पन्नाशीचा लेख लिहिताना मनात शंका होती की काय माहित
मित्रांना आवडेल का??? ब्लॉगचं मूळ स्वरूप पाहता असा लेख(!) इथे शोभेल
का??? आणि सगळ्यात महत्वाचं - च्यायला कुणी वाचलंच नाही तर??? (Note : घाटी
माणसासाठी च्यायला ही शिवी नाही, काय बोलतो अविनाश??) पण अगदी
अनपेक्षितपणे त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की मागचे दोन-तीन दिवस मी
अक्षरशः शिवाजी सावंत किंवा विश्वास पाटील असल्याच्या रुबाबात काढले
आहेत. भरभरून comments आल्या ( म्हणजे तीन, एक माझी मोजून), बऱ्याच
मित्रांनी IM वर प्रशंसा केली. कुणी updates च्या mail ला reply करत
स्तुती केली, तर कुणी facebook वर. पण मिळालेला response खरंच
overwhelming होता......
तसे तर मी VPM's ला असताना कॉलेजच्या वार्षीकामध्ये एक-दोन
लेख लिहिले होते, नाही असं नाही, पण त्याची नोंद बाकी कुणी तर सोडाच,
माझ्या मित्रांनी देखील कधी घेतली नाही, आणि तशी काही तेव्हा अपेक्षा ही
नव्हती. कॉलेजच्या
काही कार्यक्रमांमध्ये anchoring केलेलं होतं, पण जितक्यास तितकं सगळं. कविता सुचायच्या ( ज्या त्या
वयात सगळ्यांनाच सुचतात), पण लिहायचा अतिशय कंटाळा, पेपर सुद्धा कधी ४०-४२
च्या पुढे नाही लिहिला तर ते कोण लिहिणार? आणि कुणाला देणार वाचायला? ती
प्रतिभा मग गाण्यांचं विडंबन करण्यात वाया गेली (काही अपवाद वगळता, "कल नौ बजे" ची माझी version
नक्कीच जावेद अख्तरला लाजवणारी आहे).
नशीबवान म्हणून अशा घरात
जन्माला आलो जिथे कलेचं कौतुक होतं, किंमत होती. एकवेळ देशाचा पंतप्रधान
माहित नसेल तरी चालेल, पण "गुरुदत्त कोण ?" म्हणून विचारलं तर जेवण मिळणार
नाही हे तर नक्कीच. त्यामुळे bollywood धर्माला जागत सिनेमे आणि
सिनेसंगीत याची मनापासून उपासना केली, तानसेन नाही होता आलं तरी कानसेन
झालो. वाचनाची आवड जाईपर्यंत चिक्कार वाचन करून झालं होतं. पण bottomline
अशी की कधी लिखाण गंभीरपणे घेतलं नव्हतं. कधी तसा विचारदेखील मनाला शिवला नव्हता.
पहिलाच प्रयत्न इतका यशस्वी करून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून
धन्यवाद! Special thanks to Pankaj Kulkarni again for quick and sweet
reply. ४ दिवसांत
ब्लॉगच्या facebook पेजचा fan count ५०% ने वाढला. १८ ची संख्या आता २७ वर
जाऊन पोहोचली आहे. प्रत्येकाचं
नाव इथे घेणं शक्य नाही, पण त्या सर्वांचं हार्दिक धन्यवाद!!!
सगळ्यात महत्त्वाचा reply भले थोडासा उशिरा आला, पण best
होता...आमच्या पिताश्रींचा आणि मातोश्रींचा!! त्यांच्याच शब्दात सांगायचं
तर -
- "छान. अभिनंदन! ऊर भरून आला. आमचे आशीर्वाद आहेतच...."
याहून जास्त मला तरी आता काय हवं असणार?
आयुष्यभर तुमच्याकडून फक्त
घेतंच आलो, आज Father's day च्या निमित्ताने आजचा हा लेख तुम्हाला
समर्पित........
Happy Father's Day to everybody...... उज्वला आणि गजरंग गायकवाड
यांचा मुलगा इथेच कृतज्ञतेने आपला निरोप घेतो.
परत भेटूच...... ------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------