FW: That thing is called 'Management'! :)

6 views
Skip to first unread message

Vrinda Vijaykumar Panchawagh

unread,
Sep 27, 2013, 12:54:58 AM9/27/13
to sahyatr...@googlegroups.com
Hello Guys..



Kiti divas jhale, sahyatriche kahich updates nahi.. ya pasalyat ekhi trek nahi? mi samju shakte, tumhi ghari ani officemadhye khup vyast astal sadhya.. pan majhi khatri ahe pudhe ha group navin utsahane nakki parat suru hoil.. :) nuktach mala yethil eka group sobat tourla jaychi sandhi milali, tyanche kahi mudde share karat ahe, pudhe mage upyogi padtil :)





________________________________
From: Vrinda Vijaykumar Panchawagh
Sent: Friday, September 27, 2013 10:00 AM
Subject: That thing is called 'Management'! :)


इकडे आल्यापासून मला ग्र्यान्ड कॅन्यीअन बघायचे वेध लागले होते.. एकदा का थंडी सुरु झाली कि मग तिकडे जाणे अवघड होईल त्यामुळे लवकरात लवकर जायचे होते.. आता GC म्हणले कि लास वेगास LV येणारच.. दोन नवीन राज्ये बघायला मिळणार याची उत्सुकता वाढतच चालली होती.. नेहमीप्रमान मी एकटी होते.. माझे प्लानिंग सुरु झाले.. वेगास ही एकटी जाण्यासारखी जागा नाहीय असा घरून आदेश आला, आता काय करावे म्हणालं.. इकडे आल्यावर सान डीआगो येथे राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने, रश्मीने बस टूर्स बद्दल सांगितले होते.. त्यांच्या वेबसाईटवर बस टूर्सच्या बरेच पर्याय दिसले.. एक दिवसाची सुट्टी घेऊन मी ३ दिवसांचा प्लान निवडला.. या बसटूर बद्दल काही ठळक मुद्दे आवर्जून सांगावेसे वाटत आहे.



-> चायनीज लोकांनी चालवलेल्या या टूर्स अमेरिकेत अतिशय प्रसिद्ध आहेत.. आमच्या दोन मोठ्या ५० सीट्सच्या बस भरल्या होत्या.. इस्ट, वेस्ट आणि इतर ठिकाणी यांच्या छोट्या अन मोठ्या कालावधीच्या ट्रिप्स आहेत.
-> या टूर्स प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे पैसे.. अतिशय स्वस्तात चांगल्या योजना यांनी बनवल्या आहेत. २००$ मध्ये दोन जणांचा ३ दिवसांचा बस आणि हॉटेलचा खर्च.. जाऊन येउन जवळपास ११०० माइल्स प्रवास..
-> स्वस्त असले तरी गुणवत्तेत कुठेही कमतरता नाही.. हॉटेल्स अगदी भारी ,प्रशस्त आणि मोक्याच्या ठिकाणावरचे. वेगासमध्ये सर्कस सर्कस या हॉटेल मध्ये आमची राहायची सोय केली होती.. एका मोठ्या प्रशस्त रूम मध्ये दोन डबल बेड होते, त्यात मी एकटी होते.. अजून तीन मैत्रिणी असल्या असत्या सोबत तर ५०$ मध्ये हि ट्रीप कसली भारी झाली असता असा विचार डोक्यात येऊनच गेला..

-> टूर्सची प्रसिद्धी वाढवण्यासाठी त्यांनी बर्याच सवलती - योजना उपलब्ध केल्या आहेत.. जसे कि २ जण असतील तर तिसर्याचे बुकिंग मोफत इत्यादी. ग्रुप असेल फारच स्वस्तात होतात या ट्रिप्स.

-> जेवणाचा खर्च आपला आपला करायचा होता.. हे फार बरे केले त्यांनी.. कारण जेवणाचे आधीच पैसे घेतले कि मग त्यांनी दिलेले आपल्याला आवडले नाहीतरी मुकाट्याने खावे लागते असा भारतातील काही टूर्सचा माझा अनुभव आहे :) शिवाय इथे -शाकाहारी पदार्थ किती कमी मिळतात.. त्यामुळे ही गोष्ट मला आवडली.

-> LV येथे नाईट टूर्स, वेगवगळे shows असे बरेच पर्याय दिले होते, पैकी आपल्याला ज्यामध्ये रस आहे ते निवडून त्याचे वेगळे पैसे आपल्याला द्यायचे होते.. हा सुधा प्रकार चांगला होता कारण ज्याला जे आवडेल ते तो बघेल आणि आपल्या आपल्या बजेटप्रमाणे खर्च करेल.. लास वेगास येथे अतिशय सोबर ठिकाणीच त्यांनी आम्हाला फिरवले याचे आम्हाला विशेष वाटले..

-> GC येथ वेस्ट रिम आणि सोउथ रिम अशा दोन वेगळ्या एकदिवसाच्या टूर्स होत्या.. हा पर्यायपण त्यांनी आपल्यावर सोपवला होता.. ज्याला जे बघायचं त्याने तिकडे जावे, जायची यायची बस त्यांची होती व तेथील प्रवेश फी आपली आपली द्यायची होती. त्यांना अमके अमके कमिशन मिळते म्हणून ते हेच निवडा हा प्रकार इकडे अजिबातच नव्हता.. मला आपल्या इकडच्या काही ट्रिप्समध्ये असे अनुभव आले आहेत.. त्यामुळे या लोकांचे कौतुक वाटले.

-> टूरचा प्लान सविस्तरपणे आधी सांगितला गेला होता. आणि वेळापत्रक अगदी काटेकोरपणे पाळले गेले.. चीनी टूर मनेजर छोटुसा गोड चपळ होता.. :)
-> बसने जास्त प्रवास होता तर ती बस एकदम आरामदायक आणि वातानुकुलीत होती. खिडक्या मस्त मोठय होत्या, बाहेरचा प्रवास छान एन्जोय केला मी.. बसमध्ये माईकवर तो मनेजर मध्ये मध्ये माहिती सांगायचा. मध्ये मध्ये चांगल्या ठिकाणी ब्रेक घेतला जात असे.

-> चीनी लोकांनी चालवलेला ग्रुप असल्याने बरेच चीनी पर्यटक लोक येतात. इकडे आलेला अनुभव खास सांगावा वाटतो.. तो मनेजर प्रत्येक वाक्य आधी इंग्रजी आणि मग चीनी भाषेत बोलायचा.. आता अमेरिकेत राहणाऱ्या चीनी लोकांना काय इग्रंजी कळत नसेल का? पण आपल्या देशाचा ,आपल्या भाषेचा अभिमान आणि आदर! याउलट माझ्या शेजारी दक्षिण भारतीय स्त्री बसली होती. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या.. सुरुवातीलाच ती म्हणाली कि मला हिंदी बोलता येत नाही, समजतही नाही! पहा! ती काही महिन्यापूर्वी भारतातूनच इकडे आली होती.. असो.

-> अजून एक गोष्ट मला या लोकांची फार आवडली ती म्हणजे आम्ही काहीही न सांगता त्यांनी आम्हा भारतीय लोकांना जवळजवळचे सीट्स दिले होते त्यामुळे आमचा छान ग्रुप झाला होता.. मी एकटी आहे असे मला बिलकुलच जाणवले नाही.. एक दक्षिण भारतीय जोडी ,त्यांच्या ३ वर्षाच्या मुलीसोबत.. एक उत्तर भारतीय जोडी ,त्यांच्या १७ महिन्याच्या मुलीसोबत.. एक तरुण मुलगी,पूजा तिच्या आईसोबत असे ३ कुटुंब माझ्यासोबत होते.. पूजा आणि माझी नंतर बरीच गट्टी जमली हे वेगळे सांगायला नको ;)



थोडक्यात काय तर या ट्रिप्स अतिशय विचार करून, पर्यटकांच्या सोयी लक्षात घेऊन आयोजित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे जास्त पर्यटक आकर्षित होऊन त्यांनाही भरपूर फायदा होतो आणि पर्यटकांनाही ट्रिपचा आनंद मिळतो! :)




http://www.taketours.com/los-angeles-ca/la-to-las-vegas-grand-canyon-south-rim-3-day-tour-373-178.html

**************** CAUTION - Disclaimer *****************
This e-mail contains PRIVILEGED AND CONFIDENTIAL INFORMATION intended solely
for the use of the addressee(s). If you are not the intended recipient, please
notify the sender by e-mail and delete the original message. Further, you are not
to copy, disclose, or distribute this e-mail or its contents to any other person and
any such actions are unlawful. This e-mail may contain viruses. Infosys has taken
every reasonable precaution to minimize this risk, but is not liable for any damage
you may sustain as a result of any virus in this e-mail. You should carry out your
own virus checks before opening the e-mail or attachment. Infosys reserves the
right to monitor and review the content of all messages sent to or from this e-mail
address. Messages sent to or from this e-mail address may be stored on the
Infosys e-mail system.
***INFOSYS******** End of Disclaimer ********INFOSYS***

Dhruva Mulay

unread,
Sep 27, 2013, 1:57:48 AM9/27/13
to Vrinda Vijaykumar Panchawagh, sahyatr...@googlegroups.com
Thanks Vrinda.

Sadhya Sahyatri stale mode madhe ahe. Pan parat suru hoil, karin ashi
mala asha ahe.
Baghoo

Thanks,
Dhruva From: Vrinda Vijaykumar Panchawagh
Sent: ‎27-‎09-‎2013 10:25
To: sahyatr...@googlegroups.com
Subject: [Sahyatri Gadkot] FW: That thing is called 'Management'! :)
--
To post to this group, send an email to
sahyatr...@googlegroups.com. For more options, contact Dhruva
---
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Sahyatri Gadkot" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
an email to sahyatri_gadk...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

Shashank Gujarathi

unread,
Jan 22, 2014, 4:05:53 AM1/22/14
to sahyatr...@googlegroups.com, Vrinda_P...@infosys.com, sahyatr...@googlegroups.com
Hi All,

In today's Loksatta online edition blogpost of Salher-Mulher trek is posted.
 
Dhruva remember in August 2012 we had gone there :)
 
 
Regards,
Shashank

=====-----=====-----=====
Notice: The information contained in this e-mail
message and/or attachments to it may contain
confidential or privileged information. If you are
not the intended recipient, any dissemination, use,
review, distribution, printing or copying of the
information contained in this e-mail message
and/or attachments to it are strictly prohibited. If
you have received this communication in error,
please notify us by reply e-mail or telephone and
immediately and permanently delete the message
and any attachments. Thank you

Reply all
Reply to author
Forward
0 new messages