भ्रष्टाचारी
मंत्री सचेत व्हा..."
…©.चारुदत्त अघोर(९/४/११)
पदाचा गैर वापर
करून लोकांची,किती
कराल दिशाभूल,
धेरपोटी स्वतः
होता,काय जिथे
थंडावली आहे चूल;
शांत आहे तिथवर
ठीक,मुश्कील होईल
जर जन-बुद्धी खोडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
साखर कारखाने उघडून
किती जमवली इस्टेट
स्तावर,
तोंड वाकडं होईस्तोवर,गैर्वापरीत
केली पावर ;
कुठे पळणार आहात,जेव्हां
जन शक्ती झोडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
रिकाम्या पदी जागा
भरण्यास,किती घेता
लाच,
अहो हीच लाच द्यायची,तर
का उघडणार नाही
धंदा आज;
आज मूक गिळलेली
लोकं,अवाजतील जेव्हां
अंतर हाक ओरडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
शैक्षणिक क्षेत्रा
सारख्या पवित्र
क्षेत्री,पैशा
शिवाय देत नाही
दाखला,
अहो लज्जास्पद
आहे देश-सेवक,इथेही
कसा व्यवसाय थाटला;
स्वतः अंगठा बहाद्दर
तुम्ही,का पुढे
प्रजा तुम्हास
निवडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
जे आज उपोषणी बसले
आहेत,त्यांना थोडं
तर व्हा सहायक,
का दाबून ठेवलं
आहे ते,लोक पाल
विधेयक;
नका अंत पाहू,आता
लोकं शक्ती अझून
वाढेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
खोकले भाषणं देवून,स्वतःला
आदर्श म्हणवता,
आदर्श घोटाळे करून,वर
भ्रष्टाचार ताणवता;
रावण रुपी तुम्ही,बाणंवाल
जर रामरूपी पुनरावृत्ती
घडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
जनतेचे सेवक म्हणवता,वर
त्यांनाच फसवता,
वातानुकुलीत राहून,लोकास
उन्ही तासावता;
कुठे पळाल जेव्हां,पाठी
"त्याची" काठी
पडेल;
भ्रष्टाचारी मंत्री
हो सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
खालच्या दुनियेशी
हाथ मिळवणी व तुमचं
सेटिंग,
मद्य पानी धुंदावून
रात्री,कोणाशी
असते मिटिंग;
उत्तान घुमणारे
रत्न तुमचे,गुन्हेगारी
त्यांची केव्हा
झडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
तडफदार तरुणांनो
जागे व्हा,घ्या
आता हाती शस्त्र,
या भ्रष्टाचारी
पसरल्या वाळवीला,
हेच एक अस्त्र;
हाणून पाडा यांना
पदावरून,जे व्हायचं
ते घडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो
सचेत राहा,जनताच
तुम्हाला चाबकानं
फोडेल...!,
चारुदत्त अघोर(९/४/११)