शाळा

छान प्रश्न आहे, देवदत्ता! प्रश्न आवडला!

आता शाळेचं उदाहरण घेऊया.
एकाच वेळी अनेक वर्ग भरलेले असतात. पण शाळा सुटल्या सुटल्या दोन वेगवेगळ्या वर्गातल्या मुलांना विचारले "आज काय झाले?", तर ते वेगळ्या घटना सांगतिल. (यात असं मानुया की ती मधल्या सुट्टीत किंवा इतर वेळी भेटली सुद्धा नाहीयेत)

आता साधर्म्य बघा...
एकाच मुख्याध्यापकांच्या अखत्यारीत दोन्ही वर्ग येतात. पण प्रत्येक विध्यार्थी आणि त्याच्या वर्गातली मुलं साधारण एकच घटनाक्रम सांगतिल. त्यामुळे त्या घटना वेगळ्या असणे साहजिकच आहे. त्याहुन पुढे, दुसऱ्या वर्गात काय झाले हे दुसऱ्या वर्गातला विद्यार्थी येऊन जोवर सांगत नाही तोवर कळणे अवघड आहे.

मुद्दा असा की... पृथ्वी खेरीज इतर ठिकाणी काय झाले हे सांगण्यासाठी तेथील माणसे(?) पाहिजेत किंवा आपल्यापैकी(इथे समस्त मानवजात असे वाचा) कोणी तिथे जाऊन आलेले आणि येऊन ते अनुभव सांगितलेले/लिहिलेले पाहीजेत. हे जरा अवघडच दिसतंय.


पण, हा माझा कल्पनाविलास(!?) आहे बरं का, चु.भु.द्या.घ्या.
-भोमे-काका