|| माहितीसाठी : *स्थानिक नोकरभरती* ||
अनुसूचित क्षेत्रात १७ पदांवर नवीन भरतीत १००% स्थानिक आदिवासींची भरती करावी असा राज्यपालांच्या अध्यादेश आहे.
या प्रमाणे या पदावर सध्या कार्यरत असलेल्यांचे *जातीनिहाय प्रमाण, रिक्त पदे, अध्यादेशानुसार आज पर्यंत भरलेली पदे, पुढील १० वर्षांत पदवारी लागणारी संख्या*, इत्यादी माहिती काही महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागितलेली होती.
सदर अर्ज अनेक विभागांकडे फिरून फिरून शेवटी सामान्य प्रसाशन विभागात गेला. आणि तिथून उत्तर मिळाले या विभागात *सदर माहिती उपलब्ध नाही*.
सदर विषयात आपण अपील दाखल केले त्याची सुनावणी २०/१०/२०१८ रोजी मंत्रालयात सामान्य प्रसाशन विभागाचे उपसचिव करपाते यांच्या सोबत आहे. आयुश तर्फे सचिन सातवी सहभागी होत आहेत.
________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | ९२४६३६१२४९