|
पान 1 2
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील आगळं-वेगळं साहित्यसंचित आहे. लावण्या, पोवाडा, वगनाट्याद्वारे त्यांनी जनजागृतीचे काम केले. १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे.या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले. १९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक' हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव' प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. |
|
अण्णाभाऊंचं
झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे
जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत.
४५ कादंबर्या, १५० कथा, तीन नाटके,
११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा
व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे
साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ
माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये
रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला
बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची
परंपरा इथे त्यांना लाभली नाही.
आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी
संस्थांच्या अभ्यासक्रमाचा
भाग बनले आहेत. माटुंग्याच्या
लेबर कँपमधील मंडळीं विशेषत:
नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून
येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक
गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत
नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची
नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली
गेली. याच कँपच्या नाक्यावर
`लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय
पक्षांच्या कार्यकर्त्यांचा
अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये
आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा
लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४
साली झालेल्या शेतकरी परिषदेत
लालबावटा कलापथकाची स्थापना
झाली. इथेच शाहीर अमरशेख,अण्णाभाऊ
व गव्हाणकर एकत्र आले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।` आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश' शेतकर्यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले. अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल' साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता. |
[संपादन] कादंबरीवर आधारित चित्रपट
|
अनुक्रमांक
|
कादंबरी
|
चित्रपट
|
संस्था
|
| १ | वैजयंता | वैजयंता १९६१ | रेखा फिल्म्स |
| २ | आवडी | टिळा लावते मी रक्ताचा १९६९ | चित्र ज्योत |
| ३ | माकडीचा माळ | डोंगरची मेना १९६९ | विलास चित्र |
| ४ | चिखलातील कमळ | मुरली मल्हारी रायाची १९६९ | रसिक चित्र |
| ५ | वारणेचा वाघ | वारणेचा वाघ १९७० | नवदिप चित्र |
| ६ | अलगूज | अशी ही सातार्याची तर्हा १९७४ | श्रीपाद चित्र |
| ७ | फकिरा | फकिरा | चित्रनिकेतन |
प्रकाशित साहित्य
[संपादन] कादंबर्या
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | आग | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| २ | आघात | ||
| ३ | अहंकार् | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ४ | अग्निदिव्य | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ५ | कुरूप | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ६ | चित्रा | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ७ | फुलपाखरू | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ८ | वारणेच्या खोर्यात | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ९ | रत्ना | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| १० | रानबोका | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ११ | रूपा | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| १२ | संघर्ष | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| १३ | तास | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| १४ | गुलाम | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| १५ | डोळे मोडीत राधा चाले | ||
| १६ | ठासलेल्या बंदुका | ||
| १७ | जीवंत काडतूस | ||
| १८ | चंदन | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| १९ | मूर्ती | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २० | मंगला | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २१ | मथुरा | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २२ | मास्तर | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २३ | चिखलातील कमळ | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २४ | अलगूज | ||
| २५ | रानगंगा | ||
| २६ | माकडीचा माळ | ||
| २७ | कवड्याचे कणीस | ||
| २८ | वैजयंता | ||
| २९ | धुंद रानफुलाचा | ||
| ३० | आवडी | ||
| ३१ | वारणेचा वाघ | ||
| ३२ | फकिरा | ||
| ३३ | Linkवैर् | ||
| ३४ | पाझर | ||
| ३५ | स्ैरसोबत |
[संपादन] कथासंग्रह
[संपादन] नाटके
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | बरबाद्या कंजारी | प्रथम आवृत्ती | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे |
| २ | चिरानगरची भुतं | प्रथम आवृत्ती | |
| ३ | निखारा | ||
| ४ | नवती | ||
| ५ | पिसाळलेला माणूस | ||
| ६ | आबी | दुसरी आवृत्ती | |
| ७ | फरारी | ||
| ८ | भानामती | ||
| ९ | लाडी | दुसरी आवृत्ती | |
| १० | क्रुष्णा काठच्या कथा | ||
| ११ | खुळंवाडी | ||
| १२ | गजाआड | पाचवी आवृत्ती | |
| १३ | गुर्हाळ | ||
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | इनामदार | प्रथम आवृत्ती, मे १९५८ | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ |
| २ | पेंग्याचं लगीन | ||
| ३ | सुलतान |
[संपादन] शाहिरी
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | शाहिर | दुसरी आवृत्ती १९८५ | मनोविकास प्रकाशन, मुंबई |
[संपादन] तमाशा
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | अकलेची गोष्ट | चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२ | |
| २ | खापर्या चोर | ||
| ३ | कलंत्री | ||
| ४ | बिलंदर बुडवे | ||
| ५ | बेकायदेशीर | ||
| ६ | शेटजीचं इलेक्शन | ||
| ७ | पुढारी मिळाला | ||
| ८ | मूक मिरवणूक् | ||
| ९ | माझी मुंबई | ||
| १० | देशभक्त घोटाळे | विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे | |
| ११ | दुष्काळात तेरावा | ||
| १२ | निवडणूकीतील घोटाळे | ||
| १३ | लोकमंत्र्यांचा दोरा | ||
| १४ | पेंग्याचं लगीन |
[संपादन] प्रवासवर्णने
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | माझा रशियाचा प्रवास | सुरेश एजन्सीज ,पुणे |
[संपादन] प्रसिद्ध पोवाडे
|
अनुक्रमांक
|
नाव
|
आवृत्ती
|
प्रकाशन
संस्था
|
| १ | नानकीन नगरापुढे | ||
| २ | स्टलिनग्राडचा पोवाडा | ||
| ३ | बर्लिनचा पोवाडा | ||
| ४ | बंगालची हाक | ||
| ५ | पंजाब-दिल्लीचा दंगा | ||
| ६ | तेलंगणाचा संग्राम | ||
| ७ | महाराष्ट्राची परंपरा | ||
| ८ | अमरनेरचे अमर हुतात्मे | ||
| ९ | मुंबईचा कामगार | ||
| १० | काळ्याबाजाराचा पोवाडा |
Rakesh Jadhav
MIS Team - Channel Development (Agency Sales)
Bharti AXA Life Insurance Co.Ltd
Unit 601 & 602, 6th Floor, Raheja Titanium,
Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai – 400 063, INDIA
‘(91) 22 4030 6300 Extn: - 6322 |
* Rakesh...@bharti-axalife.com
This e-mail is intended for the exclusive use of the addressee and
others authorised to receive it. It may contain confidential or legally
privileged information. If you are not the intended recipient, you are
hereby notified that the use, disclosure, dissemination, distribution or
copying of this email and/or any of the attached files is strictly
prohibited.
If you have received this communication in error, please destroy
the e-mail and notify the sender immediately by a return email.
Bharti AXA Life Insurance Company Limited is not liable for any
improper and/or incomplete transmission of the information contained in
this communication or for any delay in its receipt or for any damage
caused by malicious alteration by any third party.
Bharti AXA Life Insurance Company Limited does not control the content
of the emails and as such does not verify the correctness, accuracy or
validity of the message. Any views or opinions presented are solely
those of the author and do not represent those of Bharti AXA Life
Insurance Company Limited, unless otherwise specifically stated. While
reasonable effort has been made to ensure this message is free of
viruses, opening and using this message is at the risk of the recipient.