* * ज्याची त्याची भाषा. देवदत्त, मोठा गहन विषय घेतला आहेत. यावर माझे प्रामाणिक मत - ज्याला जी भाषा समजते तीच बोलावी. इथे हक्काने कचरा टाकणारा भारतीय माणुस सिंगापुरात मत्र डोळ्यात तेल घालुन स्वतःला आणि पोराबाळाना जपतो, कारण त्याला माहीत आहे कि घाण करताना सापडला तर मुंबै - सिंगापुर तिकिटा इतकी रक्कम वसूल केली जाईल. अर्थात तिथे परिसरही इतका स्वच्छ असतो कि केर टाकावासा वाटत नाही. इथे कोण कोणाला दंड करणार? प्रत्यक्ष पोलिस रस्त्यात पान/ तंबाखूच्या पिचकाऱ्या मारताना सर्रास आढळतात, आयकर भवन सारख्या इमारतीत सरकारने पान थुंकण्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे, कर्मचारी पान थुंकणारच हे गृहित धरून जिन्याचे सर्व कोपरे लाल ऑइल पेंट ने रंगवले आहेत. दुसरे असे कि रस्त्यात कचरा पेट्या किती ठिकाणी आहेत? सार्वजानिक स्वच्छ्तागृहे किती आहेत? मग लोकानी काय करायचे? सरकारने ह्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत मग़ शिस्त न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाइ केली पाहीजे. भ्रष्टाचार हा अस्वच्छतेपेक्षा भयानक रोग आहे. ज्यांनी देशासाठी काही केले नाही त्यांना गादी मिळाल्यामुळे किति ओरबाडु नी किती नाही असे झाले, चमच्यांची सद्दि झाली. जे प्रामाणिक ते मूर्ख आणि बावळट असा शिरस्ता पडला आहे. एकुण गोरे इन्ग्रज गेले आणि काळे इन्ग्रज राज्यकर्ते झाले असा प्रकार आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *