लोकशाही - नवी व्याख्या

5 views
Skip to first unread message

Rashmi Kukade

unread,
Apr 12, 2014, 7:31:39 AM4/12/14
to Salaam_...@googlegroups.com
            *लोकशाही - नवी व्याख्या*
  ------------------------------


*दररोज शिस्तीचा भाग म्हणून वृत्तपत्र वाचणार्‍या बंड्याने त्याच्या बाबांना
विचारलं, ‘‘बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?’’

‘‘त्याचं असं आहे-’’ बाबा विचार करत म्हणाले, ‘‘हे बघ, मी घरात पैसे कमवून
आणतो. म्हणजे मी भांडवलदार; तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते
म्हणजे ती सरकार; आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणून ती झाली कामगार; तू
सामान्य नागरिक आणि तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं?’’

बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला
जाग आली. अंथरुण ओलं केल्यामुळं तो रडत होता. बंड्या आईला उठवायला गेला. ती गाढ
झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला. तर तिच्या खोलीत बंड्याचे
बाबा......

सकाळी बाबांनी बंड्याला विचारलं, ‘‘काय बंडोपंत, कळली का लोकशाही?’’

बंड्या म्हणाला, ‘‘कळलं बाबा. जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात
तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं. देशांची भावी पिढी मुलभूत सोयींसाठी रडत असते आणि
या सर्वांचा त्रास फक्त सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो !’’*
Reply all
Reply to author
Forward
0 new messages