* * उत्तम हे असेच चालायचे असे म्हणणाऱ्यात आपण नाही हे उत्तम. पण आपण दिलेली सर्व उदाहरणे वैयक्तिक स्वरूपाची आहेत. आपल्या सारखे अनेक लोक आहेत जे असा चांगला विचार व कृती देखील करतात. *पण विना तिकिट जाणाऱ्या किंवा भर रस्त्यात थुंकणाऱ्याला दुसऱ्या माणसाला पाहून आपण काय काय कराल ?* मी रोज मैदानात रात्री ८:३० ला व्यायाम करण्यास जातो. तेथे एका कोपऱ्यात "ड्बल बार" व लोखंडाचे मनोरे व्यायामाला बसविले आहेत. लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे. मुले खेळत असतात. इतरांप्रमाणे मी देखील तिथे व्यायाम करत असतो. पण काही मवाली मुले तिथे येऊन ड्बलबार वर बसून व्यायाम करण्या ऐवजी सिगारेट ओढ्त काही तरी पाचकळ विनोद करत असतात . सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. त्याही पेक्षा मी धूम्रपान करत नसलो तरी मला दुसऱ्याच्या सिगारेटच्या धुरामुळे अप्रत्यक्ष रीतीने धूम्र पान करावे लागते. इतरांनाही त्याचा त्रास होतोच पण ते काहीच बोलत नाहीत. या परिस्थितीत आपण काय कराल ते सांगा. उगाच उत्तरासाठी उत्तर नको. जे उत्तर द्याल तेच कराल याची खात्री असेल तरच उत्तर द्या. *नाही तर* * हे असेच (सामाजिक समस्येवर केवळ गप्पा मारणे) चालायचे असे म्हणावे लागेल. * - यादगार मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *