जीव देवानं धाडला जल्म म्हणे ‘आला आला’
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे ‘गेला गेला’दीस गेला कामामधी रात नीजमधी गेलीमरणाची नीज जाता जलमाची जाग आलीनही सरलं सरलं जीव तुझ येन जानजसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीनआला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर