा इंग्रजी शब्द मराठीत 'वेल-रिसिव्ड' आहे म्हणजे काय?
तसा असला तर इंग्रजी वापरावा की मराठी?
अनेक इंग्रजी शब्द केवळ मराठी माणसांच्या आळसापोटी मराठीत वापरले जातात. त्यामुळे एखादा इंग्रजी शब्द हा मराठीत वापरणे योग्य की अयोग्य ह्याचा निर्णय केवळ त्या शब्दाचा मराठीतील वापर पाहून करता येत नाही. अशा परिस्थितीत निर्णय कसा करावा?
अनेक प्रतिशब्द/पर्याय दाखवल्याबद्दल धन्यवाद.
पण एखादा प्रतिशब्द/पर्याय योग्य की अयोग्य हे कसं ठरवावं? लांबी, आकलनसुलभता, वापराची वारंवारिता इत्यादी अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरतील. कोणकोणते मुद्दे? कोणत्या मुद्याला किती महत्त्व?
नरेंद्र गोळे ह्यांनी अनेक प्रतिशब्द/पर्याय सुचवले आहेत. प्रत्येक पर्याय कितपत योग्य (वा अयोग्य) वाटतो?