Fwd: Andhaaarchhaya

6 views
Skip to first unread message

Rahul Bhosale

unread,
Nov 17, 2014, 11:57:45 PM11/17/14
to RGB the colourful ***** life [सप्तरंगी जीवन ]

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात .

RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09769735630]
 For someone very special whom i miss or i will miss :) !!!!

---------- Forwarded message ----------
From: sunil samant <sunil.e...@gmail.com>
Date: 2014-11-16 11:40 GMT+05:30
Subject: Fwd: Andhaaarchhaya
To:



---------- Forwarded message ----------
From: ई साहित्य प्रतिष्ठान <esa...@gmail.com>
Date: 2014-11-16 5:03 GMT+05:30
Subject: Andhaaarchhaya
To:


ई साहित्य प्रतिष्ठान

एक प्रसन्न अनुभव


वाचक मित्रहो

 

सादर आहे एक “खिळवून ठेवणारी” कादंबरी.

 

अंधारछाया : लेखक शशिकांत ओक

 

प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी

 

 Inline image 1



आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन जसे घडले तसे या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही.

योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनांकडे बोट दाखवता येईल.

या कादंबरीची नाळ गुरूचरित्राच्या पारायणाच्या प्रचितीशी जोडली गेली आहे. प्रत्येक पारायणाच्या नंतर विविध तऱ्हेच्या घटना, प्रेरणा, व्यक्तींच्या भेटी प्रसाद रुपाने येत राहिल्या. नाडी ग्रंथ भविष्य, ऑटो रायटींग आदि विषयांची गोडी व त्यावर लेखन कार्य हे त्याच कडीतील एक भाग आहेत.

ॐ नमःशिवाय या पंचाक्षरात मंत्रसामर्थ्य आहे. या नामजपाने मनोशक्ती तयार होऊन मानवेतर योनीतील प्रभावावर उपाय म्हणून उपयोग होतो, याचे धडधडीत उदाहरण म्हणून ही घटना मानता येईल.

कादंबरीचे उपनामकरण विषय-वस्तूला समर्पक ॐ नमः शिवाय असे दिले आहे.

 

याचबरोबर सादर आहे एक ऑडिओ दिवाळी अंक : सुश्राव्य

 


दिवाळीचा सण जवळ आला की आपल्याला वेध लागतात ते रोषणाई, फराळ आणि इतर आनंदाच्या गोष्टींचे. विशेष करून साहित्य प्रेमींना दिवाळी अंकाच्या निमित्ताने साहित्य फराळही मिळतो. सॉनीक ऑक्टेव्हज् मुझिक कंपनी यावेळी साहित्य आणि त्याचबरोबर संगीत प्रेमींसाठी घेऊन आली आहे साहित्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, बालसाहित्य, धार्मिक साहित्य व अशा खूब वैविध्यांनी नटलेले जगातील पहिले मराठी ध्वनिमासिक "सुश्राव्य". 
आणि विशेष बाब अशी की ही सगळी ध्वनिमुद्रणे आता उपलब्ध होणार आहेत ती आपल्या घरात नव्हे नव्हे अगदी आपल्या खिशात आपल्या ऍड्रोईड मोबाईल वर. आणि त्यातही अधिक खुशखबर म्हणजे हे सर्व ध्वनिमुद्रण आपल्याला मिळणार आहे संपूर्णपणे नि:शुल्क म्हणजे अगदी मोफत. 
ई-साहित्य च्या चमूला हि नवीन कल्पना खूप आवडली आणि आमच्या सर्व वाचकांनाही त्याचा लाभ व्हावा  म्हणून आम्ही ती तुम्हालाही उपलब्ध करून देत अहोत. 
चला तर मग आत्ताच या लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा जगातले पहिले मराठी ध्वनिमासिक "सुश्राव्य" आपल्या ऍड्रोईड मोबाईल वर आणि ते हि नि:शुल्क

Inline image 1

आता ई साहित्य प्रतिष्ठानची वाचक संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे आणि पुस्तकांची संख्या पाचशेच्या घरात. आपण ई साहित्य प्रतिष्ठानला करीत असलेल्या सहकार्यासाठी आम्ही आपले आभार मानले असते. पण कुटुंबातल्या लोकांचे कोणी आभार मानतं का कधी? आपल्या या कुटुंबातील लेखक कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सूचना करण्यासाठी पत्रं पाठवत रहा. esa...@gmail.com ला

अधिक माहितीसाठी, आम्ही कोण ते जाणून घेण्यासाठी एकदातरी www.esahity.com या वेबसाईटला भॆट द्या. www.esahity.com वर ई साहित्य प्रतिष्ठानची संपूर्ण माहिती चित्रांसह मिळेल.

 

आपल्या पत्राची वाट पहात आहोत.

 

धन्यवाद

 

आपले नम्र

टीम ई साहित्य प्रतिष्ठान

ई साहित्य प्रतिष्ठान

www.esahity.com
एक प्रसन्न अनुभव









Andharchhaya_Shashikant Oak.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages