अभ्यासपूर्ण गुंतवणूक ...शेअर बाजारातील.
शेअर बाजाराकडे बघण्याचा सर्वसामान्य मराठी माणसाचा दृष्टीकोन अजूनही बराचसा पूर्वग्रहदूषितच आहे . हा एक प्रकारचा जुगारच आहे , असेच बरेच जण समजतात . बहुसंख्य लोक ज्या पद्धतीने त्यात गुंतवणूक करतात , ते पाहता त्या समजुतीला आधारही मिळतो .
शंभरातील नव्याण्णव माणसे शेअर बाजारात जुगार खेळायला उतरावे तसे उतरतात म्हणूनच बहुधा तोंडघशी पडतात . जुगारात तुम्ही प्रत्येकच वेळी हरालच असे नाही आणि प्रत्येकच वेळी डाव जिंकाल असे तर मुळीच नाही . त्यामुळे जुगारा क्वचित कधी कधी फायदा देत असला तरी बहुतेक वेळी जबरदस्त तोटा होण्याचीच शक्यता अधिक असते . शेअर्समधील कमाई ही कोणतेच कष्ट न करता केलेली कमाई असल्याने ती हरामाची कमाई असते असा एक आक्षेप आहे . पण शरीराला कष्ट दिले तरच ती घामाची कमाई असे म्हटले तर सारेच ' व्हाईट कॉलर जॉब्स ' मोडीत काढावे लागतील .
शेअर बाजार हा सर्वाधिक रिटर्न देणारा गुंतवणूक प्रकार आहे . त्यात गुंतवणूक म्हणजे सट्टा खेळण्यासारखे आहे , असा एक गैरसमज आहे . शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली आणि ट्रेडर न होता इन्व्हेस्टर झालात तर त्यातून श्रीमंत होता येणे शक्य आहे . बाजारात असणाऱ्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स दिर्घकाळासाठी ठेवले तर ते शेअर्स तुम्हाला सोन्याची अंडी देतील , हे निश्चित .एखादे लॉटरीचे तिकिट विकत घ्यावे तशा निष्काळजीपणे शेअर्स खरेदी करणारी आणि कष्टाने कमावलेल्या पैशांची धूळधाण करणारी अनेक माणसे मला अगदी जवळून पाहयला मिळाली तुम्ही ते शेअर्स का विकत घेतलेच , असे त्यांना विचारले तर त्यातल्या कोणालाच त्या प्रश्नाचे धड उत्तर देता येणार नाही . पण तरीही डोळेझाकपणाने खरेदी केलेल्या शेअर्समधून त्यांचे भले होणे शक्य नव्हते .
जर बँकेत डिपॉझिट ठेवून त्यावर व्याज मिळवणे हे अनैतिक नाही . दहा वर्षांपूर्वी मातीमोल दराने खरेदी केलेली जमीन आज सोन्याच्या दराने विकून मिळालेले पैसे ही जर कष्ट न करता बसल्या जागी केलेली हरामाची कमाई होत नाही . तर कालांतराने बाजार भाव वाढतील या अपक्षेने आज खरेदी केलेले शेअर्स उद्या खरेच चढ्या भावाने विकून आलेले पैसे अनैतिक कसे होतील शेअर्सच्या किमती या शेअर्सच्या अंगभूत गुण दोषांवर अवलंबून नाहीत . काही असामाजिक घटक स्वतःच्या फायद्यासाठी त्या किमतींमध्ये त्यांना हवे तसे चढ उतार घडवून आणतात . शेअर बाजारात पैसे गुंतवून पर्यायाने आपण त्यांचे हात अधिकच बळकट करत असतो ,
इतकेच नव्हे तर यात मिळालेल्या नफ्यावर टॅक्सही भरावा
लागतो . त्यामुळे शेअर बाजारावर आपण बहिष्कार घालायचे काहीच कारण नाही .एक गोष्ट
लक्षात ठेवावी कोणताच अभ्यास न करता , कोणतेच कष्ट न घेता , केवळ अंदाजे केलेली
शेअर खरेदी तुम्हाला केवळ तोट्यातच नेईल . शेअर बाजारात एकाचा तोटा हा दुसऱ्याचा
किंवा अप्रत्यक्ष फायदा असतो . स्वतःचा तोटा करवून दुसऱ्यांना ' श्रीमंत ' करायच आपल्या इरादा
नाही . केवळ स्वतःच सतत फायद्यात राहण्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे . त्यासाठी
अफवांवर विश्वास न ठेवता फक्त चांगल्याच कंपन्यांचे शेअर्स घ्या .
कोणत्या
छोट्या मोठ्या घटनेने आणि कधी कधी तर काहीसुद्धा न घडता शेअर्सच्या किमतीत अचानक
होणारे मोठे चढ उतार या आक्षेपाला बळच देतात . मात्र , तरीसुध्दा सामान्य
गुंतवणूकदाराने शेअर बाजारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे