Sachin Khulat ·इतिहासापासून आपला आदिवासी सहसा उद्योगधंद्यात नव्हताच,मला वाटतं आदिवासी माणसाने व्यापार,उद्याग,व्यावसाय करण्यापेक्षा ग्राहक म्हणूनच जास्त महत्व दिले.त्यामुळे आजहि आपल्या बाजारपेठेत 100%पेक्षा 99%आदिवासी ग्राहक म्हणूनच आपला सहभाग घेतात.त्यामुळे आदिवासीँकडे भांडवल येण्यापेक्षा देणेच झाले आणि आजही करतोच आहे.या बाजारपेठेत आपला आदिवासी एकदम खालच्या दराचा किँवा यांत तो नव्हेच!
आजच्या काळात आपल्या आदिवासीँच्या प्रगतिस मुख्ये कारण म्हणजे धर्मांतरण आणि राजकारण या दोन गाष्टीँमूळे आपला समाज एकदुसऱ्यापासुन विभक्त झाला आहे;आणि दुसरे कारण म्हणजे आदिवासी आदिवासींचा कित्येक फालतु राजकिय पार्ट्यामुळे एक-दुसऱ्यांचा दुश्मन झाला आहे.पण या दोन गोष्टिँवर लक्षपूर्वक विचार केला तर यात मुख्ये तोटा आदिवासींचाच होतो.आणि तसं पाहिलं तर आजच्या जागरुत आदिवासींनी असल्या गोष्टित सहभाग घेणे म्हणजे आजच्या पिढिचे सर्वात मोठे गुन्हेगार ठरने होय.हे लक्षात ठेवा!!!
शहर सोडाच पण आपल्या जवळच्या नाक्यांवर,चौकांत,बाजारात परराज्यातुंन आलेल्या परप्रांतीयांचे राज्य आहे.हे व्यवसाय येथे करतात त्यांमूळे यांची पिढीशुध्दा येथेच वाढते आहे.भरभराटिने वाढत असलेल्या परप्रांतीय प्रतेक गोष्टि येथे मिळवत आहेत.यांचा समाज वाढला कि हळूच एखादा राजकारणात डोकेवर काढतो.मग काय कित्येक मांगण्यात तो आपले हात घालुंन पाहतो व याचा फायदा त्यांना मिळतोच.उदा.-घेतले तर राशनकार्डवर आता आपल्या आदिवासी माणसांना धान्य-वस्तू कमी-जास्त होते.या परप्रांतीयांच्या रेशन कार्डा मुळेच.म्हणजे आपल्या आदिवासींचे राशन हे आज परप्रांतीयांच्या घरात जाते आहे,त्यांना योग्य त्या सोईसवलती आपल्या गावठणीत येऊन मिळवतात येथे आपल्या आदिवासी समाजात परप्रांतीय पोशला जातो हे कधी कळनार!
आपल्या जमिनी मिळवतोय.उद्या ते वाघ बनुन राजकारणाच्या नावाने पुर्ण समाजात घुसतील.आणि आपल्या आदिवासी जातियतेचा फडसा पडेल,तेव्हा कळेल!
नाक्यावरच्या प्रत्येक मार्केटवर त्यांचाच झेँडा फडकतोय.भाजी मार्केट त्यांच्याकडे,हॉटेल्स त्यांच्याकडे,धान्यमार्केट त्यांच्याकडे,कपडा मार्केट त्याच्याकडे,पेट्रोलपंप त्यांच्याकडे,थिएटर त्याँच्याकड,पुर्ण बाजारपेठ हि त्यांच्याकडे आहे.आपला आदिवासी व्यापारत मात्र शुन्य(0)आहे.हा सर्व व्यापार त्यांच्याकडे आहे म्हणून ते राजे आहेत आणि आपण स्वत:वर आढवून घेतलेला गरिबपणा.
'आज नाहिँ तर कधिच नाहिँ'या मुळ वचणावर भर देवून आपण आदिवासी माणसाने मार्केट मध्ये जरुर उतरावे व उतरलेच पाहिजे!!
मला आपल्या आदिवासी लोकांची हॉटेल बघायची आहेत,त्या हॉटेलमध्ये एखादा परप्रांतीय माणुस टेबल साफ करताना मला बघायचा आहे,धान्य मार्केट,कपडा मार्केट तसेच पुर्ण बाजारपेठेत आपलाच माणुस बघायचा आहे.तेव्हा समजेल कि हा आदिवासी मोठा झाला म्हणून आणि आपले गमवलेले राज्य परत मिळवले म्हणुन.......!!!!