निष्काम

माझ्या मते मोक्ष ही प्राप्त "होणारी" अवस्था आहे, प्राप्त "करण्याची" गोष्ट नव्हे.
"शिवो अहम्" ही मोक्ष अवस्था आहे. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःमधेच नव्हे तर सृष्टीतल्या प्रत्येक कणामधील परमात्म्याचे अस्तित्व जाणवतं.
जिथे सगळीकडे मीच भरलो आहे तर मग इच्छा तरी कशाची ठेवणार ?
गजानन महाराजांच्या पोथीतील एक ओवी मधे ही अवस्था आपल्याला दिसून येईल. महाराजांना, भक्त कणसे खाण्यासाठी शेतात घेऊन जातात. तेव्हा गांधीलमाशा जाळामुळे ऊठून महाराजांना असंख्य दंश करतात. त्यावेळ्च्या महारांजाच्या शांत चित्तवृत्तीचे वर्णन करताना दासगणू लिहीतात.
माशी तरी मीच झालो । मोहोळ तेही मीच बनलो ।
कणसे खाया मीच आलो । कणसे तेही रुपे माझी ॥


सांगायचा मुद्दा, अपेक्षा धरून भक्ती केल्याने मोक्ष अवस्था येत नसून निष्काम भक्तीने ती अवस्था आपोआप प्राप्त होते.

प्रसाद