काल इचलकरंजीच्या सरस्वती मंङळ जनता चौकात घडलेला एक प्रसंग...
वाहतुक पोलिसांनी एक विशेष मोहिम सुरु करुन दोन चाकी गाड्यांच्या नंबर प्लेट,ट्रिपल सीट,रॉग साईड ड्रायव्हिंग असे कारणं सांगुन वाहतुकिला शिस्त लावण्यासाठी कागदपत्रांची ,ड्रायव्हीग लायसेन्सची तपासणी करुन दंडात्मक कारवाही सुरु केली...
गौरव अकोळे ह्याची बाईक अडवण्यात आली...मागच्या नंबर प्लेटवर पोलिसांनी नजर टाकली...एक लेडिज कॉन्सटेबल ती नंबरप्लेट काढण्यासाठी पुढ झाली...सोबत एक वरिष्ठ अधिकारी हातात दंडुका घेवुन...त्या लेडी कॉन्सटेबलने तावात येवुन ती नंबर प्लेट काढण्यासाठी नंबर प्लेट्ला हात लावताच गाडीचा मालक असणारा गौरव गाडीवरुन उतरला आणि म्हणाला,"नंबर प्लेटला हात लावायच काम नाही,जो फाईन बसतो तो भरायला तयार आहे...आज पण ...उद्या पुन्हा चेक केल तर उद्यापण आणि कधिही चेक केलं तर कधिपण..."
पोलिस अधिकारी जवळ आला त्यानं सांगितल ५००/-रुपये दंड पडेल...!
क्षणात खिशातुन १०००रुपयाची कोरीकरकरीत नोट काढली आणि त्या पोलिस अधिकार्याच्या हातात दिली...पोलिस अधिकार्याने ५००रुपये परत देण्यासाठी खिशाकडे हात नेला...तेव्हा
गौरव म्हणाला,"सर,बाकीचे उरलेले ५००/-रुपये पुढच्या वेळेसचा ॲडव्हांस दंड भरतोय..."
असं काय होतं त्या नंबर प्लेटवर...?
मित्रांनो,त्या नंबरप्लेटवर होते छत्रपती शिवाजी महाराज...!
जिथं मुगलांची हिम्मत झाली नाही माझ्या राज्याला हात लावायची,तिथं हे ट्राफिक पोलिसवाले हात लावणार ...?
कधिच नाय...
पोलिस अधिकार्याला कळच नाही,तो गौरवच्या तोंडाकडे बघतच राहिला...
गळ्यात भगवी माळ,मस्तकावर चंद्रकोराच ठळक कुंकू,ऐन पंचविशीतला तरुन, बारीक काळी दाढी,तलवारीसारख्या मिश्या...
गौरवने त्या ट्रॉफिक पोलिस आणि लेडि कॉन्सटेबलकडे एक तिरपा कटाक्ष टाकला...आणि हलकेसे स्मित करत गर्वाने उच्चारले,
"शिवरायांसाठी कायपण...!"
(टिपःहि एक सत्य घटना आहे)