स्पष्टीकरण.
तुम्ही म्हणत आहात की सिद्धी अंतिम मोक्षाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात, तर तुम्ही एकप्रकारे पापपुण्याची संअकल्पनाच मान्य करत नाही आहात का? म्हणजे एखादी सिद्धी प्राप्त होणे म्हणजे थोडासा पुण्यसंचय क्षीण होणे, आणि म्हणूनच अंतिम मोक्ष न मिळणे. भगवान श्रीकृष्णानेही अनन्यबावभक्ती हे एक पुण्यच मानले आहे. किंबहुना ते सर्वश्रेष्ठ पुण्य मानले आहे, आसे दिसते.

मत >>> अहो सिध्दी तर प्राप्त होणारच आहे. ' राजयाची कांता काय भिक मागे, मनाचिया जोगे सिध्दी पावे' असा दाखलाच आहे. या अवस्थेमधे गेल्यानंतर केवळ मनाच्या विचारांनीच सिध्दी मिळणार आहे. बंधन एकच आहे की सिध्दीचा वापर कोणत्याही परिस्थीतीत स्वार्थासाठी, लौकीक उपयोगासाठी करायचा नाही.
श्रीकृष्णाचे म्हणने समजुन घेण्यासाठी सगळाच विचार समजुन घ्यावा लागेल. ( अर्थात परत तेच 'धरावे ते पाय आधी आधी'


मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः" असं म्हणणाऱ्याला अविकारी, undetached परमात्मा कसे म्हणणार? मला भजा, माझेच नाव दिवसरात्र घ्या असे म्हणणाऱ्याला अहंकारविमुक्त कसे म्हणणार? मला अध्यात्म काहीच कळत नाही, म्हणूनच हे प्रश्न पडले आहेत. ते चूकीचे असतीलही

मत>>> येथे अहंकाराने प्रेरित होवुन काढले गेलेले हे उद्गार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हा गुरू-शिष्याचा संवाद आहे. तेथे संशयाला जागा कोठे बरे असेल? नाव घे म्हणजे आपण रुढ भाषेत समजतो ते नाव नव्हे. अहो, येथे नाव म्हणजे ध्यास घे असा आहे. मी जे काही सांगत आहे तेच करण्याचा ध्यास घे. तेच विचार आणि तिच भावना तुझ्या मनात असु दे असे भगवंताचे सांगणे आहे, आधिकारी पुरुषाचे सांगणे हे सांगणे / सल्ला नसुन ते गुरूवचन बनल्यामुळे तसे करणे हेच अभिप्रेत आहे.

गीताचा अभ्यास करत रहा, तो दयाळु आहे आणि अनेकांना त्याने मार्ग दाखवला आहे तुम्हाला तो का बरे मार्ग दाखवणार नाही. अहो येथे सर्व अर्थाच्या पलीकडे, विचाराच्या पलिकडे मार्ग सुरु होतो आणि संपतो.

बाकी मी यापलीकडे काय सांगणार????