उत्साहवर्धक
खजूर....
अत्यंत गोड चवीचे पौष्टिक खजूर सर्वांना
परिचित असलेलं फळ आहे. उत्तर आफ्रिका, सिरिया, अरबस्तान
येथे खजूर भरपूर प्रमाणात मिळतो. खजुराच्या कच्च्या फळाला वाळल्यावर खारीक
म्हणतात.
۩ खजुरामध्ये प्रथिनं, काबरेद, खनिज
द्रव्यं, कॅल्शिअम, फॉस्फरसआणि पोषक
तत्त्वे असतात.
۩ खजुरात ८५ टे
साखरेचं प्रमाण असते. अत्यंत गोड, थंड, स्निग्ध
आणि गुरू गुणाचा खजूर वात-पित्तशामक आहे.
۩ खजूर मेंदूची
उत्तेजना थांबवून नाडीसंस्थेला बळ देतो. चक्कर येणं, भ्रम, मस्तिष्क, दौर्बल्य, पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारीवर उपयुक्त आहे. अतिमद्यपानानंतर दुसऱ्या
दिवशी येणाऱ्या हँगओव्हरवर उपाय म्हणून खजूर खायला द्यावा.
۩ रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झालं असता थकवा येणं, धाप लागणं, चक्कर येणं, भोवळ येणं, छातीत धडधड होणं
अशावेळी खजूर खाल्ल्यानं तक्रारी कमी होतात आणि हृदयाला बळ मिळतं.
۩۩ खजुरात खोकला आणि कफनाशक गुणधर्म आहेत.
۩۩ लघवीची जळजळ, मूत्रमार्गात दाह होत असेल अशावेळी खजूर द्यावा.
۩۩ खूप काम केल्यानंतर थकवा आला असेल, मरगळ येऊन उत्साह
कमी झाला असेल तर खजूर खाल्ल्यानं तत्काळ उत्साह येतो. या गुणांमुळे खजुराला ‘सद्य संतर्पण’ खाद्यपदार्थ म्हणून
ओळखतात.
۩۩ खेळाडू, तरुण, वृद्ध यांना दूध, साखर, काळे मनुके, मध, पिंपळी आणि खजूर खायला द्यावे.
-एखाद्या तरुण युवकाचा आवाज बारीक आणि बायकी वाटतो त्यालाही हे
मिश्रण खूप उपयुक्त आहे.