..धन्यवाद

 श्रीमान् रेड
धन्यवाद ..
इकडून ५ माणसे तिकडून ५ माणसे ...
ह्या उपायांनी वृत्ती बदलत नाहीत.
त्या साठी सार्वमत बनवणे हा एकच, अवघड पण परिणामकारक उपाय आहे. प्रत्येकाला अयोग़्य गोष्टींच्या विरोधात बोलायला लावणे हाच एक उपाय. जर अनेक लोक अयोग़्य गोष्टींच्या विरोधात सतत बोलू व आक्षेप घेऊ लागले तर त्याचा नक्कीच परिणाम दिसतो.
नुसते बहुमत नाही तर सुसंघटित बहुमत हवे अन्यथा अल्पमतातील  लोकही राज्य करतात हे आपण इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र होऊनही नीट शिकलो नाही.
उदाहरण : केबल टीव्ही चालकांची तसेच केबल टीव्ही कंपन्याची एकाधिकारशाही, मनमानी, दादागिरी ,वाटेल तशी भाववाढ - हे सर्व, ते लोक, केबल ग्राहकांपेक्षा अल्पमतात असूनही, केवळ सुसंघटित असल्यानेच करु शकतात. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने,  असेल त्याच केबल चालकाकडून आपणास,  तो देतो त्याच दराने केबल टीव्ही सेवा, विकत घ्यावी लागते. त्यात आपणास नको असलेल्या वाहिन्यांचेही पैसे द्यावेच लागतात.

 -यादगार