दिवाळी आली दिवाळी आली
पहाट झाली पहाट झाली
सडा घालोनी माय घालते
बहुरंगांची दारी रांगोळी।
दिवाळी आली दिवाळी आली
पहाट झाली पहाट झाली
उजळल्या ज्योती पणत्यांचे रुपी
तारे आकाशीचे उतरले दारी।
दिवाळी आली दिवाळी आली
सरले मनीच मळभ रातीच
नाही कळल कवा पडल
सपान मला बये नवतीच।
दिवाळी आली दिवाळी आली
सांजच्या पारी सांजच्या पारी
चमचमल्या चांदण्या तारका रुपेरी
आकाश कंदील लागले दारी।
....... श्रीकांत फाटक