माहिती.
मर्त्य लोक सगळ्यात खालच्या पायरीवर म्हणजे भू वर.  थोडा पुण्यसंचय केला की आपले 'प्रमोशन' होते ते पितृलोकात म्हणजेच भुव नामक स्वर्गात. हा पुण्यसंचय क्षीण झाला की तो आत्मा पुन्हा भूलोकी येतो, आणखी पुण्यसंचय झाल्यावर तो आत्मा देवलोकात म्हणजेच स्वः नामक स्वर्गात जातो.
मत >>> आपल्या खऱ्या अध्यात्माच्या कल्पनेनुसार पाप पुण्य या कल्पना नाहीत. आपल्या कडे कर्म ही संकल्पना आहे. (  हा विचार गीतेचा पाया आहे.) कर्म आहे म्हणजे ओघानेच त्याचे फळ आले. मग कोणाला या कर्म आणि फळाच्या चक्रातुन सुटायचे असेल .... या पुढे भारतीय अध्यात्म आधारलेले आहे. योग्य वयात हा प्रश्न पडला आहे म्हणुन भवितव्य उज्वलच आहे.

म्हणजेच देव सुद्धा मोक्ष न मिळालेले आत्मे असतात.
मत >>> खरे तर प्रत्येक जीव कसलीन्कसली आशा- आसक्ति- अपेक्षा ठेवत असतो. ती आकांक्षा पुर्ण व्हावी या साठी देवाची प्रार्थना आली. म्हणजे सकाम भक्तीला पावणारे म्हणजे देव आणि निष्काम भक्तीला फळ देणार्र म्हणजे 'परमात्मा', सर्वशक्तिमान इत्यादी इत्यादी विचार पुढे आले. 

त्यांच्याकडे काही सिद्धी असतात खऱ्या परंतु मर्यादित.

मत>>>सिध्दी आपल्यासारखे लोक पण मिळवु शकतात. पण सिध्दी या अंतिम मोक्षाच्या मार्गात अडथळाच निर्माण करतात अशी समजुत आहे. म्हणुनच सिध्दीसंपन्न चांगदेवाला ज्ञान संपन्न ज्ञानेश्वराला शरण जावे लागले.

म्हणूनच आपल्याकडे देव व परमात्मा या संकल्पनांत फरक केला जातो. यावरून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे देव हे भूलोकातूनच पुढे गेलेले आत्मे असतात

मत>>>सकाम आणि निष्काम भक्तांच्या कल्पनेतील फरक म्हणा हवे तर. तुम्ही जो आत्मा समजत आहात तो जीवात्मा आहे.

( म्हणूनच त्यांची संख्या ३३कोटी सांगितली गेली असावी का?), 
येथे कोटी ही संकल्पना  संख्या वाचक नसुन गुण वाचक आहे.

( आंग्ल शब्दाबद्दल माफ करा परंतु मला आता दुसरा शब्द सूचत नाहीये.)
मत >>> सर्वशक्तिमान, जगत्नियंता, जगदिश इत्यादी.

 मला बहुधा माझे विचार नीट मांडता आलेले नाहीत.

अभिप्राय >>>विचार बरोबर मांडलेले आहे. फक्त कोणा महापुरुषाला, सत्पुरुषाचा शोध चालु ठेवा. " संताचे संगती मनोमार्ग आकळती, ऐरवी तो श्रीपती नाआकळे" म्हंटलेच आहे. " सद्गुरूवाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी" असेही सांगीतले आहेच.