गतवर्षीच्या मोगरा फुलला ई-दीपावली अंकाला भरभरून प्रतिसाद मिळाला. लेखक-वाचकांकडून मिळालेलं प्रेम नुसता उत्साहच द्विगुणित करत नाही तर आत्मविश्वासही वाढवतं. याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही या वर्षीच्या दिवाळी अंकाची म्हणजेच
’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ ची घोषणा करीत आहोत.
यंदाचा दिवाळी अंक दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच प्रकाशित केला जाईल.
आपल्या सर्वांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आम्ही आवाहन करीत आहोत.
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याची मुदत आहे दि. १ सप्टेंबर २०११ ते ३० सप्टेंबर २०११.
साहित्य पाठविण्यासाठी ईमेल आयडी आहे diwa...@mogaraafulalaa.com.
साहित्य पाठविण्यापूर्वी या अंकासाठी असलेले नियम व अटीलक्षपूर्वक वाचून घ्या आणि त्याप्रमाणेच साहित्य पाठवा.
नियम आणि अटी याच ईमेलला अटॅचमेंट म्हणून जोडले आहेत. (
साहित्यासोबत जाहीरनामा पाठवणे आवश्यक आहे. हा जाहीरनामा सोबत जोडलेला आहे.)
मागील वर्षी जाहिर केल्याप्रमाणे ऑफलाईन वाचनासाठी सोयिस्कर पडेल अशी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०ची PDF प्रत आपल्या सर्वांना डाऊनलोडींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
ही ऑफलाईन आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायावर क्लिक केलंत की डाऊनलोडींग सुरू करता येईल.
गुगल डॉक्स यूटॉरंट ईस्निप्स फोरशेअर्ड मिडीयाफायर
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ च्या प्रकाशनाची नक्की तारिख व इतर माहिती लवकरच
मोगरा फुललावर प्रकाशित केली जाईल. तोपर्यंत धीर धरा आणि मोगरा फुललाच्या नोंदींकडे लक्ष असू द्या.
धन्यवाद.
-
स्नेहांकित
टीम मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११