स्वतंत्र भारताच्या अवकाशात
युद्धाचे ढग जमायला लागतात त्याच
वेळी भारताच्या आर्मी, नेव्ही
आणि एअरफोर्स या तीनही संरक्षण
दलांच्या आठवणी मनात गर्दी करू
लागतात. अन्यथा दहावी, बारावीनंतर
काय, या प्रश्नाला फारच थोडय़ा
इच्छुकांकडून ‘मला भारतीय संरक्षण
दलात जायचं आहे.’ असं उत्तर येतं.
बऱ्याच अंशी याचं कारण केवळ
अज्ञान हेच आहे. संरक्षण दलामध्ये
प्रवेश कसा मिळविता येतो हे
माहीत नसतं, कित्येकदा ही माहिती
असूनसुद्धा प्रवेशपरीक्षेसाठी
तयारी कशी करावी याचंही अज्ञान
असतं. एवढंच काय संगणकशास्त्र
आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांतून
पदवी प्राप्त करणाऱ्या युवकांना
संरक्षण दलातसुद्धा भरपूर वाव
आहे याचीसुद्धा माहिती नसते.
आपल्याला निश्चितपणे कोणती
करिअर करायची आहे याचा नीट विचार
करूनच दहावी-बारावीमध्ये असतानाच
आपली व्यावसायिक दिशा निश्चित
करायची असते. त्याचप्रमाणे संरक्षण
दलामध्ये करिअर करायची असल्यास
अचूक नियोजन करावं लागतं. नेमक्या
याच आवश्यकतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे
इतर क्षेत्रांचे दरवाजे बंद
झाले की, हे युवक अर्धवट तयारीनिशी
संरक्षण दलाकडे वळतात आणि मग
त्या ठिकाणी अपयशाची मालिकाच
सुरू होते. त्यातच संरक्षण दलाच्या
प्रवेशपरीक्षा आणि मुलाखती
अवघड असतात. संरक्षण दलात जीवाला
धोका असतो, संरक्षण दलात इतर
विशेष करिअरच्या मानानं कमी
प्राप्ती होते; संरक्षण दलात
ारंवार बदल्या होतात;
आणि या अशासारख्या असंख्य गैरसमजुतींमुळे
युवक संरक्षण दलात प्रवेश घेण्यास
साशंक असतात. अत्यंत कमी दरात
स्विमिंग पूल आणि क्लबमध्ये
मिळणारी मनोरंजनाची साधने, खडतर
प्रदेशात नियुक्ती झाल्यास
विशेष भत्ता, पॅराट्रपर्स किंवा
पाणबुडय़ाचा कोर्स केल्यास त्याबद्दल
खास वेतन अशांसारखे अनेक फायदे
आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधील
कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त
मिळतात. या व्यतिरिक्त संरक्षण
दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना
केंद्रीय विद्यालयात अग्रक्रमाने
प्रवेश दिला जातो. निवृत्त होण्यापूर्वी
सरकारी खर्चाने व्यावसायिक
प्रशिक्षण देण्याची तरतूद, शिवाय
दोन वर्षांची पूर्वतयारी रजा
दिली जात असल्याने या रजेमध्ये
अधिकारी एम.बी.ए., एम.सी.एस. यासारखे
पूर्ण वेळचे अभ्यासक्रम आपल्या
आवडीच्या विद्यापीठांमधून
पूर्ण करू शकतात. एवढेच नव्हे
तर तिन्ही दलांनी आपापले कल्याणनिधी
उभारले असून त्यातून कर्मचाऱ्यांच्या
पाल्यांसाठी शिष्यवृत्त्या,
परदेशी शिक्षणासाठी आर्थिक
सहकार्य आहे; सुविधा आहेत. परंतु
संरक्षण दलातील सेवेची निवड
करताना केवळ आर्थिक फायद्याकडेच
लक्ष केंद्रित करणे योग्य नाही.
सामाजिक स्थान, सन्मान, गणवेशाचा
एकंदर रुबाब आणि देशाचे रक्षक
म्हणवून घेण्याचा मान हा इतर
कोणत्याही देशात नाही याची जाणीव
युवकांनी मनाशी जपली पाहिजे,
आवर्जून जोपासली पाहिजे.
संरक्षण दलात दोन प्रकारे प्रवेश
मिळतो. अधिकारी म्हणून किंवा
शिपाई, नौसैनिक म्हणून! विशेष
व्यक्तिमत्त्व असलेले आणि चाचणीद्वारे
निवडलेले तिन्ही दलातील सैनिक
अधिकारी म्हणून निवडले जातात.
युवकांनी सैनिक किंवा अधिकारी
म्हणून प्रवेश घ्यायचा ठाम निर्णय
योग्य वेळी घेणे जरुरीचे आहे.
सैनिक किंवा जवान म्हणून १०वी
नंतर आणि वायुदल, नौदलात १२वी
नंतर प्रवेश देण्यात येतो. नौदल,
वायुदलाच्या काही विशिष्ट विभागांसाठी
१०वी नंतरही युवकांना प्रवेश
दिला जातो. या विभागात महिलांना
१०वी नंतर प्रवेश नसतो. महिलांना
फक्त अधिकारी म्हणून प्रवेश
आहे. यासाठी वजन आणि उंचीचे प्रमाण
ठरलेले आहे. छाती कमीत कमी ७८
सें.मी. आणि ती फुगवून पाच सें.मी.
वाढली पाहिजे. महाराष्ट्रात
मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद
आणि नागपूर या ठिकाणी नौदल आणि
भूदलातील सैनिकांसाठी प्रवेशकेंद्रे
आहेत.
वायुदलासाठी एअरमन
म्हणून भरती मुंबईला कॉटनग्रीन
येथील वायुदलाच्या केंद्रात
केली जाते. संरक्षण दलात अधिकारी
होण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील
लेखी स्पर्धा परीक्षेस बसावे
लागते. त्यानंतर सव्र्हिसेस
सिलेक्शन बोर्डाचा (SSB) पाच दिवसांचा
इंटरव्ह्यू असतो. त्यामध्ये
बुद्धिमत्ता, मानसशास्त्र, नेतृत्व,
वक्तृत्व इ. गुणांची क्षमता
पाहणाऱ्या चाचण्या घेतल्या
जातात. यामध्ये यशस्वी होणाऱ्या
उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी
दोन दिवस लष्करी इस्पितळात राहावे
लागते. पदवीधरांना इंडियन मिलिटरी
अॅकेडमी डेहराडून येथे प्रवेश
घेण्यासाठी ‘कम्बाईण्ड डिफेन्स
सव्र्हिसेस’ (COMBINED DEFENCE SERVICES) या
अखिल भारतीय लेखी परीक्षेस उपस्थित
राहावे लागते. युवकाचे वय त्या
वेळी २४ वर्षांपेक्षा अधिक असावे.
१२वी नंतर पुण्याजवळील राष्ट्रीय
संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये
प्रवेश मिळू शकतो. यासाठी अखिल
भारतीय लेखी परीक्षेस बसावे
लागते. या सर्व परीक्षा यूपीएससी
मार्फत घेतल्या जातात. त्यांची
रीतसर जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूज या साप्ताहिकात व अन्य
प्रमुख वृत्तपत्रांतून किमान
वर्षभर अगोदर प्रसिद्ध होते.
या परीक्षेला सामान्य ज्ञान,
इंग्रजी बुद्धिमत्ता चाचण्या
इ. विषय असून या परीक्षेच्या
नियोजनपूर्वक तयारीसाठी अनेक
नियतकालिके आज उपलब्ध आहेत.
भारतीय संरक्षण दलात आज १२०००
त्या आसपास अधिकाऱ्यांच्या
जागा रिक्त आहेत. शिवाय सध्याचे
जागतिक, राजकीय वातावरणसुद्धात
युद्धाच्या दिशेने जाते की काय?
अशा अवस्थेत पोहोचले आहे. म्हणूनच
केवळ पदवीधरांनीच नव्हे तर १०-१२
वी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या
सर्व युवकांनी संरक्षणदलातील
करियरचा विचार करायला हवा. सोबत
महिलांनीही संरक्षणदलाशी नाते
जोडायचा प्रयत्न करायला हवा.
या विषयातील एवढय़ा माहितीतून
युवकांच्या एक गोष्ट निश्चित
लक्षात आली असावी की, संरक्षणदलातील
सेवेची संधी दहावी, बारावी आणि
पदवीधर झाल्यानंतर तीन वेळा
उपलब्ध आहे. एवढंच काय कायदे,
कृषी आणि दुग्धव्यवसायातील
पदवीधरांनासुद्धा संरक्षणदलात
प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकी
पदवीधरांना संरक्षणदलात उत्तमच
मागणी असते. अशा पदवीधरांना
प्रशिक्षणाच्या पहिल्याच वर्षांपासून
दहा हजार रुपयांच्या आसपास पगाराशिवाय
दोन वर्षांची सेवाज्येष्ठता
प्राप्त होते. त्यामुळेच लष्करी
इंजिनीयरांना प्रवेश मिळाल्यानंतर
एका वर्षांत कॅप्टनच्या हुद्दय़ापर्यंत
जाऊन त्यांना १६ ते १८ हजार रुपये
दरमहा पगार मिळतो. संरक्षणदलात
प्रमोशनची पद्धत पारदर्शी आहे.
लेफ्टनंटपासून ते मेजर पदापर्यंत
सेवेतील किती वर्षे झाली यावर
कालबद्ध पदोन्नती आपोआप होते.
लेफ्टनंट कर्नलपासून लेफ्टनंट
जनरलच्या हुद्दय़ापर्यंत मात्र
बढती ही सेवाज्येष्ठता आणि निवड
या निकषवर होते. एन. डी. ए. (पुणे)
आणि सी. डी. एस. (डेहराडून)द्वारे
वायुदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांची
भरती होत असते. त्याशिवाय नौदल
अॅकॅडमी गोवा, वायुदल अॅकॅडमी
हैदराबाद या ठिकाणीसुद्धा गरजेनुसार
लेखी परीक्षा आणि एस. एस. बी. इंटरव्ह्य़ूमार्फत
भरती केली जाते. वर्तमानपत्रातील
जाहिरात वाचून यासाठी अर्ज करावा
लागतो. याशिवाय गणित आणि विज्ञान
विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण झालेल्या
मुलांना लोणावळ्याच्या नौदल
अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तीन
वर्षांचे प्रशिक्षण देऊन इंजिनीयर
म्हणून अधिकारी होता येते. मात्र
त्यांन १२ वीमध्ये ७० टक्के
गुण मिळवून एस. एस. बी. इंटरव्ह्य़ूमध्ये
उत्तीर्ण व्हावे लागते. सैन्यदलात
अधिकारी होण्यासाठी संस्थेचे
नाव वयोमर्यादा अर्हता निवड
पद्धत अर्ज कधी करावेत? इतर माहिती
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
[N.D.A.] खडकवासला, पुणे.
संघ लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा
[U.P.S.C.] एस. एस. बी.च्या चाचण्या होतात.
वर्षांतून दोन वेळा जाहिरात-
मे-जून आणि नोव्हें.-डिसें.मध्ये
प्रसिध्द होतात. लष्कर, नौदल,
वायुदल प्रवेशासाठी पर्मनन्ट
कमिशन तीन वर्षांचे प्रशिक्षण
असते.
२) इंडियन मिलिटरी अॅकेडमी [I.M.A.]
(सी. डी. एस.)
भूदल- १९ ते २४, नौदल- १९ ते २२,
वायुदल- १९ ते २३. पदवीधर/ पदव्युत्तर
संघ लोकसेवा आयोगाची सी. डी. एस.
परीक्षा आणि एस. एस. बी. दोन वेळा
जाहिराती- मार्च/एप्रिल आणि
ऑक्टो./नोव्हें. तिन्ही दलातील
प्रवेशासाठी. नौदल आणि वायुदलासाठी
फक्त सायन्स [B.Sc.] पदवीधर तरुण
पात्र
३) इंडियन मिलिटरी अॅकेडमी,
डेहराडून
अ) तांत्रिक विषयातील पदवीधरांसाठी
वय वर्षे २० ते २७ असणे आवश्यक.
अभियांत्रिकी पदवीधरास लेखी
परीक्षा नाही. एस. एस. बी. इंटरव्ह्य़ू
घेतला जातो. ऑक्टो.-नोव्हें.मध्ये
जाहिरात प्रसिध्द होते. एक वर्षांचे
प्रशिक्षण दिसे जाते. या काळात
दरमहा ९००० रुपये भत्ता, पर्मनन्ट
कमिशन
ब) बिगर तांत्रिक पदव्युत्तर-
एम.ए./ एम.एस्सी. लेखी परीक्षा
नाही. एस. एस. बी. इंटरव्ह्य़ू घेतला
जातो. ऑक्टो.-नोव्हें.मध्ये जाहिरात
प्रसिध्द होते. एक वर्षांचे
प्रशिक्षण, दरमहा ८००० रु. भत्ता,
पर्मनन्ट कमिशन.
४) अ) ओ. टी. ए. चेन्नई- वयाची अट
२९ ते २५वर्षे. पदवीधर/ पदव्युत्तर.
संघ लोकसेवा आयोगाची सी. डी. एस.
परीक्षा आणि एस. एस. बी. इंटरव्ह्य़ू.
ऑक्टो.-नोव्हें.मध्ये जाहिरात
आणि मार्च/एप्रिल. पाच वर्षांसाठी
शॉर्ट सव्र्हिस कमिशन- नऊ महिन्यांचे
प्रशिक्षण. कालावधीत भत्ता नाही.
योग्य वाटल्यास प्रशिक्षण पर्मनन्ट
कमिशन मिळू शकते.
ब) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी
(ओ. टी. ए) तांत्रिक पदवीधरांसाठी-
वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. अभियांत्रिकी
पदवीधर. लेखी परीक्षा नाही. एस.
एस. बी. इंटरव्ह्य़ू. ऑक्टो.-नोव्हें.मध्ये
जाहिरात प्रसिध्द होते. प्रशिक्षण
१० महिन्यांचे. या काळात दरमहा
५००० रु. भत्ता शॉर्ट सव्र्हिस
कमिशन पाच वर्षांसाठी. योग्य
वाटल्यास पर्मनन्ट कमिशन मिळू
शकते.
क) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी
(ओ. टी. ए.) एन. सी. सी. ‘सी’ सर्टिफिकेट
धारकांसाठी- वय वर्षे-१९ ते २५.पदवीधर.
लेखी परीक्षा नाही. एस. एस. बी.
इंटरव्ह्य़ू घेतला जातो. मार्च
महिन्यात जाहिरात प्रसिध्द
होते. राज्याच्या एन. सी. सी. डायरेक्टोरेटच्यामार्फत
अर्ज पाठवावेत. नऊ महिन्यांचे
प्रशिक्षण- या कालावधीत भत्ता
नही. योग्य वाटल्यास पर्मनन्ट
कमिशन मिळू शकते.
पुष्कर मुंडले
|