मेघा कडून मला काय शिकता येईल?

83 views
Skip to first unread message

vedashree takalkar

unread,
Sep 11, 2012, 12:03:52 PM9/11/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम,
           मेघा हा निस्सीम श्रद्दावान होता.रावसाहेब साठ्यान्सार्ख्या श्राधावन भक्ताकडे तो नौकरी करत होता.त्याची शिवभक्ती पाहूनच साठे त्यांना साईंच्या कथा सांगत असतील.पण मेघाला सद्गुरू तत्वाची काहिक कल्पना नसल्यामुळे त्याच्या मनात विकल्प आला असेल.तो विकल्प घालवण्यासाठीच बाबांनी उग्र स्वरूप धारण केले असणार कारण तो परम्शिवा वाईट गोष्टींचा लय करतो.त्याचातील विकल्पांचा बाबांनी लय केला.एकदा विकल्प निघून गेल्यावर त्याला बाबांचीहे  ओढ वाटू लागली.याचा अर्थ सद्गुरू आणि आपल्यातील विकल्प रुपी भिंती पडल्यावरच आपल्याला त्या सद्गुरूचे खरे प्रेम अनुभवण्यास मिळते.हे प्रेम म्हणजेच लाभेवीन प्रीती!
           सद्गुरू हा आपल्या आयुष्यात नेहमीच हे रुद्ररूप फक्त आपल्यामधील असुर आणि वाईटच मारण्यासाठी धारण करतात.मातृवात्साल्याविन्दानाम मध्य पण बापूनी हेच सांगितले आहे कि ती आदिमाता आपल्या श्रद्धावानासाठी अनसूया रूप धारण करते आणि असुरांसाठी मात्र ती महिषासुरमर्दिनी रूप धारण करून ती वैताचा नाश करते.हे असुर थोड्याफार प्रमाणात आपल्या प्रतेय्का मध्ये असताच.बाबांनी त्यांच्या क्रोधातूनच मेघाच्या विकापाचे रुपांतर निस्सीम भक्तीत केले.
यातूनच मेघाचा १ भक्त म्हणून प्रवास सुरु झाला.ती भक्ती वाढत राहून शेवटी त्याला बाबाच शिव वाटू लागले.बलाने हत्त  करावा आणि आईने तो पुरवावा! तसाच मेघाचा बाबांना स्नान घालण्याचा हत्त बाबांनी प्रेमाने पुरवला.असा हत्त करण्याची हिम्मत फक्त खर्या प्रेमातूनच आणि सद्गुरुबद्दल असणार्या निरागस भावातूनच येतो.इथे ११व्या अध्यायातील डॉक्टर पंडितांची कथा आठवते.त्यांनी त्यांच्या सद्गुरूला बाबांमध्ये बघितले आणि जे कधीच कोणी करू शकले नाही ते पंडितांनी केले.बाबांनी त्यांच्या  कडून स्वतःच्या कपाळावर त्रीपुंद्रू आखून घेतला.अश्या भक्तांसाठी हरी विठ्ठल हा हारी विठ्ठल होतो.असा हा सद्गुरुवर निस्सीम प्रेम करणारा भक्त मेघा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे.मला माझ्या बापूंवर असेच प्रेम करता यावे,त्यांच्या चरणी माझा भाव कायम शुद्ध आणि निरागस  राहावा म्हणून मला हे साइसत्चरित्र नित्य वाचयला हवे व मेघा सारक्या भक्ताकडून शिकून माझं आचरण कसे बदलेल हे बघयला हवे!
                              हरी ओम !!!!
      
 
Vedahree Kedar Takalkar,
Pune

Reply all
Reply to author
Forward
0 new messages