ह्या ग्रुपचा उद्देश्य.

8 views
Skip to first unread message

Pallavi

unread,
Oct 25, 2010, 1:26:40 AM10/25/10
to टेक मराठी
नमस्कार मित्र/मैत्रिणींनो,
टेक मराठी या ग्रुपचा काय उद्देश्य आमच्या मनात आहे, हे सांगण्यासाठी आणि
आपण आणखी काय काय करू शकतो ह्याबद्दल तुमची मते जाणून घेण्यासाठी ही
चर्चा.

* ज्यांना या उपक्रमाबद्दल माहिती नाही त्यांनी http://techmarathi.com/about
येथे भेट द्यावी.

टेक मराठी हा उपक्रम कोणा एकट्याने काम करून पुढे जाण्यासारखा नाहीये.
त्यासाठी जास्तीत जास्त लोक एकत्र येऊन आपले योगदान देणे, चर्चा करून हा
उपक्रम अधिक चांगला होण्यासाठी काय करायचे ते ठरविणे व जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी व मुख्यत: चर्चेसाठी व्यासपीठ
उपलब्ध व्हावे हा या ग्रुपचा प्रमुख उद्देश्य.
येथे आपण वाचक म्हणून काय अपेक्षा करता, कोणत्या विषयावर व्याख्याने
ठेवता येतील, कोणी पुढाकार घेऊन काही सभा आयोजीत करू इच्छिता, एखादी
मुलाखत घेऊ शकता का, काही लिहू शकता का.. ह्या आणि अशा गोष्टी येथे
याव्यात व टेक मराठीची व्यापकता वाढावी या उद्देश्याने हा ग्रुप सुरू
केला आहे.

तेव्हा यावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages