Adding sahyatri email id as well to keep data centralized.
Forgot to add
अंदाजे खर्च : जेवण, न्याहारी , प्रवास धरून 200 ₹ INR जास्तीत जास्त
http://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE
Or
http://en.m.wikipedia.org/wiki/Tikona
नाव: तिकोना (वितंडगड)
उंची: 1092 मी.
प्रकार : गिरिदुर्ग
चढाई : 200 मी.
श्रेणी : सोपी
ठिकाण: मावळ, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
पायथ्याचे गाव : तिकोना पेठइतिहास
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत अ त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा टंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.
गडावरील ठिकाणे
गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळि व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा
तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
मार्ग
पुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून
काळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.
http://sahyadripratishthan.com/sahyadri/tikona-fort/
--
To post to this group, send an email to sahyatr...@googlegroups.com. For more options, contact Dhruva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Sahyatri Gadkot" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to sahyatri_gadk...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.