वा वा !!

श्रीमान् देवदत्त ,

१) अनोळखी माणसालाही   रस्त्यात कचरा न करण्यास सांगता ? असे खरोखर करत असाल तर नक्कीच उत्तम.  पण सांगूनही ऐकत नसतील तर काय कराल ? उड्वा उड्वीची उत्तरे मिळाली हे तर स्वतःच मान्य करता म्हणून विचारले.
२) पण दुसऱ्यांचे तिकिट काढणे हा उपाय नाही. अशा किती ओळखीच्या माणसांना तिकिट काढून देणार ?  प्रत्येकाने आपापले तिकिट काढावे असे उपाय केले तर ठीक. अन्यथा फुकटात तिकिट मिळते म्हटल्यावर निर्लज्ज लोक तुमच्याकडे रांगा लावतील व त्यात निर्लज्ज बनून मीच पहिला उभा राहेन कारण माझ्याकडे नियमा नुसार तिकीट आहे ना हाच विचार मी करणार . माझे तिकीट कोण काढते हा मुद्दा गौण आहे.
अशा उपायांनी वृत्ती बदलत नाहीत हे लक्षात घ्या.
चांगले काम करतानाही सारासार विचारबुद्धी  व तर्कशास्त्र वापरणे गरजेचे आहे.
अन्याथा चांगले काम करणाऱ्यालाच नेहमी ओझ्याचे गाढव बनवले जाण्याची शक्यता जास्त असते.


- यादगार