एकदा Ego विकून पहा.....
जेव्हा कोणीही घेणार नाही
तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट
आपण इतके दिवस बाळगत होतो...???
बोलावे तर विचार करुन....
नाहीतर बडबड सगळेच करतात....
ऐकावे तर अंतःकरणातून.....
आरोळी तर सारेच देतात....!
टिपावं तर अचूक टिपावं....
नेम तर सारेच धरतात....
शिकावं तर माफ करायला....
राग तर सगळेच करतात....!
खळगी भरावी तर उपाशी पोटाची....
पोट भरुन तर सारेच जेवतात....
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...
सुखाचे घोट तर सारेच घेतात...!
जगावं तर इतरांसाठी....
स्वतःसाठी तर सगळेच जगतात....
ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...
घात तर सारेच करतात...!
दुःखामधे सुधा रहावं हसत
वेळ तर सर्वाँचीच येते....
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
राख तर सर्वाँचीच होते.......