|| वैयक्तिक अनुभव : वेळ नसल्यास, *फक्त बोल्ड वाचा* ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 25, 2024, 5:02:27 AM4/25/24
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव : वेळ नसल्यास, *फक्त बोल्ड वाचा* || 

▪️[ *आदिवासी बोली* : निहरी]
_निंबर आलां का मी भलतीं कलिंगडां खाय. ते दिस चिऱ्या करून खान खान सालपटांचा ढीग केलातां. आंगन्यातुच बसेल तं मुगल्या ना बिया खाया पक्या कोंबडी पिल्लां हो जमलीं, हलूं हलूं सालपटाहों टोचलून खाल्ली. ना मी कलिंगड खपवी तांव बैलां आलीं ना उरेल सगलीं सालपटांहो खाल्लीं त्यांहीं. नांगसीला तं आम्ह्यहिं, मुगल्या, कोंबड्याहीं, बैलाहीं *सगल्याहीं खालां ना काहीं कचरा हो निहि झाला.*_

_सहराला असा नीही. काल कलिंगड आणला तं कापून खाला. लाद्या माखवेल त्या पुसून टाकल्या, सालपटां, बिया गोलाटून कचऱ्यात टाकलां, मंगा कचरा पिसवेत भरून बिल्डिंग चे खालतं नेन ठेवलां म्होटे कचरा पेटित. तथसीं कचऱ्याची गाडी आलीं ना त्यांहीं डम्पिंग ग्राउंड वर नेन टाकलां, तथ जाय जाय तांव वखत झालां का भलतां वास येय, कीड पडत, आजार पसरत. पैसा हो खर्च होय. *जसी जागा तसां रेहेत.*_

▪️[साधारण *मराठी भाषा*] 
माझे वर्षभरातील एक आवडते फळ म्हणजे कलिंगड. संधी मिळाली कि खूप सारे खातो, त्या दिवशी वाघाडी ला घरी मोठे कलिंगड कापून खायला बसलो. अंगणातच बसलेलो तर सोबत मुंग्या, कोंबड्या, पिल्ले पण बिया आणि काही साल खाऊ लागले. कलिंगड संपते तोवर साले बघून बैले आली आणि खूप आनंदाने सगळ्या साली खाऊन टाकल्या. थोड्यावेळाने बघतो तर आम्ही, मुंग्या, कोंबड्या, बैले *सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने कलिंगड खाऊन आनंदी होते, आणि कचराही शून्य होता.*

शहरात असे शक्य नसते. हैद्राबादला आल्यावर पुन्हा कलिंगड खात होतो, खाता खाता सांडलेला रस, बिया, साले साफ करून लाद्या साफ कराव्या लागल्या. ते कचरा पेटित टाकून, नंतर कचरा पिशवीत ठेवून खाली मोठ्या कचरा पेटिट ठेवले. तिथे कचरा गाडी आली आणि डम्पिंग ग्राउंड ला टाकला जातो. या प्रवासात कधी वेळ होते तर कचरा कुजतो, वास येतो, किडे पडतात आजार पसरतात. कुणी तरी हा सगळं कचरा हाताने साफ करते. 

सरळ साधी तीच गोष्ट *ठिकाण बदलले कि पद्धती बदलतात.* प्रत्येक पद्धतीचे त्याचे त्याचे फायदे आणि तोटे असतात. 

▪️[दोन शब्द *सामाजिक*]
सध्याच्या मानव केंद्रित भौतिक विकासाच्या अक्राळ विक्राळ आकारात आपण पर्यावरण, सामान्य माणूस, मानसिक आरोग्य, जीवघेणी स्पर्धा लावून ठेवली आहे यात *तोट्यांची/नुकसानाची यादीच खूप मोठी आहे* असेच वाटते कधी कधी. 

पिढ्या न पिढ्या आदिवासी समूहांनी प्रत्येक्ष अनुभवातून अधिक सुसंगत आणि प्रॅक्टिकल अशी जी जीवनमूल्य समाजात रुजवली आहेत कदाचित त्यासाठीच पर्यावरण, सहजीवन, सामूहिकता, आर्थिक, स्वावलंबन यासाठी आदिवासी जिवन मूल्यांकडे *जग आदर्श उदाहरण म्हणून बघतेय.*

दुर्दैवाने आपले शैक्षणिक अभ्यासक्रम, शाळेतले/समाजातले वातावरण, माध्यमातील आणि सामान्य माणसातील प्रतिमात हे प्रतिबिंबित होत नाही. किंवा त्यापेक्षा विपरीत नकारात्मक प्रतिमा तयार केलेली असते. 

म्हणून आज गरज आहे *नवीन पिढी समोर योग्य ते कन्टेन्ट आणणे.* जे जे आपल्या समाजाच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यासमोर मांडणे. आणि त्यासाठी *पारंपरिक ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, अनुभव, समाजात असलेल्या जाणकार यांची सांगड घालून आपली स्वावलंबी व्यवस्था मजबूत करूया.* अस्तित्व सोबत जीवनमूल्य टिकवून समाजाच्या विविध समस्यांचे *कायमस्वरूपी उपाय समाजातूनच उभे करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव जोहार. आदिवासीत्व. 
....................................................................
💡 *कि वर्ड्स* : सामाजिक/आर्थिक/मानसिक/धार्मिक/अध्यात्मिक/राजकीय/भौतिक कचरा आणि असंतुलनाचे दुष्परिणाम. हरवत जाणारे स्वावलंबन, आदिवासीत्व! https://groups.google.com/g/adiyuva
Reply all
Reply to author
Forward
0 new messages