पन्नाशीचं सिंहावलोकन !!!

0 views
Skip to first unread message

Vaibhav Gaikwad

unread,
Jun 17, 2010, 12:34:56 PM6/17/10
to vgga...@googlegroups.com


Vaibhav Gaikwad's Blog!!!



पन्नाशीचं सिंहावलोकन !!!

Posted: 16 Jun 2010 09:24 AM PDT


हा ब्लॉग मी बहुतेक मार्च-एप्रिल  २००३ च्या सुमारास रजिस्टर केला होता. www.vggaikwad.blogspot.com  या नावाने. बरीच वर्षे (म्हणजे तरी किमान ६ वर्षे ) ब्लॉग कशाशी खातात याचा मला अंदाज देखील नव्हता, तसा तो अजूनही पुरता आहे असं नाही. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी सहज विचार केला होता ब्लॉगचा वापर सुरु करण्याबाबत, पण एखाद-दुसऱ्या पोस्टनंतर असा काही खास इंटरेस्ट नाही राहिला. नंतर फेबृवारीच्या दरम्यान ब्लॉगमध्ये हळू-हळू भर पडू लागली. एप्रिलपासून ब्लॉग लिहिण्यासाठी म्हणून खास असा वेळ काढू लागलो,  of course याची प्रेरणा अविनाशच्या ब्लॉगवरूनच आली, पण दोन्ही ब्लॉग्सचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. अविनाशचा ब्लॉग विविध विषयांवर त्याची मते स्पष्ट करण्यासाठी आहे, तर माझा ब्लॉग पूर्णपणे इकडची-तिकडची मनोरंजक माहिती शेअर करण्यासाठी.


ब्लॉग चालू झाल्यानंतर काही दिवसांनी एक सुंदर असे template शोधून ब्लॉगला सुरेख बनवण्याचा प्रयत्न केला, जो बऱ्यापैकी यशस्वी झाला असे म्हणता येईल. luck-by-chance गूगलकडून premium membership ला upgrade मिळाले, आणि www.vaibhavgaikwad.com  डोमेन मंजूर झाले. बाकी काही नाही तरी गूगल मध्ये Vaibhav Gaikwad टाकल्यावर no search results च्या ऐवजी आता माझ्या ब्लॉगच्या links येतात, तितकं तरी समाधान.

इकडच्या-तिकडच्या ब्लॉग वर बघून खूप सारे widgets install करत गेलो, त्यातील काही खरंच कामाला आले तर काही निरर्थक म्हणून काढून टाकले. तरीही आवर्जून सांगावे असे feedjit चे live traffic feed अतिशय उपयोगी वाटते मला. नवीन लेख प्रकाशित केल्यानंतर सर्वत्र त्याची बोंबाबोंब करायची आणि मग feedjit वरती real time traffic मध्ये येणारे जाणारे लोक बघत बसायचे समाधान काही निराळेच.

pictures नीट दाखवता यावेत म्हणून सुरुवातीला imageshack.us वर account उघडले होते, पण बहुतेक त्यांच्या server चा लोड जास्त असणार, images उघडायला चिक्कार वेळ घेत असत. शेवटी photobucket साठी sign up केलं. इथे एक खूप जबरदस्त service होती की images आपोआप resize होत होत्या. आता ती फार मोठी गोष्ट नसेल कदाचित, पण 2nd year ला  नीलम प्रभूंच्या HTML च्या lectures मध्ये इतकी मस्ती करून जे काही थोडंफार कानावर पडलं होतं, त्यातलं इथे तरी काही कामाला नाही आलं.

काही दिवसांपूर्वी ब्लॉगची mobile friendly version सुरु करताना खूप साऱ्या services बद्दल माहिती गोळा केली, त्यातील एक म्हणजे mofuse च्या सहाय्याने mobile friendly version सुरु केली. काही दिवसांनी लक्षात आलं की माझ्या स्वतःच्या फोनवर माझा ब्लॉग नीट नाही दिसत, कारण iPhone blogger ला support नाही करत. परत बरीच मेहनत घेऊन फक्त iPhone साठी वेगळी व्यवस्था करून घेतली. mofuse च्या हिशेबाने mobile friendly version ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे, म्हणजे मेहनत वाया तर नाही गेली.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्लॉग पोहोचवताना बऱ्याच उठाठेवी केल्या. नंतर feedburner च्या मदतीने subscribers वाढत गेले, ज्याचा फायदा गूगलकडून adsense चे account मंजूर करून घेताना झाला. $६-७ का होईना पण गूगलकडून जाहिरातींचे उत्पन्न येत आहे आता. feedburner च्या मर्यादा कळल्यानंतर त्याऐवजी गूगल groups च्या माध्यमाने ब्लॉगसाठी अधिकृत असा एक group बनवला, आणि सर्व subsribers तिथून वळवून घेतले. नुकताच facebook वरती ब्लॉगसाठी स्वतंत्र पेज तयार केले, ज्याच्या चाहत्यांची संख्या आता १८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. RSSFeed च्या मदतीने ब्लॉगच्या सर्व updates ची खबर facebok वर पसरवली जाते आहे. थोडक्यात सर्व आलबेल आहे सध्या. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॉगचा मुळ स्त्रोत आलेल्या e-mails असल्यामुळे खास ब्लॉगवर शेअर करण्यासारखे mails मला forword केल्याबद्दल करण मढवी, योगिता राव, भावना पाटील, विशालदादा आणि इतर सर्वांचं अगदी मनापासून आभार....तसेच ब्लॉगबद्दल बऱ्या-वाईट जशा काही प्रतिक्रिया मित्रांकडून मिळाल्या ("awesome blog bro!!!" पासून "कोणी सांगितलेत नको ते धंधे" पर्यंत) त्याबद्दल धन्यवाद. "मी तुझा ब्लॉग रोज चेक करतो" म्हणून आवर्जून सांगणाऱ्या पंकज कुलकर्णी सारख्या मित्राचे विशेष धन्यवाद (म्हणजे निदान एक बकरा तरी नेहमीचा fix).

अशीच साथ कायम मिळत राहावी......यापरीस मागणं लई न्हाई!!!!!

वैभव गायकवाड


Vaibhav Gaikwad's Blog

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
BlogFacebookTwitterSkypeGmailYouTube


Join official group of Vaibhav Gaikwad's Blog
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
Reply all
Reply to author
Forward
0 new messages