पुन्हा लागो नये भुक

10 views
Skip to first unread message

सुजित बालवडकर

unread,
Dec 12, 2013, 3:21:21 AM12/12/13
to
*************************
विरोपाद्वारे मी शक्यतो संपूर्ण कविता पाठवत नाही. पण ही कविता पाठवल्यावाचून रहावले नाही. 

भ्रमंतीच्या नाक्यावर
जरा गावांचे आडोसे
अरे पोरा, नको बघू
बरे आभाळ आभाळ

नाही रानाचा आधार
नाही पायाखाली जोते
काटक्यांच्या शिशिरात
माय चुलीशी खोकते

एका भाकरीत कसे
भरे अर्धेच हे पोट
त्याला तहान आसरा
वर पाणी घोट घोट

नाही पसरलो कोठे
नाही रुतलो मूळाशी
ओझ्या-गाठोड्यांच्या संगे
गाढवांचे धनी झालो

विठो, तुझ्या पायी आता
मागे अखेरची भीक
देरे, अशी दे भाकरी
पुन्हा लागो नये भुक

– अशोक नायगांवकर

 दुवा - http://marathikavitasangrah.com/?p=3574

अशोक नायगांवकर यांच्या आणखीन कविता - http://marathikavitasangrah.com/category/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/

Reply all
Reply to author
Forward
0 new messages