रोपाची लागवड

2 views
Skip to first unread message

Suhas Pugaonkar

unread,
Apr 21, 2010, 2:01:46 AM4/21/10
to Marathi Paul
नमस्कार वाचकहो,

मी वारंवार या ठिकाणी सांगत आहे चला एकत्र येऊया, तुम्ही म्हणाल एकत्र
यायचे म्हणजे नक्की काय करायचे? कुठला पक्ष काढायचा की काय, नाही
मित्रानो आपल्याला कुठलाही पक्ष काढायचा नाही किंवा एखादी संघटना
उभारायची आहे. आपल्याला एकत्र येऊन आपल्यामधले स्वत्व शोधायचे आहे,
बहुतेकदा आपल्याला आपल्या उणीवा चांगल्याचा महित असतात पण आपण या
उणीवेच्या ओझ्याने आपण इतके दबून जातो की आपले व्यक्तिमत्व योग्यरीत्या
खुलून येत नाही आणि आपण मागे पडत जातो आणि ज्या गोष्टी तुमच्याकरिता
असतात त्या गोष्टी इतरांकडे आपसूक निघून जात राहतात.

येथे या ठिकाणी आपण याच गोष्टीची कोंडी फोडणार आहोत, जास्तीत जास्त
अभिव्यक्त होऊन स्वतःबरोबर इतरोंच्याही प्रगतीला हातभार लावणार आहोत. खुप
काही कल्पना प्रत्यक्षात साकार करणार आहोत. या करिता आवश्यक आहे एकत्र
येण्याची आणि एकत्र राहण्याची. कदाचित तुम्हाला हा पोरखेळ वाटण्याची
शक्यता आहे. पण वाट पहा हा फार मोठा वृक्ष होणार आहे. त्याच रोपाची लागवड
सध्या सुरु आहे.

मग काय सामील होतंय ना ?


--
Subscription settings: http://groups.google.com/group/samanyamarathi-paul/subscribe?hl=en-GB

Reply all
Reply to author
Forward
0 new messages