Public Speaking Skill

10 views
Skip to first unread message

munna...@gmail.com

unread,
Aug 7, 2013, 12:33:54 AM8/7/13
to mitram...@googlegroups.com, rgb-the-col...@googlegroups.com

बऱ्याचदा भरपूर ज्ञान असूनही presentation skills मध्ये कमी पडल्याने बरेच विद्यार्थी घाबरून जातात. एखाद्या विषयावर कट्ट्यावर फाडफाड बोलणारे पन्नास लोकांसमोर उभे राहून बोलण्यास घाबरतात. आज जाणून घेऊया वक्तृत्वकलेबद्दल (Public Speaking Skill)

काय आहे Public Speaking?
Public Speaking म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या समुदायासमोर एखाद्या विषयावर शिस्तबद्ध पद्धतीने बोलणे. (फालतू बडबड करणे नव्हे) आणि फक्त बोलणेच नव्हे, तर आपला मुद्दा योग्य पद्धतीने पटवून देणे होय. ही संधी सर्वांनाच कधी ना कधी मिळते; परंतु फारच कमी लोक तिचा वापर करतात.

उत्तम Public Speaking साठी कोणते गुण लागतात?
1) आत्मविश्‍वास ः प्रथम आपल्याला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या मुद्याबद्दल आत्मविश्‍वास हवा. काही जणांना हा आत्मविश्‍वास मागील पिढीकडून मिळतो, तर काहींना तो स्वतःला आत्मसात करावा लागतो.

2) संभाषणकौशल्य ः आपण public speaking ध्ये आपल्या संभाषणकौशल्याचा संपूर्ण वापर करत असतो. कोठे थांबायचे, कोठे आवाजाचा पोत बदलायचा, हे नीट कळायला हवे. जसे- खालील वाक्‍य स्वल्पविरामाला थांबून वाचा आणि फरक पाहा.
""मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा करा'' आणि आता वाचा ""मी चोरी करणार, नाही केली तर मला शिक्षा करा.'' आलं का लक्षात मित्रांनो, एखादी छोटी चूक अर्थाचा अनर्थ करू शकते.

3) सखोल वाचन ः कॉम्प्युटरचा एक साधा नियम आहे.
No Input Means No Output. अगदी हाच नियम आपल्यालाही लागू पडतो. आपण जे काही वाचन करतो, त्यातील 50 टक्के आपल्याला आवडते. त्यातून 50 टक्के मनात रुजते. त्यातील 50 टक्के आपणास आठवते अन्‌ त्यातून 50 टक्के आपण बोलतो. म्हणजे जे वाचले त्याच्या 6.25 टक्के आपण वापरतो. मग विचार करा आपणास किती वाचन करावे लागेल.

4) निरक्षीर विवेकबुद्धी ः असं म्हणतात, की राजहंस पक्ष्यासमोर
जरी नीर (पाणी) आणि क्षीर (दूध) एकत्र ठेवलं, तर तो फक्त दूध वेगळं काढून घेऊ शकतो. आता हे खरं असो वा नसो, पण आपणास आपण जे ऐकतो, वाचतो वा बघतो यातून काय आणि किती निवडायचे, हे कळलंच पाहिजे. ही कला अनुभवानेच तयार होते. त्यामुळे मित्रांनो, वाचनाबरोबर भरपूर व्याख्याने ऐका. त्यातून बरेच काही शिकायला मिळते.

5) कलात्मकता ः उत्तम public speaking साठी क्रिएटिव्हिटी अतिशय महत्त्वाची. आपल्या वक्तृत्वात गोष्टी, काही शेर, कवितांचा सुरेख मिलाफ असायला हवा. बऱ्याचदा आपल्या महाविद्यालयात आणि कार्यालयात द्यायच्या Presentation ध्ये आपणास या पद्धतीने अतिशय सुरेख वक्तृत्वाचे दर्शन घडविता येईल. दादा कोंडके, निळू फुले यांच्या वगनाट्यातून शिकण्यासाठी एक उत्तम गोष्ट म्हणजे ते चालू घडामोडींचा सहभाग आपल्या नाटकात करत असत. Latest Updates आपल्या Presentation ध्ये वापरल्यास अधिकच छान!

Public Speaking चा आम्हाला काय उपयोग?
मराठीत एक छान म्हण आहे, ""बोलणाऱ्याची मातीपण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंपण विकलं जात नाही.'' बऱ्याचदा आपलंही असंच होतं. एखाद्या विषयात आपलं ज्ञान उत्तम असतं किंवा आपण उत्तम काम करतो; परंतु त्याचं क्रेडिट कोणीतरी दुसराच घेऊन जातो. याचा फटका फक्त महाविद्यालयात गुण गमावण्यावरच होणार नसून त्याचे परिणाम नोकरीत पदोन्नतीसुद्धा दिसून येतात. सोप्या भाषेत ज्ञान "असणं' आणि "दिसणं' दोन्ही महत्त्वाचं. जमाना Presentation चा आहे. मित्रांनो, आजकाल नोकरीच्या मुलाखतीतही Public Presentation द्यायला लावतात बऱ्याचदा. आता हेच पाहा, एकदा एका निवृत्त लोकांच्या ग्रुपमध्ये सर्वांनी पुढे येऊन स्वतःबद्दल सांगायचं ठरलं. प्रत्येक जण स्टेजवर येऊन स्वतःबद्दल सांगत होता. एक आजोबा आले आणि रडायला लागले कारण विचारल्यावर म्हणतात कसे, ""मी शाळेत पहिलीत असताना प्रथम स्टेजवर येणार होतो तेव्हा आणि त्यानंतर आलेल्या अनेक संधी घाबरून गमावल्या आणि आज वयाच्या पंचाहत्तरीला इथे आल्यावर जो आनंद झालाय तो डोळ्यांवाटे व्यक्त झाला. मला खात्री आहे मित्रांनो, तुम्ही एवढे वर्षं नाही थांबणार! हो ना?

Public Speaking साठी लक्षात ठेवा
भरपूर वाचन करा. मुद्देसूद मसुदा तयार करा. आपण कोणासमोर बोलणार याची माहिती द्या. वेळेत बोलणे बसतंय की नाही, हे पाहा. प्रश्‍नोत्तरांना वेळ ठेवा. समोरील वक्‍त्यांशी ओघवत्या भाषेत बोलून त्यांना आपलंसं करा. चालू घडामोडींवर लक्ष ठेवा. नवीन टेक्‍नॉलॉजी जसे- LCD Projector चा वापर करायला शिका. अपेक्षित प्रश्‍नांची आणि त्याच्या उत्तरांची यादी तयार ठेवा. स्वतःवर विश्‍वास ठेवा. मित्रांचा ग्रुप करून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देऊन आत्मविश्‍वास वाढवा.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages