|
एक प्रेमपत्र - iPhone user चं
Posted: 30 Aug 2010 02:43 AM PDT
प्रिये,
माझे
तुझ्यापेक्षा जास्त माझ्या iPhone वर प्रेम आहे, असं क्षुल्लक कारण देऊन तू
परवा माझ्याशी भांडलीस. एरवी जेव्हा तू भांडतेस, तेव्हा iFile च्या
registration request सारखं त्याकडेही दुर्लक्ष करून मी आपल्या जीवनातल्या
App-store मध्ये केवळ compatibility परत एकदा check करून घेतो, अर्थातच
तुझी नजर चुकवून. कारण परत आपल्यातील साम्य/फरकांना निव्वळ Operating
System च्या version मधले फरक म्हणून टाळण्याचा तुझा स्वभाव मला माहित आहेच
कि. पण कधी तरी तुझ्या 3.1.2 वरून upgrade घेऊन माझ्यासोबत 4.0 वर ये,
तेव्हा तुला कळेल हे multitasking मला किती जड पडतंय ते. मी तुझ्यात आणि
माझ्या iPhone मध्ये गल्लत करायचा प्रश्न कधी येतंच नाही, इतका
materialistic मी कधीच नव्हतो, iShappath.
अजून आठवतंय
मला ते तुझा पहिलं दर्शन - 2.1.2 मध्ये introduce केलेला user wallpaper
पाहताना झालेल्या आनंदापेक्षा किती तरी वेगळ्या भावनांच्या लाटा माझ्या A4
च्या processor मध्ये उसळलेल्या आठवतायत मला. मी आपला समजत होतो कि नुसता
माझा mobile substrate झाला असेल crash, पण नंतर कळत गेलं एकामागोमाग एक
सगळं springboard respring झाल्यावर. 3.0 च्या त्या कोवळ्या वयात, तुझ्या
डोळ्यांतून बरसणाऱ्या blackra1n ने झटक्यात माझ्या हृदयाचा असा jailbreak
केला कि नुकत्याच अवतरलेल्या cydia सारखी नजरेसमोर फक्त तूच आणि तुझेच
updates फिरत राहिले. मी कुठे जरी गेलो, काही जरी करत असलो, तरी या नजरेचा
compass कायम तुलाच दाखवत राहायचा 'उत्तर' म्हणून. माझ्या To-do list
मध्ये तुला सुखी ठेवण्यापेक्षा दुसरं काहीच नव्हतं, ना तेव्हा ना आता.
नशीब कि ऐन वेळेला तुझ्या मैत्रिणी ultrasn0w सारख्या धावून आल्या माझ्या
मदतीला, नाहीतर आपली bandwidth कधीच unlock नसती झाली, नि मग Air-plane
mode वर टाकल्यासारखा मी नुसता iPod वर sad song वाजवत बसलो असतो.
आपल्या
दोघांचं firmware 5.11 झालं आणि माझ्या Photos मध्ये फक्त आपल्याच आठवणी
साठू लागल्या, त्या देखील 5.0 Megapixel वाल्या. एकाच wi-fi ला hook-up
केलेल्या आपल्या Mover+ ने आपल्या आवडी-निवडी share करू लागलो आपण. Weather
चा तो हसरा partly sunny icon जणू डोळे भरून आशीर्वाद देत होता आपल्याला
सृष्टीचा. कुणाचीही नजर लागेल अशी iComplete theme आपल्या प्रेमाची
(Winterboard च्या कृपेने), तुझ्या आई-बापाच्या नजरेतून सुटली नाही त्यात
नवल कसलं. Upgrading च्या नावाखाली तुला 3.1 ला पाठवून, तुझ्या आई-बापाला
वाटलं असेल कि याचा redsn0w आता हतबल झाला असेल म्हणून. त्यांना कुठे माहित
कि Apple देवाने 3.1.1 येऊ घातली होती त्या मागोमागच. माझा redsn0w आणि
तुझं pwnage tool आपल्याला नव्या उमेदीने एकत्र आणत आपल्या coding ला जागलं
होतं, माझ्या दिवसरात्रीची मेहनत 100% च्या brightness ने लख्ख उजळून
निघाली होती, आठवतंय ना तुला?
दिवसामागून
दिवस गेले, 3.1.2 आली, तरी आपण आपल्या सुखी सहजीवनाच्या Springboard वरची
एक-एक पानं swipe करत चाललो होतो. Installous ने आयुष्यात कधी थांबायची
पाळी नाही येऊ दिली. कधी Zynga Poker सारख्या क्लिष्ट परिस्थितीतून गेलो,
तर कधी NFS Shift सारख्या श्वास रोखायला लावणाऱ्या adventure मधून. कधी
doodle प्रमाणे अडथळे चुकवत उड्या मारल्या, तर कधी आयुष्याचं farkle
नियतीच्या हातात सोपवून निवांत बसलो पडणाऱ्या फाशांवर डोळे लावून. Talking
Carl ने देखील हसण्याच्या खळखळाटाला जणू नवे परिमाणच दिले होते. पाहता
पाहता आपल्या आयुष्याच्या App-store ने लाखोंचा आकडा कधी पार केला, कळलं
देखील नाही.
अचानक मी
नव्या आलेल्या 3.1.3 वर upgrade करायचा निर्णय तुला सांगितला आणि तिथेच
काही तरी बिनसलं. तुला त्या सुखी चाकोरीतून बाहेर येववत नव्हतं, तर मला नवं
क्षितीज खुणावत होतं. तुझ्यापासून दूर जायचा हेतू नव्हता, किंवा तुला
माझ्यासोबत ओढत नेण्याची परिस्थिती देखील. pwnage tool आणि redsn0w इथे
काहीच कामाला येत नव्हतं. तू 3.1.2 वरच राहिलीस आणि मी मात्र माझ्या वाटेने
4.0 च्या दिशेने प्रगती करू लागलो. माझ्या घरची अख्खी dev-team देखील
तुझ्या support ला आली, तेव्हा कुठे तू निश्चिंत झालीस. SB setting सारखं
एकाच swipe मध्ये बरेच controls आता हातात यायला सुरुवात झाली होती. गुडूप
अंधारात LED flash मारताच सगळं clear दिसावं तसं. मी तुला देखील
माझ्यासोबत 4.0 ला येण्याचं विचारलं, तू लगेच हो म्हणाली नाहीस, तरी तुझं
मन तुला काय सांगतंय कळत होतं मला.
तुझे
आताचे सगळे हेवेदावे नुसते बहाणे आहेत परत परत माझं लक्ष वेधून घेण्याचे,
इतकं हि न कळण्याइतपत dumb असायला मी काय blackberry आहे? पण मी तुला
promise करतो, कि नाही जमलं तुला 4.0 वर यायला - हरकत नाही. तू तुझ्या
Calender च्या icon कडे लक्ष ठेऊन रहा. पुढच्या वर्षी 5.0 येतेच आहे summer
मध्ये, तेव्हा बघून घेऊ सगळ्यांना. आणि तुझ्या आई-बापाला म्हणावं Cydia
ला delete करायचा दम Cydelete च्या देखील @#$ मध्ये नाही. जोपर्यंत आकाशात
हे सूर्य-चंद्र राहतील, iPhone आणि Cydia च्या मध्ये Appleच काय Appleचा
बाप पण येऊ शकत नाही. तुझ्यासाठी एखादा blackberry किंवा android शोधत बसू
देत त्यांना वेळ घालवायला. पण सगळीकडे follow करणाऱ्या तुझ्या Vodafone
च्या network सारखं, माझं नाव तुझ्या कपाळाच्या status bar वरती कायमचं
नाही कोरलं, तर आयुष्यभर Nokia वापरेन, शप्पथ घेतो.
तुझाच आणि फक्त तुझाच
iGaikwad


|