* * राधिकांची प्रतिक्रिय विनायककाका, तुम्ही तर मला गीतेतले जे श्लोक उद्धृत करायचे होते, तेच दिलेत. व त्याचे ज्ञानेश्वरीतील विवेचनही. धन्यवाद. द्वारकानाथमहोदय, मी अध्यात्मशास्त्र या शब्दाऐवजी कर्मकांड हा शब्दे वापरायला हवा होता. चूकीबद्दल क्षमस्व. यातुविद्या म्हणजे काय ते मात्र कळले नाही. 'सकाम भक्तीला पावणारे म्हणजे देव व निष्काम भक्तीला पावणारे म्हणजे परमात्मा' हे पटले. कारण गीतेच्या ९व्या अध्यायात कर्मकांडांनी स्वर्गप्राप्ती होते तर अनन्यभाव भक्तीने परमात्म्याशी एकरूप होता येते असे म्हटले आहे. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ परंतु सप्तस्वर्ग व पापपुण्य यांच्या कल्पना भगवान कृष्णालाही मान्य होत्या हे विनायककाकांनी उद्धृत केलेल्या श्लोकांवरून दिसते. अर्थात भगवान कृष्णाला तो मार्ग मात्र मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी कर्मयोगाचा पुरस्कार केला असावा असे वाटते. या तथाकथित 'निष्काम' भक्तीबद्दल मात्र मला नेहमीच हा प्रश्न पडतो., की मोक्षाची अपेक्षा धरून केलेली ही भक्ती निष्काम का म्हणावी? त्यामध्ये आपल्या कर्माच्या फळांची इच्छा धरू नये एवढीच काय ती निष्कामता. परमात्मा सर्वशक्तीमान, अप्रमेय, कूटस्थ असा काय काय असतो, त्याच्यासमोर आपण नगण्य हे आपल्याला जाणवते, आणि म्हणूनच ह्या सांसारिक विवंचनांच्या , जन्ममृत्युच्या चक्रातून सुटायला आपण त्याची अनन्यभावे भक्ती करतो, एक प्रकारे हा स्वार्थीपणा नाही का ? सकाम भक्ती नाही का? फक्त येथे इंद्रियविषयांची कामना धरलेली नाही, एवढाच काय तो फरक. असो मला वाटते मी विषय भरकटवते आहे, परंतु मला हा प्रश्न गीता शिकतानाही नेहमीच पडतो, म्हणून आज येथे विचारला. सिद्धींच्या बाबत मला काहीच माहिती नाही. परंतु प. वि. वर्तकांच्या कुठल्याश्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते, की मानवाने योगसाधना केल्यास त्याला अंतराळभ्रमण, क्षणात स्थूल/सूक्ष्म होणे, लिंगभ्रमण इत्यादि सिद्धी प्राप्त होतात. देवांच्या सिद्धी याहून वेगळ्या असतात असेही वाचल्याचे स्मरते. मला अर्थातच त्यातले काही कळत नाही. पण एक प्रश्न पडतो, तुम्ही म्हणत आहात की सिद्धी अंतिम मोक्षाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात, तर तुम्ही एकप्रकारे पापपुण्याची संअकल्पनाच मान्य करत नाही आहात का? म्हणजे एखादी सिद्धी प्राप्त होणे म्हणजे थोडासा पुण्यसंचय क्षीण होणे, आणि म्हणूनच अंतिम मोक्ष न मिळणे. भगवान श्रीकृष्णानेही अनन्यबावभक्ती हे एक पुण्यच मानले आहे. किंबहुना ते सर्वश्रेष्ठ पुण्य मानले आहे, आसे दिसते. आणखी एक प्रस्न, "मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः" असं म्हणणाऱ्याला अविकारी, undetached परमात्मा कसे म्हणणार? मला भजा, माझेच नाव दिवसरात्र घ्या असे म्हणणाऱ्याला अहंकारविमुक्त कसे म्हणणार? मला अध्यात्म काहीच कळत नाही, म्हणूनच हे प्रश्न पडले आहेत. ते चूकीचे असतीलही. त्याबद्दल क्षमस्व. विषय भरकटवल्याबद्दल देवदत्त महोदयांची माफी. या विषयावर मार्गदर्शन करावे अशी मी द्वारकानाथमहोदय, विनायककाका, दंतकर्मीकाका व आशाबाई यांना विनंती करते. राधिका मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *