सर्व मित्र मराठी ग्रुपवरील मित्रांना माझा नमस्कार
मित्रांनो मी महसुल विभागात आता काम करत असुन पुरवठा शाखेत कार्यरत आहे मी आपणांस एक गोष्ट शेयर करीत अाहे शासनाने शिधापत्रिका (रेशनकार्ड) संगणीकरण करणे, आधार सिडींग करणे, बँक व गॅस खाते सिडींग करणे हे काम हाती घेतले आहे जेणेकरुन बोगस शिधापत्रिका धारक की ज्याचे दोन ठिकाणी असलेले शिधापत्रिका बाद करण्यासाठी हे संगणीकरण करण्याचे ठरवले आहे त्यात शासनाचा मुळ हेतु हा आहे की गरीब व मध्यमवर्गीय कुटूंबाला धान्यसाठा पुरवण्यात यावे आणी त्या कुटूंबाने ते धान्य घेतले की नाही हे संगणीकरण झाल्याने समजेल.
मित्रांनो मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे ही बाब आपणाला समजल्यावर आपले आजुबाजुला राहणारे लोकांना जनजागृती करुन ही बाब लक्षात आणुन द्या त्यांनी त्यांच्याकडील असलेली शिधापत्रिका (रेशनकार्ड) संगणीकरण करण्यासाठी फार्म स्वस्त धान्य दुकानदार (कंट्रोल दुकान) कडे भरुन दिलेले नसेल तर ते भरुन देण्याचे काम आपण जनजागृती करुन हे काम केल्याने आपल्याला लोकांचा प्रतिसाद चांगलाच मिळेल त्या फार्म बरोबर लागणारे कागदोपत्र पुढील प्रमाणे आहे.
1. शिधापत्रिका झेरॉक्स प्रत
2. शिधापत्रिकेत असलेले प्रमुख सह सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
3. शिधापत्रिकेतील असलेले कुटूंबातील प्रमुखाचे बॅक खाते जर सर्व सदस्यांचे असल्यास
झेरॉक्स प्रत जोडावे.
4. शिधापत्रिकेतील सदस्यांचे गॅस पासबुक झेरॉक्स प्रत.
5. शिधापत्रिकेेतील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी असल्यास तो नंबर देणे.
मित्रांनों त्याचबरोबर नविन मतदार शोध मोहिम व पदविधर मतदान मतदार हयांचे सुध्दा फार्म भरणे काम शासनाने चालु केले आहे तरी आपले मतदान यादीत नावे आहेत किंवा नाही ते पडताळणी करुन घ्या कारण आता महानगर पालिका निवडणुका येत आहे जेणेकरुन आपले नाव मतदान यादीतुन वगळले असल्यास ते पुन्हा यादीत नावे टाकता येतील.