213 views
Skip to first unread message

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:27:32 AM4/14/14
to
रंगलेल्या रात्रीतले मम 
स्वप्नं ते विसरून गेले 
         प्रिया होती माझी तेव्हां
मन नीरस नाहीं झाले
आज परंतु तिच्या अभावी
सौख्य मना नाहीं शिवले ।
         क्षणो-क्षणी झिजून तिने
मंदिर एक उभे केले
उध्वस्त संसारात माझ्या
धर्मशाळेचे रूप आले ।
         आज परंतु फक्त मागे
मंदिर राहिले दुभंगलेले ।
उध्वस्त तो संसार अन
मंदिर ते दुभंगलेले
         त्यांतच माझ्या जीवनाचे
थडगे आहे बांधलेले ।।

--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:27:39 AM4/14/14
to

आज पुन्हा नव्या जोमाने,

प्रेमाची बाजी मी खेळणार आहे.....

तुला माझ्यासाठी जिँकताना पाहून,

स्वतःच पराभव मी पत्कारणार आहे.....

माझ्या अधु-या राहीलेल्या स्वप्नांना,

तुझ्या साथीने मी खरी ठरवणार आहे.....

तुला प्रेम जाळ्यात फसवून,

माझ्यात पुर्णपणे मी गूंतवणार आहे.....

आणि.....!!!

Love नावाचा Timepass,

तुझ्यासोबत LifeTime मी करणार आहे.....
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)


सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:27:45 AM4/14/14
to
खूप काही लिहावेसे वाटते ,पण शब्दच सुचत नाहीत 
हातात हात घालून फिरावेसे वाटते ,पण पायच पुढे सरकत नाहीत 
मनामध्ये प्रेम आहे पण व्यक करता येत नाही . 
सगळ काही आलबेल आहे ,पण मनच शांत नाही 
विचारच काहूर माजलंय त्याला वाचा फुटतच नाही 
आनंद सगळा सावडायचा आहे ,पण दुखः च दूर सारता येत नाही 
मन सारख धावत त्याला थांबवताच येत नाही 
खूप काही करावस वाटत ,पण कृति घडतच नाही 
येणारया म्हातारपणाच ओझं घेऊन तरुणपण जगताच येत नाही 
खूप काही सांगायच आहे ,पण ओठी शब्दच येत नाहीत 
आयुष्य म्हणजे तगमग,तडफड ह्या शिवाय काहीच नाही .

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:27:56 AM4/14/14
to

किती दिवस असतात प्रेमाचे 
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे 
डोळ्यात उतरलेल्या प्रेमळ स्वप्नांना 
कितीवेळ असेच पहायचे ..........

आनंद असतो प्रेमात  
जेव्हा तुझा हाथ हातात असतो 
मिठीत तुझ्या असताना दुखांचा भास अदृश्य असतो 
जगायचे असतं आयुष्य तुझ्या सहवासातच 
पण का असे दृष्ट लागते प्रेमाला 
वळणे येतात मध्येच धोक्याचे .....................


किती जपायचे हे नातं मीच नेहमी 
तू ही आता जपतजा  
खचतो मी सांभाळताना त्यांना 
तू येउन सांभाळत जा .............

खूप नशिबाने मिळतं हे नातं 
म्हणूनच डोळ्यांना काहींच्या खुपसत असतं 
अन आपल्या प्रेमाच्या   सागराला  
वादळरुपी दिशाहीन करीत असतं ..............


नाही जमत प्रत्येक  भावना असे 
तुझ्यापासून लपवणं
तू तेव्हा माझ्या हृदयाचे दुख थोडे समजत जा .........

किती दिवस असतात प्रेमाचे 
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे 
जपताना कळतं हे  प्रेम आहे खरेच  धोक्याचे ............ 

-
प्रशांत डी शिंदे 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:01 AM4/14/14
to
 माझा मित्र गोविंद याच्या गझले वरून लिहिलेली ही गझल (त्याच्या पूर्व परवानगीने) 
 
घरोघरी माणसे मिळाली 
परोपरी माणसे मिळाली 
 
वारकरी लोकांच्यात मला 
कामकरी माणसे मिळाली 
 
काट्या सारखा सललो तरी 
फुलांपरी माणसे मिळाली
 
मुखवटयांच्या जगात सुध्धा
खरीखरी माणसे मिळाली
 
लग्न करून सोयरिक जुळली 
त्याच घरी माणसे मिळाली 
 
छळले जरी मला काहींनी 
तशी बरी माणसं मिळाली
 
मेला तो एकटाच होता 
बघा तरी माणसे मिळाली 
 
शेवट तो एकटाच गेला
किती जरी माणसे मिळाली
 
 
केदार...

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:06 AM4/14/14
to
आठवते का तुला, तुझे ते चोरून पाहणे मला,
  माझ्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी होणारी तुझी धडपड......,
   खर सांगू मन माझे हि व्याकूळ व्हायचे तुला पाहायला......!!!!
त्यावेळी मलाही असेच वाटायचे, 
  पण लाजाळूच्या झाडापरी मी लाजायचे.....
पण एक सांगू तुला, तू आधी विचारावेस असेच वाटायचे मला,
  तेही क्षण आजही आठवतात मला अन तुला.......
त्या क्षणांना तू माझ्या आयुष्याचे सोबती बनवलेस,
  माझ्याशी लग्न करून तू मला स्वताचे नाव दिलेस......
तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
  तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे......
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
 या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे.......
प्रेम तुझे माझे कधी लपलेले, कधी मनात दडलेले,
  आणि आता सार्या जगासमोर मांडलेले.......
संसाराची हि सुरुवात तुझ्या सहवासाने गोड झाली,
  माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली.......
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे......!!!!
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे.........!!!! @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:12 AM4/14/14
to

फक्त एक kiss 
==============
फक्त एक kiss 
तुझ्याकडून हवाय मला
तो गंध प्रीतीचा
अर्थ देईल जगण्याला
तोच दूर करेल
तुझ्या माझ्या दुराव्याला
कवटाळून ठेवीन हृदयात
मी त्या क्षणाला
फक्त तू इतकंच कर -२-
तुझं मन निरागस कर
निर्मळ होईल मन तेव्हा
माझ्या गालाला स्पर्श कर
तुझ्या ओठांच्या पाकळ्यांचा
गंध माझ्या श्वासात भर
माझं देहभान हरपून
मला तुझा कर
मी बघेन वाट प्रिये
तुझ्या निरागस होण्याची
फक्त एक kiss  हवाय 
राहिलं आठवण तुझ्या प्रेमाची .
===================

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:17 AM4/14/14
to
कवी म्हणुन घेण्यात अर्थच राहिला नाही 
खरंच हो अजुन मला काहीच येत नाही 
शब्द कधी जुळतात तर कधी जुळत नाही 
जे आठवतं तेव्हा ते कागदावर उतरत नाही 

जीवन कसे आहे ते अजुन कळलेच नाही 
एवढ्याशा बालपणास मोठंपण ते आलंच नाही 
ज्याला कळत सारं ते शहाण्यासारखे वागत नाही 
शहाणपण येतं ज्याला लोक त्याच ऐकत नाही 

खेळतात असे खेळ जे कधीच संपत नाही 
डावातल्या सोंगट्याना मनाप्रमाणे खेळता येत नाही 
आपलेच लुटतात आपल्याला परके आपलेसे होत नाही 
विश्वासाचे कच्चे धागे तुटल्यावाचुन राहत नाही 

ओळखतात क्षणात दुस-याला स्वतास ते ओळखत नाही 
पापी म्हणतात निष्पापाला पुण्ये त्यांची दिसत नाही 
दगडं मारतात जी एखाद्या जीवाला इथे 
जणु पाप कधी आयुष्यात त्याने केलंच नाही.
कवी-गणेश साळुंखे...! 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:21 AM4/14/14
to

गुजरातच्या भूमीमध्ये परिवर्तन झालंय.
मोदींच्या नावाने तीथे 
चमत्कार होवू लागलाय.
हरित क्रांतीनंतर धवल क्रांती 
आणि, त्यानंतर आता 
आर्थिक विकासाची नांदी.
वाळवंटाचही नंदनवन 
केलंय म्हणे त्यांनी,
शेतीनंतर आता उद्योगातही भरारी.
गुजरातच vibrant समेट
ही घडवून आणलंय.
प्रगतीचे सूर वाहू लागलेत कानी,
आजकाल त्यांची चर्चा 
PM पदासाठी गेलीय.
आता भारताच्या विकासासाठी,
मोदींचा गुजरात फॅक्टर हवांय.
कवी :- प्रविण काळे (PK)

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:41 AM4/14/14
to
नाते फुलांचे सारयांशी             
आपसूक का होत जाते?   
वाटून गंध सगळ्यांना 
सूर मात्र काटयांशी होते !

ङोळयांची अन सागराची
खोली का एक असते ?
म्हणुनच का दोन्ही कडे                     
कायम तसेच पाणी वसते ?

उधळून आयुष्य मी
सारेकाही गमविले होते,
घेउनी फाटकी झोळी                         
हात माझे रिते होते !

नाही दु:ख मजला त्याचे
सारेकाही मला हवे होते,       
तेंव्हाही मी हसत होतो
जीवनात जेंव्हा दु:ख होते ! 
  


© शिवाजी सांगळे 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:28:50 AM4/14/14
to
तुझा Message...

तुझ्याच message ची वाट पाहत असतो
येण्याची चुणूक लागताच श्वास गहिवरतो 
mobile ढगांसारखा गडगड करत असतो 
आणि मन विजा बनून कडाडत असतो 

message आला कि गडगडण,कडकडण नाहीसा होतो 
मन टपोरया गारांसारखा बरसतो 
शब्दरूपी गारा वेचता वेचता अंग शहारतो 
कारण तुझ्या भावनांच्या पावसात भिजायला हा message च अपवाद असतो . 

message नाही आला तर mobile ची स्पंदन थांबतात 
रोखून धरलेले हुंदके , 
आसू आतल्या आत तुटतात 
अश्रू मधून कधी ते नकळतच गळतात..

प्रसाद गावंड

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:04 AM4/14/14
to
तथकथित उच्च अभिरुचीचा 
झगझगीत झगा घालून
मी निघतो जेव्हा रस्त्यानं
जागोजागी ठिगळ लावलेले 
जुने दमट कोट अवघडले  
दिसतात मला बसलेले कोंबून 
त्या त्यांच्या वडिलोपार्जित 
शिसवी खुर्च्यातून 
अवघी हवा जड होते
जाते ओशाळून 
नकळत मग मी ही 
तो माझा झगा उतरवून 
त्या खुर्च्यामध्ये बसतो जावून 
कारण.. 
शेवटी महत्वाच असत 
जगणं !!
कुणाच्यातरी सोबत 
घेत काहीतरी वाटून 

विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:08 AM4/14/14
to
कसं जगावं तर अस जगावं 
रडत असूनही हसत राहावं 
दुखा:त असूनही सुखात राहावं 

कसं जगावं तर अस जगावं 
वादळा समोर पर्वता सारखा उभं राहावं 
नदी वरले धरण बनाव

कसं जगावं तर अस जगावं
गांधीजीनचा बर्फ डोक्यावर ठेवून 
सावरकरांच्या आगीत राहावं 

कसं जगावं तर अस जगावं 
ध्येया साठी काय वाटेल ते करावं 
आपलं सर्वसं जणू अर्पुनी द्यावं 

असं जगावं हे असंच जगावं 
केवल श्वासा साठी नव्हे तर 
जगण्यासाठी जगण असावं

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:17 AM4/14/14
to
तिचे त्याचे प्रेम म्हणजे 
उधान वारे वाहने असते 
नदी ओढा कालवा ओहळ 
पाण्यास नाव देणे असते 
गडद काळोखी जगात भरता 
साथीस सदैव चांदणे असते 
निबिड निर्जन गूढ वनात 
पायी गुणगुण गाणे असते 
तिची साथ असो नसो वा 
तिच्याच साठी जगणे असते 
कधीतरी नक्की भेटेन ती 
म्हणून स्वप्न पाहणे असते

 
विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:26 AM4/14/14
to
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधशील तू मला.....

पण ???

काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला.....

पण ???

अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
स्पर्श करण्यास तरसशील तू मला.....

पण ???

विरहाच्या जाळ्यात फसलेली,
एकटी दिसेल मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तू मला.....

पण ???

तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना,
दिसणार नाही मी तुला.....

तुझ्याविणा जगावस वाटत नाही रे,
खुप एकटी समजतेय रे स्वतःला.....

कारण ???

तुझी खुप आठवण येते रे मला,
विसरु शकत नाही रे मी तुला.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:39 AM4/14/14
to
अहो चा मी आता 
मिस्टर झालो आहे 
पुसलेल्या संसाराचा 
डस्टर झालो आहे 
नाही त्यात आता 
काही वाउगे नाही 
शोभेचेच मी एक 
क्लस्टर झालो आहे 
देणे घेणे कुणाशी 
उरले न काही माझे 
जगण्याचे वरवर 
जस्टर झालो आहे 
आणिला कुठून कुणी 
टोचेना टोचून जो  
शब्द इंग्रजी एक 
स्टिकर झालो आहे 


विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:46 AM4/14/14
to
कधी कळले नाही मन माझे तुझे झाले,
 तुझ्यासवे संसार करण्याचे स्वप्न आज साकारले......
सुख पावसासम यावे, आयुष्य अन हे भिजावे.,
  तुझ्याच मनात नेहमी घर एक माझे वसावे........
तुझी भार्या म्हणून आले सगे सोयरे टाकून पाठी,
  तुझ्यातच सारे जग पाहते मी, जीव अडकतो तुझ्याचसाठी.....
चूक माझी नेहमी असते, पण शिक्षा मात्र स्वतास करतोस,
  कधी दूर असेन मी तुझ्यापासून तर लहान मुलासारखा रडतोस......
साथ तुझी मला आयुष्यभरासाठी हवी आहे,
  तुझीच राणी बनून मला या जगात राहायचे आहे......
या जन्मी नाही रे पुढील सात जन्म तुझ्यासाठी जन्मेन मी,
    तुझीच सावली बनून तुझ्या आजूबाजूला दिसेन मी........
फुलांच्या गंधात तुझाच सुवास घेते मी,
  सूर्याच्या किरणांत तुलाच शोधते मी......
खूप प्रेम करते मी तुझ्यावर,
   तुलाच प्रत्येक श्वासात मागते मी......
प्रेमदिनाच्या या दिनी तुला दुसरे काही मागत नाही,
   काही चुकले असेल माझेही पण प्रेम माझे तुझ्यावरील खोटे नाही.....
द्यायचेच झाले तर तुझ्या प्रत्येक क्षणातील एक क्षण दे,
   प्रेमाच्या या वाटेवर मला एकटे सोडू नकोस एवढेच मागते मी......
जगात सारे काही आहे खूप सुंदर,
  पण तुला कसे सांगू कि तूच आहेस माझे विश्व आणि अंबर......
काटेरी आहेत वाटा खडतर आहेत रस्ते
  जखमा होऊ देऊ नकोस रे खूप टोचतात हे विरहाचे काटे....... @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:29:57 AM4/14/14
to
आठवणीत रमताना कुणाच्या कधीतरी,
  नकळत ओठांवर हसू फुलावे एकदातरी.....
अशी गोड आठवण साठवून मनात,
   का भास होतात दूरचे जवळ असण्याचे क्षणात......
डोळ्यात गोड स्वप्नांची एक रास रचताना,
  नकळत कधीतरी पापणी उघडता दोन थेंब सांडताना.......
विचारात कुणाच्यातरी स्वताला गुंतवावे,
  मनाचा तो आनंद सांगता न यावे......
लाजाळूच्या पानापरी हळूच लाजावे,
   कुणी समोर येताच पुन्हा स्वतास सावरावे.......
एका क्षणाचा तो मोह न मला आवरता यावा,
   आणि तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचा सदा साक्ष देत राहावा........ @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:03 AM4/14/14
to
ती आवडली मला पण, नाही विचारले मी तिला..
Delete करेल Friend list मधून ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला....
       बोलणार नाही माझ्याशी, म्हणून....
       चूकीच्या नजरेने पाहील ती मला, म्हणून....
एक गैरसमज करून घेईन
ती माझ्याबद्दल, म्हणून....
सामोरा कसा जाणार तिच्या, म्हणून....
भेटून सुद्धा नाही भेटणार, म्हणून....
       कोणाला सांगूही शकणार नव्हतो,
       किती आवडते ती मला, म्हणून....
       कसा सांगणार मी तिला
       कि खूप आवडते ती  मला
       भीती वाटते एका 'नाही'ची, म्हणून.....
अजून किती Valentine days निघून जातील ?             
पण, नाही विचारणार मी तिला...
राहू दे मला या गोड गैरसमजूतीत,
कि "आवडतो मी तिला....".

प्रविण काळे (PK)

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:14 AM4/14/14
to
असाच आहे मी …………………संजय निकुंभ  
===========
किती धुंद क्षण जगलो 
कधी एकांतातही रमलो 
तरी हातात हात घेण्या पलीकडे 
माझी मजल नाही गेली

किती उफाळल्या भावना 
कधी बेभानही झालो 
तुझे गाल दिसले आरक्त 
तरी दूरच मी राहिलो 

तुझ्या डोळ्यातले भावं सांगत होते 
किती वेडा आहे मी 
तू घे नां किस माझा 
मी तुला सांगत राहिलो 

प्रश्नांच वादळ … दिसलं तुझ्या मनात 
असा कसा आहे मी 
जो पुढाकार मी घ्यावयास हवा 
तो तुला कसा सांगतो मी 

पण याचं गुपित आज 
मी तुझ्यापुढे उलगडणार आहे 
जे स्वप्न पाहिलं नव्हतं कधी 
ते प्रेम …… तुझ्या रूपांत भेटलं आहे 

म्हणून हे प्रेम …. हातून निसटेल की काय 
याचं दडपण माझ्या मनावर …. 
अन मी ठरवलंच आहे 
तुला पहिला किस केलाच तर करीन पावलांवर 
कारण प्रीतीचे पाउल घेवून तू आलीस जीवनात 
अन स्वप्नवत करून टाकलस माझं अवघं आयुष्य . 
--------------------------------------------------------
दि. ११. २ . १४  वेळ : २.४५  दु. 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:20 AM4/14/14
to
[सर्व प्रथम प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची माफी मागतो. कारण त्यांची पण अशीच एक कविता आहे. पण हा माझा केविलवाणा प्रयत्न आहे.]
**
प्रेम कुणीही कुणावर करावे.. पण ..
त्यात नसावा स्वार्थ ..निर्व्याज, निष्पाप .. असावे प्रेम 

प्रेम फुलांवर करावे, प्रेम पानावर करावे,
प्रेम फुलपाखरावर करावे, प्रेम मुलांवर करावे,
प्रेम दुसऱ्यावर करावे, प्रेम स्वतःवर करावे,
प्रेम पावसावर करावे, प्रेम गवतावर करावे,
गवतावरच्या दवावर करावे,
प्रेम रानफुलावर करावे, प्रेम काळ्या मातीवर करावे,
प्रेम आईवर करावे, वडिलांवर करावे,
साऱ्या कुटुंबावर करावे, प्रेम भावावर करावे,
बहिणीवरही प्रेम करावे,
"सुंदर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर प्रेम करावे,"
प्रेम देवावर करावे, भक्तीवर करावे,
मन बहरून टाकणाऱ्या सुगंधावर करावे,
स्वतः जळून दुसऱ्यास प्रकाश देणाऱ्या,
ज्योतीवर करावे, प्रेम प्रेमावर करावे,
प्रेम कुणीही कुणावर करावे,
निरागस बालकांवर करावे,प्रेम अनाश्रीतावर करावे,
आश्रीतावर करावे, प्रेम उन्हातान्हात राबणाऱ्या रांगड्या कामकारयावर करावे,
प्रेम मध माश्यांवर करावे,तर कधी भुंग्यावर करावे,
प्रेम शक्तीवर करावे, प्रेम भक्तीवर करावे, 
सागराला प्राशन करणाऱ्या "अगस्ती" वर पण करावे,
प्रेम म्हातारयांवर करावे, लंगड्या-पांगळ्या वर करावे,
आजारी माणसांवर करावे प्रेम, 

प्रेम अखंड करीत राहावे, प्रेम साऱ्या विश्वावर करावे,
कारण प्रेम प्रेम असते, निस्वार्थ - निरागस 
अशी देवाची देन असते.
*******************************************************************>
स्वरचित : श्री. प्रकाश साळवी    :)

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:26 AM4/14/14
to
पापण्यांत माझ्या स्वप्ने तुझी भरलेली असायची
नकळत ती सारी चेह-यावर कधी ओघळून आली कळलेच नाही.....
तुझ्या सोबत आयुष्य नव्याने सुरु झाले होते 
सुरुवातीचा शेवट इतक्या लवकर कधी आला कळलेच नाही ......
तुझा हात हातात घेऊन तासनतास चालायचो ..... 
हातामधले हात सुटले कधी कळलेच नाही .......... 
तुझं निरागस हसू पाहून मीही जरा हसायचो 
हसता हसता डोळे भरून कधी आले कळलेच नाही.................. 
तुझ्या चेह-यावर पडलेले पावसाचे थेंब तळहातावर झेलायचो 
आज तोच पावसाचा थेंब गालावर कधी सांडला कळलेच नाही................
तुझ्या प्रेमात नव्याने जगायला शिकलो मी 
पण ते आयुष्य क्षणिक कधी झाले कळलेच नाही .....................

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:45 AM4/14/14
to

कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा 
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा 
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना 
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा......
स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता 
कारण त्या स्वप्नात तू नाहीस 
स्वप्नात का होईना एकदा येऊन जा...... 
हात रिकामा भासतोय मला 
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा.......   
बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू 
त्या गर्दीत भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला 
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ........
तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही 
एकदा फक्त येऊन त्या वेड्या मनाला हे समजावून जा ... 
फक्त एकदा येऊन जा......... 
फक्त एकदा येऊन जा .......

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:54 AM4/14/14
to
.फुलला गुलमोहोर तुझ्या अंगणी.....
 
हाती कोमेजल्या पाकळ्या माझ्या त्या तशाच राहुदे.....
 
विस्फारुनी जग पाहता रूप तुझे
 
विरहाच्या तिमिरात चाचपडणा-या पापण्या माझ्या तशाच मिटू दे.....
 
मनी माझ्या अव्यक्त भावना अन शब्दांचे सडे
 
उतरले थेट त्या पाना-पानावर ते तसेच राहू दे............
 
संवेदना मनी माझ्या कोरल्या हाती आज तुझ्या
 
कोवळया मेंदीचा तो रंग पुसटसा माझ्या आठवणीसारखा तसाच राहू दे .....

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:30:59 AM4/14/14
to

जेव्हा  जेव्हा  वाचून दाखवते मी त्याला कविता 
तो म्हणतो पुरे कर आता

काय पडल ह्या शब्द जोडण्यात 
ट ला ट आणि म ला म लावण्यात 

अग विज्ञान बघ किती पुढे गेलय
अन तुझ सार लक्ष्य कवितेतच लागलय

त्याला कस कळत नाही 
श्वासात माझ्या कविता 
पण विज्ञानात रुची नाही 

विज्ञानाचा मला गंध नाही 
कवितेचा त्याला छंद नाही 

विज्ञान जरी मला कळत नसल
तरी संसारच गणित जमत 

शब्द हि न बोलता
 त्याला माझ्या मनातल सार कळत 

...सुनिता.

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:05 AM4/14/14
to
ब्रह्मगिरी पायथ्याशी   
धन्य तीर्थी कुशावर्ती 
जागा अजुनी निवृती 
दान देण्यास भक्ती 
कोण कालसर्प यजी  
कोण नागबली करी 
रत्नं देतोय निवृती 
माती जमवती सारी 
त्यांच्या कृपा कटाक्षाने 
पार जीवन मरणे 
उगा तरीही भितीने 
घर भटांचे भरणे 
येता कैवल्य जीवनी 
दिली झुगारूनी कुडी
त्यांच्या समोर किती      
दीन लाचार बापुडी 


विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:14 AM4/14/14
to

मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू हसायची,
या कुंद कळयांना अनं,
मोहर कुठून फुटायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तु बघायची,
मन तुझ्यात गुंतायचं,
अनं तुझ्या त्या केसात
गारवा कुठून यायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू पाहायची,
मन स्वप्नात रमायचं,
अनं पाहताना तुला
माझं भान नाही उरायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू बोलायची,
एकटक  पाहवसं वाटायचं....
तुझ्या त्या ओठांचा स्पर्श,
शब्दांनी कसं जाणायचं..
मला तू खुप आवडायची.... 
- स्वप्नील चटगे  

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:20 AM4/14/14
to
ओठांचे कोडे...!!

माझ्या प्रेमळ मिठीत,
पिल्लू तू आल्यावर....

तू अचानक नकळतपणे,
अबोल होवून जातेस....

करुन न समजणारे,
ते खट्याळ ईशारे.....

नजरेने नजरेशी,
खुप काही बोलतेस....

गुंतवून पुरेपूर,
तुझ्यात मजला.....

स्वतःला विसरायला,
मला भाग पाडतेस.....

खुप खुप छान वाटत,
पिल्लू मला तेव्हा.....

जेव्हा तु ओठांचे कोडे,
ओठांनी सोडवतेस.....

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:24 AM4/14/14
to
प्रेमाची नजर…………………………संजय निकुंभ 
----------------------------
नजरेची भाषा कळली की 
मन कळायला लागतं 
अबोल राहिले ओठ तरी 
हृदय समजायला लागतं 

जाणीवा साऱ्या मनीच्या
डोळ्यात दिसायला लागतात
भावना त्या प्रीतीच्या
काळजाला कळायला लागतात

हृदयात प्रेम उमललय
हृदयाला बरोब्बर कळतं 
माझं तुझ्यावर प्रेम आहे
न सांगताही कळतं 

प्रेमाची सुरवात नेहमी
अबोल कशी असते
कळत नाही प्रियेच्या
प्रीत नजरेत कशी दिसते

फक्त ती नजर
वाचता यायला हवी
जी प्रीत आपली आहे
ती ओळखता यायला हवी .
----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:30 AM4/14/14
to
आज ती नाहीं म्हणून
जीवनांची रंगत सरली
आठवणीने तिच्या अन
सारी रात्र संपून गेली ।

आज ती नाहीं म्हणून
स्मृतिंना उधाण आले
भावनांना ढवळून ते
नेत्रावाटे बाहेर पडले ।

आज ती नाहीं म्हणून
निसर्गहि स्तब्ध आहे
जणुं माझ्या गांभीर्याचा
त्यावर परिणाम झाला आहे ।

आज ती नाहीं म्हणून
रात्र ही वैरीण झाली
माझी अन झोपेची म्हणून
तिने फारकत केली ।
आज ती नाही म्हणून
चंद्रही कष्टी झाला
मेघा आड लपून तो
मूक अश्रूं गाळू लागला ।

आज ती नाहीं म्हणून
संगीतही बेसूर झाले
गीतांचे बोल आणि
ओठांवर ते विरून गेले ।

आज ती नाहीं म्हणून
आभास मात्र तिचा होतो
एकाकी जीवनाला तो
अधिकच उदास करत जातो ।

आज ती नाहीं म्हणून
स्मृति सर्व हेलावून जातात
नेत्रांतील अश्रूं फुलांनी
श्रद्धांजली तिला वाहातात । ।
                                     रविंद्र बेंद्रे

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:35 AM4/14/14
to
तुझ्या एकटक नजरेत भुललं मन माझं
तुझ्या लोभस हसण्यात गुंतलं मन माझं
तुझ्या गोड बोलण्यात अडकलं मन माझं
तुझ्या मोकळ्या केसात फ़सलं मन माझं

देह अन भान विसरलं मी
भूक अन तहान सोडलं मी
नीज अन चैन हरलं मी
हरघडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी

ओढीत हर एक श्वास मोजतो मी
चाहुलीत सगळे विश्व फिरतो मी
नकळत विचारांचे जाळे विणतो मी
हर घडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी

प्रीत असतं काय जाणलं मी
नयनी जागेपणी स्वप्नं पहिलं मी 
जीवन आरसा तुलाच मानलं मी
हर घडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी....

- अरुण राऊत (अविरा)

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:31:41 AM4/14/14
to


तरसतात डोळे माझे तुला पाहण्यासाठी,
तरसतात कर्ण माझे तुझे ऐकण्यासाठी,
तरसतात ओठ माझे तुझे चुबंन घेण्यासाठी,
तरसतोय मी तुला माझे बनवण्यासाठी...

करशील ना प्रेम माझ्यावर?


येशील ना माझ्या स्वप्नात
माझी होण्यासाठी???

वाट बघतोय ग बच्चू तुझी welcome करण्यासाठी

सांग ना....
होशील ना माझी???

©केतन आगवणे...

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:32:01 AM4/14/14
to

चुकुन तिच्या हाती माझं पुस्तक पडले 
त्यात तिला तिचंच रुप दिसले 
वाटलं होते तिला विसरला असेल मला 
पण प्रत्येक कवितेतुन पाहत होती स्वताला 

वर्षामागुन वर्ष सरली होती आठवणीत 
तरीही तिला जपले कवितांच्या रुपात 
आज चांगलेच कळले होते तिला 
आपण खुपच दुखवले होते त्याला 

सोडुन त्याला आपला संसार मांडला 
मनातुन तर तो कधीच निघुन गेला 
काळाच्या ओघात विसरुन गेले त्याला 
अन त्याच्या निरागसनिष्पाप चेह-याला 

पण त्याने ना घृणा केली ना दोष दिला 
सुखासाठी तिच्या दुख झेलत राहिला 
मग पश्चातापाच्या अश्रुंनी ती 
भिजवु लागली माझ्या पुस्तकाला. 

कवी-गणेश साळुंखे...! 

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:32:06 AM4/14/14
to
 माझे ओले अंग ,तुझी ती नजर 
संकोचलेली मी ,आसुसलेला तू 

मी षोडशा, मिसरूड फुटलेला तू 
हवाहवासा असा तो क्षण जगणारी मी ,
अन त्या क्षणाला पकडून ठेवणारा तू 

पावसाच्या सरित चिंब भिजणारी मी 
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा तू 

आजही आठवतो मज तो पावसाळा 
अन तुझी ती नजर 

आजही जेवा कोसळतात सरी
तेवा वाढते उगाच धडधड उरी .

                     .......सुनिता .

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:32:13 AM4/14/14
to

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो 
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून जातो...

फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे 
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो... 
   
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो..... 


आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही 
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून जातो...

माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता 
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........
                                   ---Shailesh shael

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:32:21 AM4/14/14
to

सागर सावंत

unread,
Apr 14, 2014, 8:32:28 AM4/14/14
to
केशसंभार खुला असा 
नजर शोधी कुणाशी ?

सखी बोल आहे गं कोण 
तुझ्या मानसी? 

का दाटले विरक्त भाव 
तुझ्या मुखावर मनीचे 

हास्याची सुमने फुलव ओठी 
ऐक या सखीचे 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:17 AM4/21/14
to
    रजनी 
        क्षितीज लाल पिवळं ,धूसर,काळसर 
        हळूहळू उतरला  घरा परतला रीतसर
        दिसता रजनीचा हा काळाभोर केशसंभार 
        त्या आड विसावला शांत-क्लांत दिनकर 
        शांतता भंग न व्हावी ,झाले स्तब्ध तरुवर 
        वर वेलीच्या मादकतेस आला बहर
        कहर झाला, पसरला चोहीकडे अंधार 
        कडक पहारा देण्या  निशाचर तत्पर 
        क्वचित उलुक ' जागते राहो 'चा करी गजर 
        चमकला काजवा, स्रृष्टीस सुचवी विचार 
        सुविचारी रविराजास उठवा आता सत्वर 
        त्वरा करा, दिन करा, झाली उषा ......

                                      विजया केळकर ____

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:28 AM4/21/14
to
हृदयात गुंफलेली 
मोत्यांची माळ आहे…. 

या रगरगगत्या उन्हात 
तुझ्या मायेची शाल आहे….  

हा प्रेमवारा आता 
देहात पसरत आहे… 

खेळ हा जुनाच 
पण नवीन कसरत आहे…. 

आठवणींच्या अल्बम मध्ये 
मी रोज रमत आहे….  

मन हे वेडे माझे 
तुझ्यासाठी झुरत आहे…  

प्रेमात आता 
ना  कुणाचे भान आहे… 

तुझ्यावर प्रेम करतो 
हीच शान आहे….

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:34 AM4/21/14
to
नाहीत मजला पाश कसले
अवखळ, चंचल मी प्रवाही,
साथ मजला कातळ काळी
प्रेम तुषार उधळीत जाई !

डोलत तारू, हलकेच तरुण 
ओलसर नयनी पहात राही,
रेशीम पांढरी लेवून वस्त्रे 
मिळण्या सागरास झेप घेई !!


©शिवाजी सांगळे

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:42 AM4/21/14
to

ना कशाची पर्वा 
ना कुणाचा धाक रे,
एकटाच बरा होतो मी 
का दिलीस तू हाक  रे …. 

प्रेमात सर्वच पडतात 
हि जगाचीच  रीत रे, 
माझ्या ओठांवर येणारे 
हे तुझेच गीत रे …. 

कधी रुसवा तर 
कधी ऊगाचच राग रे,
विलक्षण आहे सारंच 
पण हा प्रेमाचाच भाग रे …. 

तूच माझा श्वास 
तूच माझा ध्यास रे, 
तहानलेल्या जीवाला 
कशाची हि प्यास रे…. 

कधी मिळते दुःख 
कधी सुखांची रास रे, 
तू नेहमीच जवळ असल्याचा 
नुकताच भास रे…

                             - अजय अर्जुन

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:51 AM4/21/14
to
 निवडणूक निवडणूक 
 
         निवडणूक निवडणूक
                      कुणाची अडवणूक
                        कुणाची पिळवणूक
                          कुणाची मिळवणूक
                            कुणाची छळवणूक
                              अशीहीनिवडणूक

                         निवडणूक निवडणूक
                           कुणाची हसवणूक
                             कुणाची फसवणूक
                               कुणाची करमणूक
                                 कुणाची मिरवणूक
                                    अशी ही निवडणूक

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:48:58 AM4/21/14
to

तिचं आणि माझं प्रेमळ भांडण...!!

आज पुन्हा तिचं आणि माझं भांडण झालं,
ती अबोला धरुन बसली काही बोलतच नव्हती,
मी खुप समजावूनही ती काही ऐकायलाच तयार नव्हती,
शेवटी माझा उदास झालेले चेहरा पाहून ती बोलली.....

ती ; अजिबात बोलू नकोस माझ्याशी...

मी ; आता काय झालं गं पिल्लू,
विनाकारण माझ्यावर रागवायला ???

ती ; उठ ईथून पळ...

मी ; आधी मला सांग काय झाले ते ?
तरच मी ईथून उठेल...

ती ; खुप मोठा चोर आहेस तू,
माझे ह्रदय चोरलेयस तू...

मी ; बरं मग आता काय,
शिक्षा देणार आहेस या चोराला,
की अबोल राहून फक्त सतवणार आहेस ???

ती ; शिक्षा मुळीच नाही देणार...

मी ; मग काय,
काय करणार आहेस ???

ती काहीच बोलत नाही कसला तरी विचार करते,
आणि पुन्हा अबोला धरते...!!

मी ; हो मी चोरले तुझे ह्रदय,
पण, बदल्यात तुला माझे ह्रदय दिले नाही का...

ती ; ते काही एक सांगू नको मला,
आता मी पण चोरी करणार आहे...

मी ; बरं,
काय चोरणार आहेस तू ???

ती ; तुझे अडनाव... :-D

हे ऐकताच मी तिला घट्ट मिठी मारली...!!


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:10 AM4/21/14
to
;)निशःब्द भावनांचा बाजार मांडला हा,
काट्या-कूटयांचा संसार मांडला हा,

आयुष्य जाळूनी जगतो उगाच मी,
नात्यांमध्ये दुरावा, कधी वाढतो हा,

सारे सुखाचे सोबती, न दुः खात साथ देती,
परी वेदनांचा वणवाच पेटतो हा,

निस्वार्थ - त्याग शब्द हे "कोशातले",
लवलेश त्यांचा न कोठे दिसे हा,

चौकडीतली हि नाती, ना भाऊबंदकी हि,
दीड दमडीचा मांडला पसारा हा,

फसवीच नाती,फसवीच गोती,
दिखावाच सारा, नात्या-गोत्याचा हा,

मरणात त्यांच्या किती "आसवे" ढाळती  हे, 
सरणावर जळताच "वाट्यास" भांडती हे,

स्वरचित : कवी प्रकाश साळवी

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:19 AM4/21/14
to
भाग - २...

[टीचभर पोटासाठी या कथेचा हा दुसरा भाग आहे हा वाचण्या आगोदर पहिला भाग वाचा ]

जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगावर झालेल्या जखमांची आग-आग होत होती. यामुळे ती ओक्साबोक्शी रडत होती. मग अचानक बंद असलेला दरवाजा उघडला आणि तो साहेब व एक बाई आतमध्ये आले. मग त्यांच्यामध्ये बोलाचाली सुरु झाली, साहेब म्हणाला " पच्चीस हजार के नीचे नाही दुंगा" मग बाई रागारागात म्हणाली " अरे इसको कायको पच्चीस हजार रे,ये थोडी नई है तुने भी तो मजे मार लिये इसपे, बीस हजार मे फायनल करदे" आणि मग तिने त्या साहेबाला पैसे दिले आणि दोन मानसं आली आणि तिला उचलून घेऊन गेली.

नेमकं आपल्या आयुष्यात घडतंय काय ? याची कसलीच खबर आधी तिला लागत नव्हती. पण आता तिला कळून चुकल होत कि त्या साहेबाने आपल्याला फसवून या बाईला पंचवीस हजारात विकलं होत. आणि तिची रवानगी आता कुंटणखाण्यातल्या अंधाराच्या खोलीत झाली होती. पुढे हे असंच चाललं ज्याने-त्याने याव अंगाचे लचके तोडावेत आणि निघून जावं. पण एक दिवशी तिने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी सुद्धा झाली. पण बाहेर पडल्यावर जाव तरी कुठं ? हे तिला सुचेना म्हणून ती जवळच्या पोलिस स्टेशनला गेली आणि तिथल्या साहेबाला सगळ घडलेलं सांगितल. मग त्या साहेबाने तिला तिथेच बसवलं आणि मी तुझी मदत करील अस आश्वासन दिल आणि तो निघून गेला. थोड्या वेळाणे साहेब जेव्हा परत आला तेव्हा त्याचा सोबत ती कुंटणखाण्यावाली बाई आणि तिचे दोन गुंड होते. मग त्या साहेबाने सगळ्यांसमोर पूजाच्या कानामागे मारली आणि त्या बाईला म्हणाला " अक्का ले जावो इस रंडी को आप जैसे इज्जतदार लोगोंके खिलाफ कुछ भी बोल रही थी" मग तिला तिथून उचलून परत त्या अंधाऱ्या खोलीत आणून टाकण्यात आलं. 

असेच दिवसामागून दिवस जात होते. पण एक दिवशी तिला समजल कि आपल्या भावंडांना आश्रमशाळेने काढून टाकलं होत. 'यांची बहिण शहरात मोठ्या मोठ्या साहेबांसोबत हिंडतीया' अशी गावात कुणी तरी बोंब उठवली होती. त्यामुळे ते सुद्धा गाव सोडून दूर कुठे तरी निघून गेले होते. या सगळ्या आघातमुळे ती एका कोपरयात रडत बसली होती. तेव्हा तिची तिथेच काम करणारी मैत्रीण तिला म्हणाली " जाने दे बहन ये जमाना है ही ऎसा, ना हमको जिने देता है, ना मरणे देता है सिर्फ पैसोके जोर पर नचाते है सब…और कम्बख्त पेट के लिये तो कुछ भी करणा पडता है."

आता पूजालाही समजलं होत कि समाजाची सगळी दार आपल्यासाठी बंद झाली आहेत. ही अंधारी खोली म्हणजेच आपल विश्व आहे म्हणून ती हि आता वाड्याबाहेर खुर्ची टाकून बसायला शिकली होती, कुणी गिऱ्हाईक जवळ आला कि हळुच पदर खाली पाडून त्याला आपल्याकडे बघायला लावायची कला ती सुद्धा शिकली होती आणि टीचभर पोटासाठी कुणी गिऱ्हाईक दिसला कि "ऐ साहब आ ना…ऐ साहब आ ना " असं म्हणायला अगदी साफइदारपने शिकली होती. 

@सतीश भूमकर....

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:26 AM4/21/14
to
प्रेमात झालो पुरता वेडापिसा,

रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी पिल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो.....

असा कसा गं बावरलो मी,

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....

काय जादू मंतरलीस माझ्यावर,

जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:35 AM4/21/14
to

कामाला वाघ असलेला 
वार्डबॉय मारुती गेला 
एका वर्षात क्षयाने झिजून 
संपूर्ण क्यॅजूल्टीचा तंबू 
आपल्या खांद्यावर वाहणारा
आपल नाव सार्थ करणारा ..

कुणी असो वा नसो बरोबरीला 
विना तक्रार ड्रेसिंग करणारा  
कॉल नेणारा पेशंट आणणारा 
स्टीकिंग कापणारा प्लास्टर लावणारा 
रात्री बाराला सगळ्यांसाठी 
गरम गरम चहा बनवणारा 
सहा फुट मध्यम देहाचा
कठोर चेहरा प्रेमळ मनाचा 
सद्गृहस्थ पंनाशीचा ..

कधी काम संपल्यावर 
येवून बसे लांब स्टूलवर 
आणि आपल्या हुशार मुलीचे 
कौतुक सांगे वारंवार 
लोक म्हणायचे ,
अगोदर तो व्यसन करून
वाया गेला होता म्हणून 
आता ही कधी रुग्णाकडून 
घेतो चिरीमिरी म्हणून  
पण त्याच्या वागण्यात 
बोलण्यात अन काम करण्यात 
कधीही लबाडी न आली दिसून.. 

क्षय झाल्यावर काही दिवस
उपचार घेता असतांना  
तो काम करीत होता 
आणि दिवस भरीत होता 
पण कामाशिवाय बसलेला 
उदास चेहऱ्याचा वाळल्या देहाचा 
मारुती बघणे म्हणजे 
शिक्षाच होती साऱ्यांना 
कुठल्याही उपचाराला दाद न देणारा 
असाध्य असा एम.डी.आर .
आला होता त्याच्या वाट्याला  

शेवटचे तीन महिने तर 
मारुती हॉस्पिटलच्याच होता 
एका खाटेला खिळलेला 
रोज दिसायचा नमस्कार करायचा 
मिळालेल्या टोंकिनच्या बाटल्या 
आणि व्हिटामिनच्या गोळ्या 
मी त्याला द्यायचो कारण 
बाकी काहीच करत येत नव्हते..  

एक दिवस संतोष वार्ड बॉय 
गेला मला सांगून 
मारुती सिरिअस झाला म्हणून 
त्याला ऑक्सिजन वर ठेवलाय पण ..
तेव्हा इच्छा असूनही 
मी वार्डमध्ये गेलो नाही 
मारुतीचा अटळ मृत्यू 
मला पाहायचा नव्हता 
मारुती मनामध्ये 
जिवंत ठेवायचा होता 
पण सारे सोपस्कर होवून 
मारुतीचे डेथ सर्टिफिकेट 
शेवटी आले माझ्याचसमोर  
मी सही करावी म्हणून 


विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:42 AM4/21/14
to
मी तिच्या बॅगेत एकदा हळूच फुल ठेवले 
पण तिने हसून राजूलाच थॅन्क्स म्हटले 
मी तिच्याशी रस्त्यात बोलण्याचा यत्न केला 
सरातर्फे तिने माझा पार बाजा वाजवला   
मी तिला पाहण्यास तीन मैल चालून गेलो 
कुत्रांच्या तावडीतून जीव वाचवून आलो 
ठोकर खावून रस्तात खाड्यात पडून पडलो  
पळपुटा सैनिक होत महायुद्ध हरून आलो 
वर्गात तिला सतत पाहतसे डोळा भरून 
भाऊ तिचा म्हणाला टाकीन डोळे फोडून 
नाद खुळा माझा तरीही कमी नाही झाला 
तक्रार येता घरी मग बापाने कचरा केला 
शाळेमध्ये जावून हेच धंदे करतोस काय 
शिव्यालाथाबुक्के नका विचारू झाले काय 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:48 AM4/21/14
to

वय माझे काही फार नाही
अवघे चौसष्ट वर्षे पूर्ण आहे,
येणारी सारीच मुले माझी इथे 
अजुनही परिपक्व व्हायची आहे !

मान माझा जगती फार मोठा
कायम टिकवायला वाव आहे,
निवडून दिलेल्या पुढाऱ्यांना मात्र 
वागायला वातावरण स्वेर आहे !

लोकशाही मंदिर आज केवळ 
राजकीय हाणामारीचा अड्डा आहे,
व्हावे येणाऱ्यांसाठी आदर्श आपण 
सुधरायला अजूनही वाव आहे ! 



©शिवाजी सांगळे

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:49:56 AM4/21/14
to
त्याला पूर्ण बाटली दे, मला माझी चपटी दे 
नशीब नाही दिलं तरी, एक रिती धोपटी दे
 
काळी गोरी बुटकी दे, जाड अथवा लुकडी दे   
नाकावर राग नसावा, बायको मज नकटी दे  
 
पोळी भाजी नको मला, केवळ प्रेमळ साथ दे
भात खाइन नुसताच मी, पाण्याची आमटी दे  
 
भाज्या डाळी महागले , चूल कधीची बंद रे
भिक मागायला सरकार, बस एक करवंटी दे
 
चहा पितो टपरीवर मी, ही माझी अवकात रे 
शान मारायला खोटी, मिटिंगमधे ग्रीन टि दे   
 
संसारात रमलोय मी, वेळ नाही भजनाला 
नाम घेईन देवा मी, बस थोड्या कटकटी दे 
 
 
केदार...

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:06 AM4/21/14
to
खास मुलीच्या मनातलं...!!

तुझीच ओढ लागली वेड्या मनाला,

यदा कदाचित असे कसे घडले.....

प्रेम म्हणजे काय माहीत नसताना,

नकळत तुझ्या प्रेमात मी पडले.....

कधी तुझ्यासवे खुप हसले,

तू सोबत नसताना एकांतात रडले.....

कधी तुझ्या आठवणीत हरवले,

कधी गोड क्षणात गुरफटले.....

कधी तू धडपडताना मला सावरले,

कधी मी जाणून बूजून अडखळले.....

कळलेच नाही रे कधी मला,

तुझे माझे कसे प्रेम जुळले.....

[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:15 AM4/21/14
to

किती दिवस असतात प्रेमाचे 
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे 
डोळ्यात उतरलेल्या प्रेमळ स्वप्नांना 
कितीवेळ असेच पहायचे ..........

आनंद असतो प्रेमात  
जेव्हा तुझा हाथ हातात असतो 
मिठीत तुझ्या असताना दुखांचा भास अदृश्य असतो 
जगायचे असतं आयुष्य तुझ्या सहवासातच 
पण का असे दृष्ट लागते प्रेमाला 
वळणे येतात मध्येच धोक्याचे .....................


किती जपायचे हे नातं मीच नेहमी 
तू ही आता जपतजा  
खचतो मी सांभाळताना त्यांना 
तू येउन सांभाळत जा .............

खूप नशिबाने मिळतं हे नातं 
म्हणूनच डोळ्यांना काहींच्या खुपसत असतं 
अन आपल्या प्रेमाच्या   सागराला  
वादळरुपी दिशाहीन करीत असतं ..............


नाही जमत प्रत्येक  भावना असे 
तुझ्यापासून लपवणं
तू तेव्हा माझ्या हृदयाचे दुख थोडे समजत जा .........

किती दिवस असतात प्रेमाचे 
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे 
जपताना कळतं हे  प्रेम आहे खरेच  धोक्याचे ............ 

-
प्रशांत डी शिंदे 
दि.१७/०२/२०१४

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:20 AM4/21/14
to
प्रीत

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन -मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो .
====================

संजय एम निकुंभ , वसई

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:25 AM4/21/14
to

चंद्र-बिंद्र चांदण्या-बिंदण्या
अन तू न मी 
गारवा-बिरवा थंडी-बिंडी
तुझी मिठी अन मी
रात्र-बित्र स्वप्न-बिप्न
स्वप्नातली तू अन मी
पाउस-बिउस गारा-बिरा
भिजलेली तू अन चिंब मी
वचन-बिचन सोबत-बिबत 
हातामधले तुझे हात अन मी
भांडण-बिंडण राग-बिग 
समजावणारा मी 
अश्रू-बिश्रु वेदना-बिदना
सहन करणारा मीच 
माघारी फिरणारी तू 
अन तिथेच थांबलेला मी
स्वताशीच बोलत..."कशाला केलं मी हे प्रेम-बीम...
                                        ----Shailesh Shael

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:30 AM4/21/14
to

कशी विसरू ग तुझी माझी प्रीत 
कसे विसरू आपले प्रेमगीत 
विसरलीस तू जरी, नाही विसरलो मी तुला,
शब्दात बांधून ठेविले मी तुला 
हसतेस जरी तू तिथे मी मात्र वेडा इथे, 
किती आठवणी, आणि मन माझे तिथे,
हृदयावर ठेवून धोंडा गेलीस तू निघून,
पाहून घायाळ मी, गेलीस तू इथून,
विसरणे सोपे नसते ग "खरी प्रीत"
विश्वास नाही मला, "माधुरी" हीच का तुझी रीत,
पाहीन वाट तुझी या जन्मी जरी ना भेटली तू 
अनंत जन्म घेईन मी तुज साठी, भेटू आपण मी आणि तु. 
*****-> स्वरचित प्रकाश साळवी [/color]

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:37 AM4/21/14
to

ती 
ती आली समोर तर भीती वाटायला लागते 
असे वाटते माझे प्रेम मलाच समजवायला लागते
किती झालो वेडा मे तिच्या नजरेपूढे 
तिला कधी कळेल हो प्रेम आहेच वेडे खुळे ||

माझ तिच्यावर प्रेम आहे तिलाही माहीत आहे
पण तिला न जाणे कोणते संकट आहे 
तिला जेव्हा हे प्रेम समजेल,तेव्हा वेळ गेलेली असेल 
काळाच्या ओघात सर्व मागे गेलेले असेल ||

ती आली समोर तर भीती वाटायला लागते 
असे वाटते माझे प्रेम मलाच समजवायला लागते
माझे मन लागत नाही ती दिसल्याशिवाय हल्ली 
ती नेमकं बघते मला मी होतो जेव्हा टल्ली ||

तिचे ते हास्य बघून मी वेडा होऊन जातो 
काय कराव कळत नाही खुळा होऊन जातो
तिच्या डोंळ्यात साफ मला माझ्यासाठीच प्रेम दिसत
पण तरीही ती का सांगत नाही याचच खूप दूख वाटत ||
                                                    कवीta 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:41 AM4/21/14
to

आज काय देऊ तुला भेटवस्तू म्हणून,
   मन माझे केव्हाच दिले तुला घे ते गोड मानून......
प्रेमाची धागे असे काही गुंफलेस,
    प्रत्येक सुख दुखात मला स्वताचे जाणलेस.....
प्रेमाच्या या गोड गुपितात, अजून काही स्वप्ने दडवायची आहेत,
    तुझ्या सोबत आयुष्याची प्रत्येक कोडी सोडवायची आहेत......
जोडीदार म्हणून नशिबी तू आलास,
    स्वताची अर्धांगिनी म्हणून मला सन्मान दिलास.....
उन्हाच्या प्रत्येक चांदण्यात तुलाच पाहते,
    श्वासात फक्त तुझेच गीत गुणगुणते......
या प्रेमदिनी आज मागते तुझी साता जन्माची साथ,
   देशील ना मला प्रत्येक वळणावर तुझा हाथ...... @कविता@

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:48 AM4/21/14
to

विचार हे दोन प्रकारचे असतात एक चांगले आणि एक वाईट, आपण कधी एकटे असलो ना कि दोन्ही विचार मनात अगदी नकळत येउन जातात...... का कुणास ठाऊक पण आपण नेहमी चांगले विचार हे जास्त मनात ना आणता वाईट विचारांचा जास्तीत जास्त विचार करतो खरे आहे ना मित्रानो, खरे तर वाईट आणि चांगले विचार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, लहान मुले कशी काटा छापा असे खेळत असतात तसेच काही आपण आपल्या विचारांशी खेळत असतो...... खेळताना हे विसरून जातो कि आपण आपल्या भूतकाळातील चुकांकडे पुन्हा एकदा डोकावून पाहत आहोत, त्याच आठवणी त्याच चुका, आणि त्याच जखमा असे हे चक्र आपण स्वताभोवती गुंफत असतो, हो ना! खरतर आपण जर ठरवले ना तर ते आपणच टाळू शकतो, आता कसे तर याचे उत्तर आपल्याच प्रश्नात असते......
आपण मनातूनच ठरवलेले असते कि आपण जुने विसरायचे नाहीच, पण मित्रानो असे करून आपण स्वताला किती शिक्षा देत असतो याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही कारण आपण चिंततो मनी एक तर कसे प्रसन्न चित्त राहील. एकदा जर ठरवलेच आहे कि पुन्हा मागे वळून नाही पहायचे तरी नजर मागे का वळते? पावूल मागे का सरकते? कारण जबाबदार आपणच असतो आपण कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का कि आपण म्हटले कि हा विचार आज पासून करायचा नाही तर आपण तोच विचार जास्त करतो, कारण आपल्या ध्यानी मनी तोच एक विचार घोळत असतो.
त्याच गोष्टीने खूप आपण काळजीत असतो, मग जर आपण एक गोष्ट विसरू शकत नाही तर आपण असे ठरवायचे मनाकडे कि आपण असे केल्यावर चांगले कसे घडेल आणि जर चांगले करायचे आहे तर चुका कशा टाळू शकतो हे ठरवले तर कदाचित आपण थोडे सावरू शकतो, मी म्हणत नाही कि भूतकाळाला विसरावे पण त्या भूतकाळाला आपली कमजोरी न बनवता त्याला ताकद बनवून नवीन बदल कसे करू शकतो हे विचारात आणि कृतीत उतरावे, नक्कीच थोडा तरी फरक जाणवेल हि माझी 
खात्री आहे........
विचार हे सर्वांनाच असतात मित्रानो पण त्या विचारातून चिंताग्रस्त न होता आपण येणाऱ्या भविष्याचा मार्ग सुकर करण्याचा नक्कीच एक प्रयत्न करू....... @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:50:52 AM4/21/14
to

आज आठवली ना ती ३० जुलै २०१३ ची रात्र... ? ?
ज्या रात्री पहिल्यांदा प्रेमाचे ते तीन शब्द बोलले होते..
आणि तेव्हापासूनच फक्त तुझीच झाले...

तुझ्यामुळेच तर आयुष्यात नवीन रंग भरल्या गेले
तुझ्यामुळेच तर समजलं प्रेम म्हणजे काय असतं..
प्रेमात फक्त सुखच नाही तर दुखः पण कसं सहन करावं...?
हे सगळं काही तुझ्या प्रेमातच शिकत गेले..

तुझ्या हसण्याने सुखवून गेले...
तुझ्या नजरेत हरवून गेले..

तुझ्या रागात हिरमुसले..
तर तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी भारावून गेले..

तू मला प्रेमच असं दिलं...
कि मी माझं आयुष्यच तुझ्या नावे केल...
कि मी माझं आयुष्यच तुझ्या नावे केल...
 :)   ;)  :)  ;)
- SUचित्रा SHEडगे..

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:00 AM4/21/14
to
          सरकार राज 
              कवि . अक्षय किनगे , े
                    धन्य हो भारत माता!
स्वातंत्र्यापासून जे आजवर जे तु सोसले ,
आता आली आहे ते दुर करण्याची पाळी,
भारतीय माणसाला जे आजवर लुटले,
ते वसुल करण्याची आली आहे पाळी ,
 . .         हे सरकार आले तेव्हापासुन त्याने केले ऐकच काम,
शेतकर्याच्या भाळी उगवले दुखाचे रानं,
ऐकून फुटले सार्यांचे कानं
त्यांच्या काळ्या कामाचे गुनगान!
 .         गांधींनी सांगितले अहिंसेचे बोल ,
पण त्यांच्या माकडांनाच नाही थोर महात्म्याचे मोल,
या दलालांनी ठेवलाय देश गहान,
तरी म्हणतात भारत निर्माण!
 .      त्यांनी बांधले टोलेजंग महाल,
गरीबांचे केले अनवानी दहाल,
उठा सगळ्या राणी लक्ष्मींनों आणि विरांनो ,
दाखवा त्यांना मतदानाची ताकद,
उचलून फेका ही सारी माकडं!
 .            कवि . अक्षय किनगे

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:05 AM4/21/14
to

चंद्र-बिंद्र चांदण्या-बिंदण्या
अन तू न मी 
गारवा-बिरवा थंडी-बिंडी
तुझी मिठी अन मी
रात्र-बित्र स्वप्न-बिप्न
स्वप्नातली तू अन मी
पाउस-बिउस गारा-बिरा
भिजलेली तू अन चिंब मी
वचन-बिचन सोबत-बिबत 
हातामधले तुझे हात अन मी
भांडण-बिंडण राग-बिग 
समजावणारा मी 
अश्रू-बिश्रु वेदना-बिदना
सहन करणारा मीच 
माघारी फिरणारी तू 
अन तिथेच थांबलेला मी
स्वताशीच बोलत..."कशाला केलं मी हे प्रेम-बीम...
                                        ----Shailesh Shael

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:10 AM4/21/14
to

अशीच एकटी बसलेली असताना...
नकळत गार वारा मनाच्या तारा छेडून गेला....
अन तुझ्या रेशमी स्पर्शाची जाणीव करून गेला..

अशीच एकटी बसलेली असताना....
कोणा जोडप्याला मस्ती करताना बघितलं...
अन तुझा तो खट्याळ चेहरा डोळ्यांसमोर आला...

अशीच एकटी बसलेली असताना...
मला नजरेला नजर भिडवता येत नाही हे पाहून
पण प्रेमान चेहरा धरून नजरेत बघायला लावणारा तू आठवला...

अशीच एकटी बसलेली असताना...
तुझ्या त्या मधाळ शब्दांनी कांनांमध्ये गर्दी केली...
अन अचानक एक प्रेमळ शब्द पटकन ओठांवर आला...

...

खरं सांगायचं झालं तर ...
तुझ्या प्रत्येक छोट्या गोष्टी मनात घर करून जातात...

तुझ्या हसण्याने खूप आनंदी झाल्यासारखं वाटत...
जणू काही अंगावर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी सारखं...

सगळं काही खूप सुंदर होऊन जातं...
अगदी गोष्टीतल्या सिंड्रेला सारखं...

अशीच एकटी बसलेली असताना...
हेच सगळं आठवतं अन अचानक ओठांवर हसू येत...

हेच सगळं आठवतं अन अचानक ओठांवर हसू येत...

- Suचित्रा Sheडगे 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:20 AM4/21/14
to
मनास असे बेभान करणारे हे गीत कुठून गुंजते,
  तुमची आठवण मनाचे चित्त सारखे वेधते.......
तुम्ही थोडे बोलावे अन तेच मी ऐकत राहावे,
  आणि ते क्षण कधी न विसरता यावे.......
शांत मी शांत तुम्ही हि, तरी या मनात लाटांची एक उमेद का उठावी,
  तुमचे स्वप्न पाहता रात्र न सरावी, अन तुम्ही येण्याची कानी साद यावी......
भास मनाचे कि सारे सत्य आहे,
  तरी का मनास तुमची ओढ आहे......
आयुष्याचा जोडीदार म्हणून तुम्हास निवडले,
  माझे मन हे त्याच क्षणी तुमचे झाले......
आयुष्याच्या प्रत्येक वाटा तुमच्या सोबत चालायचे आहे,
 तुमच्या सवे संसाराचे स्वप्न रंगवायचे आहे........
तुम्हीच आता या जीवनाचा अर्थ आहात,
 तुम्हीच माझ्या भावी जीवनाचा भावार्थ आहात....... @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:26 AM4/21/14
to
14, 10:41:41 AM »
तू जवळ नसताना देखिल....
आजकाल मी रात्र रात्र जागते...
कधी कधी मी स्वतःशीच...
तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहते...

तुझ्याशी बोलुन झाल्यावर... 
अजुनदेखिल...
तुझी ती गोडबडबड
माझ्या कानात गुणगुणत राहते...

कधी तुझं लाडीक हसणं आठवतं
तर कधी तुझं स्पष्ट बोलणं आठवतं...

कधी कधी या आठवणी
स्वप्नातल्या विश्वात घेऊन जातात...
आणि कधी कधी त्या
तुझ्या माझ्या अनमोल नात्याची जाणीव करुन देतात...

हे सगळं आठवताना नकळत कुठे जरासा डोळा लागतो...

अन् मी पुन्हा दचकून जागी होते...

तुझी आठवण मनाला फारच जोरात चिमटा काढून जाते रे...
अन् मी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा मी माझी रात्र जागुन काढते.....
 
                                                                        - Monika

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:43 AM4/21/14
to
    बसतो तेव्हां 

गत स्मृतिंना

    उधाण येते 

आठवणींची 

   एक मालिका 

डोळ्यांसमोरी

   उभी रहाते 

क्षण सुखाचे  

  अन दुःखाचे 

मनांभोवती

   पिंगा घेती 

जीवनांत ज्या


   चुका केल्या 

आज अवेळी

   उमजुन येती 

  अर्थ काय तो

     पश्चातापां 

क्षण हातचा


   निघून गेला 

समजुनि आले

  हें  आज तरी 

चूक सुधारण्या

  उशिर झाला 

म्हणून बसतो

   एकांती जेव्हां 

गतस्मृतिंना

    उधाण येते 

हुकलेला तो 

  क्षण आठवून 

मनाला हुरहुर

 ती  लागून रहाते   रविंद्र बेंद्रे

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:52 AM4/21/14
to

घरोघरी माणसे मिळाली 
परोपरी माणसे मिळाली 
 
वारकरी लोकांच्यात मला 
कामकरी माणसे मिळाली 
 
काट्या सारखा सललो तरी 
फुलांपरी माणसे मिळाली
 
मुखवटयांच्या जगात सुध्धा
खरीखरी माणसे मिळाली
 
लग्न करून सोयरिक जुळली 
त्याच घरी माणसे मिळाली 
 
छळले जरी मला काहींनी 
तशी बरी माणसं मिळाली
 
मेला तो एकटाच होता 
बघा तरी माणसे मिळाली 
 
शेवट तो एकटाच गेला
किती जरी माणसे मिळाली
 
 
केदार...

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:51:56 AM4/21/14
to

:::::::::स्वप्निल:::::::::

रंगबावरे फुलपाखरु,
याना कसे सावरु....
मन उडते बेधुदं,
निशिगंधाचे पाखरू...

हरवते,भुलवते..
मिरवते दाही दिशा..
स्वप्नपंखी ह्दयात 
तुझी वेगळीच नशा...

बोली ह्दयाचे स्पदंने,
तुझ्यात जीव गूतंले..
भुलवते तुझे नयन,
तुझे मनात मन गावले....!!

@स्वप्निल चटगे@

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:04 AM4/21/14
to

थेंब थेंब होऊन 
दुःखाच्या कलशातुन 
झिरपते सुख 
माझ्या हाताच्या ओंजळीने
तो एक थेंब थेंब
घेणार आहे टिपून !
पण करायला ओंजळ
हात आहेत कुठे ?
ते तर 
दुःखाचा कलश घडविताना 
गेले आहेत गळून !!

संदीप लक्ष्मण नाईक

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:11 AM4/21/14
to
आठवते का तुला, तुझे ते चोरून पाहणे मला,
  माझ्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी होणारी तुझी धडपड......,
   खर सांगू मन माझे हि व्याकूळ व्हायचे तुला पाहायला......!!!!
त्यावेळी मलाही असेच वाटायचे, 
  पण लाजाळूच्या झाडापरी मी लाजायचे.....
पण एक सांगू तुला, तू आधी विचारावेस असेच वाटायचे मला,
  तेही क्षण आजही आठवतात मला अन तुला.......
त्या क्षणांना तू माझ्या आयुष्याचे सोबती बनवलेस,
  माझ्याशी लग्न करून तू मला स्वताचे नाव दिलेस......
तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
  तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे......
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
 या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे.......
प्रेम तुझे माझे कधी लपलेले, कधी मनात दडलेले,
  आणि आता सार्या जगासमोर मांडलेले.......
संसाराची हि सुरुवात तुझ्या सहवासाने गोड झाली,
  माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली.......
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे......!!!!
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे.........!!!! @ कविता @

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:15 AM4/21/14
to

सर्वदूर केवळ 
पाण्याची खळखळ 
अन पायाखाली 
पाचोळ्याची सळसळ  
कुणीही नाही 
आजूबाजूला 
अथवा कुणाची 
चाहूल कानाला 
किती चालायचे 
माहित नाही 
किती चाललोय 
माहित नाही 
मनाला त्याची
मुळी शुध्दच  
उरली नाही 
पोहोचणे किंवा 
न पोहोचणे यास 
जणू आता 
काही अर्थच 
उरला नाही 
अस्तित्वाच्या 
कणाकणात 
विरघळलेली 
तुझी साथ 
श्वासाच्या 
अंतापर्यंत
हवी हवीशी 
वाटणारी ..
थबकली पावुले
वाटले मनास 
इथेच हा पथ 
संपावा प्रवास 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:22 AM4/21/14
to
नको मला सोबत तुझी, 
जी मला,
रडवणार आहे..... 
******************
नको मला तुझे ते फुल,
जे माझ्या,
देहावर वाहणार आहे.....
******************
नको मला तुझे ते अश्रू, 
जे तू माझ्यासाठी,
गाळणार आहे.....
******************
नको मला प्रेमाचे कटू बोल तुझे,
जे मला नेहमी,
काट्यासारखे टोचणार आहे.....
******************
नको मला तुझा तो फसवा जिव्हाळा, 
जो मला जिवंतपणी,
दररोज मारणार आहे..... 
******************
दररोज मारणार आहे.....
:'(   :'(   :'(   :'(   :'(


_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:26 AM4/21/14
to
मनास असे बेभान करणारे हे गीत कुठून गुंजते,
  तुमची आठवण मनाचे चित्त सारखे वेधते.......
तुम्ही थोडे बोलावे अन तेच मी ऐकत राहावे,
  आणि ते क्षण कधी न विसरता यावे.......
शांत मी शांत तुम्ही हि, तरी या मनात लाटांची एक उमेद का उठावी,
  तुमचे स्वप्न पाहता रात्र न सरावी, अन तुम्ही येण्याची कानी साद यावी......
भास मनाचे कि सारे सत्य आहे,
  तरी का मनास तुमची ओढ आहे......
आयुष्याचा जोडीदार म्हणून तुम्हास निवडले,
  माझे मन हे त्याच क्षणी तुमचे झाले......
आयुष्याच्या प्रत्येक वाटा तुमच्या सोबत चालायचे आहे,
 तुमच्या सवे संसाराचे स्वप्न रंगवायचे आहे........
तुम्हीच आता या जीवनाचा अर्थ आहात,
 तुम्हीच माझ्या भावी जीवनाचा भावार्थ आहात....... @ कविता @
  

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:32 AM4/21/14
to
आज पुन्हा चाललीये त्याला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....
किती भांडते तुझ्याशी....
किती रुसते तुझ्यावर....
इतका सगळं असूनही....
तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे सांगायला...
आज पुन्हा चाललीये त्याला भेटायला. ..
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला..

आपलं नाजूक नातं हळुवारपणे सावरायला...
कितीही दुरावा आला तरी...
प्रेमाने जवळीक साधायला....
आज पुन्हा चाललीये त्याला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....

एक एक क्षण कसा तडफडत जातो हे सांगायला...
पण समोर आल्यावर काही न बोलता....
फक्त डोळ्यांतून प्रेम उधळायला...
आज पुन्हा चाललीये त्याला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला...

त्याच्या छोट्या छोट्या हरकती डोळ्यात साठवायला...
त्याने काढलेल्या प्रेमळ खोड्या...
आठवणीत भरून ठेवायला...
तो काही बोलला नाही तर ....
कसा चेहरा होतो हे दाखवायला...
आज पुन्हा चाललीये त्याला भेटायला....
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....

त्याला आपलंसं करायला...
त्याच्यावर मनापासून प्रेम करायला. ..
त्याच्या त्या स्पर्शात हरवून जायला...
फक्त त्याच्यासाठीच त्याची होऊन जायला...
त्याच्या मनात छोटीशी जागा करायला....
आज पुन्हा चाललीये त्याला भेयायला....
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला...

 :-* :-* :-* :-* :-* :-* :-*


- Suचित्रा Sheडगे

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:38 AM4/21/14
to

कुणावर खरे प्रेम करताना,
आयुष्य माझे संपले आहे.....

कुणासाठी तरी आयुष्य माझे,
पुर्णपणे बरबाद होवून वाहीले
आहे.....

खरे असुनही प्रेम ते माझे,
माझेचं न राहीले आहे.....

जे काही मिळाले मला,
ते मी हरवतांना पाहीले आहे.....

आयुष्यचं माझे एक न सुटणारे,
वेदनामय कोडे बनून राहीले आहे.....

नशिबचं आहे फुटके माझे,
ज्यात काहीचं न करण्यासारखे उरले
आहे.....

लोक म्हणतात कि फूले,
फूलताना नेहमी हसतात.....

पण ???

मी फूलांना नेहमी एकटेपणात,
ढसाढस रडतांना पाहीले आहे.....

कारण ???

आयुष्यभर भांडूणही जे पुर्ण
नाही होऊ शकले,
त्या मला दाखवलेल्या कधीचं न पुर्ण
होणा-या खोट्या.....

स्वप्नांना मी दूर जातांना पाहीले
आहे.....

स्वप्नांना मी दूर जातांना पाहीले

आहे.....
:'(  :'(  :(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:45 AM4/21/14
to

आयुष्यात असे कसे,
हे कटू क्षण आले.....
* * * * * * * * * *
की माझे आपलेच,
टपलेत माझ्या मरणावर.....
* * * * * * * * * *
आधाराला दिलेले हात,
आता आखडते केलेत.....
* * * * * * * * * *
दया माया नाही दाखवली कोणी,
माझ्या भावनिक रडण्यावर.....
* * * * * * * * * *
माझं दुःख समजणारं,
कोणच उरलं नाही.....
* * * * * * * * * *
विश्वास नाही कुणाचा,
माझ्या खरं बोलण्यावर.....
* * * * * * * * * *
आशेचा किनाराही,
दिसेनासा झाला आता.....
* * * * * * * * * *
स्वतःला पाहतोय मी,
निवांत निजलेला सारणावर.....
निवांत निजलेला सारणावर.....
* * * * * * * * * *
I Hate u My Life..

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:52:55 AM4/21/14
to
काही दिवसापूर्वी एक कविता लिहिली… "तो Onsite ला निघालाय (http://tingyaachiaai.blogspot.com/2013/12/onsite.html)… त्यात एक कडवं होतं ज्यात तो तिला निरोप द्यायला जातो… तिला एकदाचं डोळे भरून पाहायला…. त्यावरूनच सुचलेली हि कविता… त्यांच्या निरोपाचा प्रसंग… विस्तारित वृत्त…. ;-)

निरोप…… 
आजही आठवते ती संध्याकाळ…. निरोपाची होती…
निघण्यापूर्वी एकमेकांना डोळेभरून पहायची… शेवटची संधी होती…
आठ दिवसापूर्वीच त्याची… निघायची तारीख कळली…
शॉपिंग आणि Packing…. सगळी तयारीही तिनेच होती केली…
Excitement वगैरे सगळं ठीक… पण आज जीवावर आलं होतं…
एकमेकांना सोडून जाणं… दोघांनाही अवघड झालं होतं…
सगळी तयारी झाली… निघायचा दिवस उद्यावर येउन ठेपला…
आज सारी काम बाजूला सारून… तो तिला येऊन भेटला…

न बोलावता तीही आज… त्यांच्या फेवरेट जागेवर हजर होती…
नेहमीसारखीच निशिगंधेची फुलं घेऊन… त्याची वाट पाहत उभी होती…
दरवेळी हमखास विसरणारा गुलाब… तो आज आठवणीने घेऊन गेला…
हळुवार तिच्या हातात देताना… नेमका त्याचा काटाच तिला बोचला…
काटा तिला लागला… पण कळ त्याला आली…
पापण्यामधलं पाणी अडवत… ती फक्त शांत हसली…
माझ्याविना हि कशी राहील…? याचा विचार तो करत होता…
अन त्याला न पाहता दिवस कसा सरणार…? हा प्रश्न तिला पडला होता…
कोणीच काही बोलेना… दोघेही तासभर नुसतेच बसून होते…
हातात गुंतलेले हातच… दोघांचं मुक्याने सांत्वन करत होते…

पाण्याने टच्च भरलेले तिचे डोळे… अस्पष्ट दिसणारी जमीन न्याहाळत होते…
अन त्याचे दोन्ही डोळे… तिला जमेल तितकं डोळ्यांत साठवत होते…
"नको ना रे जाऊ…" तिने एकदातरी म्हणावस त्याला वाटत होतं…
"मला नाही जायचं तुला सोडून…" हे तिला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं…
एवढी इच्छा असूनही… कोणीच काही म्हटलं नाही…
आतल्याआत घुसमटणार मन… आज पहिल्यांदाच बोललं नाही…
न राहवून हळूच तिने… त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं…
तिला घट्ट मिठीत घ्यावं… त्यालाही अगदी त्याच क्षणी वाटलं…

अजून थोडासा वेळ… तसाच शांतपणे निघून गेला…
एकमेकांसोबतचं त्याचं एकटेपण… आज चंद्र लांबूनच बघून गेला…
हातातला हात सोडवत… शेवटी एकदाचा तो जायला उठला…
इतका वेळ अडवून ठेवलं… पण आता मात्र तिचा बंध फुटला…
दोन्ही टपोऱ्या डोळ्यातून… घळ घळ पाणी वाहू लागलं…
केवीलवाण त्याचं प्रतिबिंब… त्या अश्रुंसोबत वाहू लागलं…
मन घट्ट करून… त्याने तिला मिठीत घेतलं…
त्याचंही मन चिंब भिजेपर्यंत… तिने मनमोकळ रडून घेतलं…

अश्रूंना बांध घालत… शेवटी दोघांनी एकमेकांना सावरलं…
हसत हसत निरोप घ्यायचा… मनाशी पक्क ठरवलं…
नको इतक्या जड अंतकरणाने… तिने त्याचा निरोप घेतला…
लवकरच परत यायला… तो तिचा निरोप घेऊन निघाला…
तो अंधारात दिसेनासा होईपर्यंत… ती तिथेच उभी राहिली…
निरोपाची हि संध्याकाळ दोघांसाठीही… पुन्हा भेटेपर्यंत जणू तिथेच होती थांबली… 

- टिंग्याची आई :)

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:00 AM4/21/14
to
ती येत होती,
मला सतवण्यासाठी.....

मी जात होतो,
तिला मनवण्यासाठी.....

ती म्हणत असे की,
तुझं माझ्यावर प्रेमच नाही.....

आणि.....!!!

मी बोलत असे की,
तुझ्याशिवाय दुसरं कुणीच
मला आठवत नाही.....

तिने मला सोडून दिलं,
कुणा दुस-यासाठी.....

आणि.....!!!

मी ही जग सोडलं,
फक्त तिच्यासाठी.....

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:06 AM4/21/14
to

जर मी अश्रू असतो
तर तुझ्या डोळ्यातून पडून
तुझ्या गालावर
शहीद होण्यास
मला आवडल असत
खूप आनंद झाला असता
पण जर तू
अश्रू असतीस
माझ्या डोळयातला
तर शोनु तुझी शप्पथ
आयुष्य भर रडलो नसतो
फ़क्त तुझ्यासाठी
तुला कायम माझ्या
डोळ्यात साठवून  ठेवल असत
I LOVE  U परी

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:12 AM4/21/14
to

धार धार शस्त्राने 
फांदी तुटावी तसे 
मित्र तुटतात क्षणात  
एकाच घावात 
पैशाच्या आसक्तीने 
स्त्रीच्या स्वमित्वाने 
कामाच्या वाटणीने 
घडतात वाग्युद्ध 
शब्दाने शब्द वाढत जातो 
अन डिवचलेला अहंकार 
सहज विसरुन जातो 
त्यागाचे  प्रेमाचे 
हास्याचे  सुखाचे 
अन सहवासाचे 
विलक्षण क्षण ..
साऱ्या स्मृती कालच्या 
जळून जातात क्रोधाच्या जाळात
मैत्रीच्या भूमीत रुजलेले वैर 
फारच संहारक असते 
कारण मैत्रीचा मृत्यू 
हा कदाचित 
आपला स्वत:चाच मृत्यू असतो 
त्यामुळे 
ते प्रेम जेव्हा मरते 
तेव्हा सारी जमीन 
नापीक झालेली असते
 
विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:19 AM4/21/14
to
तू सोबत असलिस की वाटते 
जगण्याला माझ्या अर्थ आहे
तू दूर गेलीस की वाटते
जीवनच सारे व्यर्थ आहे
सतत तुझ्यात स्वताला पहाणे
आता हेच माझे जीवन आहे
कुणी कहिहि म्हणो पण
हेच माझे प्रेम आहे....
तू रुसतेस कधी माझ्यावर
खूप गम्मत वाटते मला
तु हसतेस कधी माझ्यावर
माझाही ह्रदय हसते मला
मागणे आहे एक माझे 
कायमचे रुसू नकोस कधी
नाहीतर म्हणावे लागेल 
आता रोजचेच माझे मरण आहे
कुणी कहिहि म्हणो पण 
हेच माझे प्रेम आहे...
सतत तुला मिस करतो मी
तुझ्यावर खुप प्रेम करतो मी
जागेपणी झोपेत स्वप्नात
तुला अणि तुलाच पाहतो मी
कधी गेलीस सोडून कायमची
अखेरचा श्वासही म्हणेल की
जरी तुला नसेल प्रेम तरी
फ़क्त तूच माझे प्रेम आहे
कोणी कहिहि म्हणो पण
हेच माझे प्रेम आहे...
हेच माझे प्रेम आहे...

...अंकुश नवघरे
...Ankush Navghare

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:24 AM4/21/14
to
डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ.  मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली 
त्या निमित्ताने 

 डॉ. साळी .. 

माझ्या जीवन रसिक मित्रा 
जवळ जवळ १२ वर्ष झाली 
आपल्या पहिल्या भेटीला 
तेव्हा तू मला वाचवले होते 
उगाचच सणकल्या 
बॉसच्या तावडीतून 
कामाच्या पहिल्याच दिवशी... 

तेव्हापासून 
तुझा प्रत्येक सल्ला 
मला वाचवत होता 
मार्ग दाखवत होता
सहज बोलता बोलता 
मला खूप काही देत होता 
या जीवनात अनेक लोक भेटले 
त्याच्या जगण्याचे 
अनेक स्तर होते ..
 काही वरवरचे उथळ 
काही खाना पिना 
मजा करना या पंथाचे 
तर काही मध्यम
घरादाराच्या चाकोरीत 
गरगर फिरणारे  
तर काही खोलवर 
जीवनाच्या गाभ्याला भिडणारे 
आनंदाचा सुगंध 
दशदिशात पसरवणारे 
सुखाच्या छोट्या छोट्या 
क्षणातून जीवन जगणारे... 
असे जीवन जगणारा 
क्वचित कुणी असतो 
तो तू आह्र्स मित्रा 
असे मी निश्चितपणे सांगू शकतो 
तुझ्या सोबत असतांना 
कंटाळा कधीही खोलीमध्ये 
प्रवेश करू शकला नव्हता 
तुझ्या व्यक्तिमत्वाचा 
एवढा प्रभाव होता ..
मला माहित आहे 
जीवनावरील तुझ्या अदम्य प्रेमामुळेच 
कालपुरुषा ला ही गुंगारा देवून 
आलास तू सहज पणे फसवून 
त्या तुझ्या खोचक खट्याळ 
बोलण्यात गुरफटून ...
तुझ्या संगतीची उणीव 
नेहमीच भासत राहील मित्रा .
 शेवटी 
पंजाबीत म्हणतात तसे, तेवढेच 
म्हणतो 
तुसि ग्रेट हो पापे !!!!

 
विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:32 AM4/21/14
to
डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ न मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली 

त्या निमित्ताने
 
तसे हे रुग्नालयही 
एक रंगमंच आहे 
ज्यात सारे कर्मचारी
आपापली भुमिका 
चोख बजावतात
 आपल्या वाट्याला 
आलेल्या भूमिकेने 
रंगमंच सुंदर करतात 
अस्तित्वाने 
जान आणतात 
या सेवाभावी कामात 
कुणी इथे काही आठवडे, महिने 
वा काही वर्ष राहतात 
तर कुणी वर्षोनुवर्षे टिकतात
इथल्या अस्तित्वाचा 
अविभाज्य होतात 
जुनाट वटवृक्षागत
 
थोडे जोकर थोडे व्हिलन 
थोडी राजकारण 
थोडी बलिदान 
इथेही घडतात 
काही रडणे काही हसणे 
काही रुसणे काही फसणे  
रंगमंचाचे नियम असतात 
  
 पण मुख्य भूनिका 
वाट्याला येणे 
हे खरोखर भाग्य असते 
अर्थात ते एक 
काटेरी सिंहासन असते 
कारण तिथे बसल्यावर 
आपण ज्यांना आपले मानले 
ते ही परके होवून जातात 
कालचे मित्र शत्रू होतात 
आणि फोलपण त्या 
सही शिक्याचे 
मनी ठसवून जातात
 
खरच  ही भूमिका वठवणे 
खूपच अवघड असते 
संवेदनशील स्वाभिमानी लोकांसाठी 
ती एक शिक्षाच असते 
मग ते मनस्वी राजे ठरवतात 
झुगारून देणे 
तो काटेरी मुकुट 
कायमचाच 
आणि धरतात आपला मार्ग 
मुक्त कलंदर जगण्याचा
  
 मित्र हो आपल्या समोर 
आपले असेच कलंदर मित्र 
बसले आहेत 
उतरवून आपला काटेरी मुकुट 
ते आपल्यात आले आहेत 
आपण त्यांना निरोप
द्यायला नाही तर त्यांचे 
स्वागत करायला आलो आहोत 
wel-come back मित्रा !!

 
विक्रांत प्रभाकर 

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:38 AM4/21/14
to
काही मिळवलं होतं,

काही गमावलं होतं.....

फक्त ह्याच विचाराने,

मन खुप रडलं होतं.....

पण ???

आज ह्याच विचाराने,

मी शांत आहे की.....

जे गमावलं होतं,

खरचं ते मी कधी.....

मिळवलं होतं का ???
:(  :'(  :(  :'(  :(  :'(

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:44 AM4/21/14
to
आमच्या ब्रेक-अप नंतर,
मी खुप खुप रडलो,
तिला मनवण्यासाठी,
तिच्या पायाही पडलो.....

तिला कदर नव्हती प्रेमाची,
जिवंतपणी गेलो गाडलो,
तिला तर माहीतचं नाही,
तिच्यासाठी किती मी झूरलो.....

एकदा विचार केला,
कायमचा निरोप घ्यावा जगाचा.....

कारण ???

तिचं माझी होणार नाही,
जिच्यासाठी मी जगाशी नडलो,
आयुष्य माझे संपवताना,
कुणी तरी खुप खुप समजावले.....

ती ही मैत्रिण होती माझी,
जिने मला प्रेम काय असते शिकवले,
खरचं आता आयुष्य जगावेसे वाटते मला,
जन्मदात्यांच्या खातिर मी आज जगलो.....

पुन्हा कुणी तरी मुलगी,
आली आयुष्यात माझ्या,
आणि खरचं मला कळले नाही,
पुन्हा नकळत कसा मी प्रेमात पडलो.....

मी प्रेमात पडलो...!! :-D


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे.....

सागर सावंत

unread,
Apr 21, 2014, 8:53:48 AM4/21/14
to
सकाळी डोळे उघडताच,
" तू मला दिसावं.....

माझ्या खेरीज,
" तुझं कोणच नसावं.....

भास होता तुझे मला,
" तू जवळपास असावं.....

मला एकटक पाहून,
" तू गोड गोड हसावं.....

त्याच कारण पिल्लू,
" फक्त मीच असावं.....

I Love You Pillu...
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे.....
Reply all
Reply to author
Forward
0 new messages