'एक विश्वास असावा पुर्ता कर्ता हर्ता गुरु ऐसा 'श्रद्धेचे पुढचे पाऊल 'विश्वास'!
ह्या दोन पावलांतील अंतर समान असल्यावरच सदगुरूंकडे मार्गक्रमण सोप्पे होत जाते.
विश्वास हा शब्द उच्चारल्यावरच ;विष्णू असावा' , विष्णूचा वास असावा' हा भाव मनात उमटू लागतो ..
म्हणूनच श्रीसाईसच्चरीतात प्रत्येक क्षणाला ह्याचा अनुभव येतोच येतो.
श्रद्धेची कास धरणाऱ्या भक्ताच्या जीवनात, विश्वासाचे रुपांतर सबुरीत व्हायला लागते.
अशा भक्ताच्या जीवनात प्रगटलेला सदगुरू 'श्री हरी' त्याच्या जीवनात राहतो कायमचाच जन्मोजन्मी....
श्रीसाईसच्चरीतातील माधव रावांच्या साप चावल्याच्या कथेतून , काकासाहेब दिक्षित यांच्या बोकड कथेतून ,अशा अनेक कथेतून याचा प्रत्यंतर येतो.
या विश्वासाच्या जोरावरच सदगुरूंनी भक्ताच्या उद्धारासाठी लावलेली 'कप्पी' सहजपणे आपोआप वापरली जाते. आणि यातूनच पुढची पायरी चढता येते.
म्हणूनच श्रद्धेचे घट्ट पाऊल रोवून सदगुरूंचे बोट धरत विश्वासाचे पाऊल टाकल्यास कुठल्याही भवसागरातून पार जाताही येते अन
सदगुरूचा 'अनिरुद्ध' वास अंतरंगात उमटत राहतो १०८% ............
अंबिकावीरा माडचेट्टी
सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र. पुणे.