फक्त पृथ्वीच का?

महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.
गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमपुरूष आहे. पूर्ण ब्रम्हांड त्याच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या सूर्यमालिकेतील बहुतेक सर्व ग्रह हे देव आहेत. आणखीही बरेच काही.....
पण मग फक्त पृथ्वीवरच(आणि बहुधा भारतातच) सर्व काही का घडले? रामायण, महाभारत इत्यादी. काही खास कारणे?
जर पृथ्वीखेरीज इतर ठिकाणी काही घडले असेल तर त्याचे काही
लिखाण कोठे मिळू शकेल काय?

-देवदत्त
तळटिप : ह्या चर्चेला "दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का?" ह्या दिशेने नेऊ नये. :-)