You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to mitram...@googlegroups.com, rgb-the-col...@googlegroups.com
ज्येष्ठ लेखक शं.ना.नवरे काळाच्या पडद्याआड
आपल्या अनेकांची सकाळ शहाणी करणारे ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे यांचं आज डोंबिवलीत वृध्दापकाळानं निधन झालं.ते 86 वर्षांचे होते. शंकर नारायण नवरे अर्थात वाचकांचे लाडके शन्ना यांनी फक्त कथा-कादंबर्यांपुरतंच आपलं साहित्यविश्व मर्यादित ठेवलं नाही.
पटकथा, नाटकं, लेखसंग्रह अशा अनेक साहित्य प्रांतात त्यांनी मुशाफिरी
केली. 21 नोव्हेंबर 1927 मध्ये त्यांचा जन्म झाला. साध्या-सरळ भाषेतून
साध्या माणसाचं आयुष्य त्यांनी कथांमधून समोर आणलं. ‘सुरूंग’, ‘संवाद’,
‘दिवसेंदिवस’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘दिनमान’ या कादंबर्या त्यांनी लिहिल्या.
तसंच ‘कवडसे’, ‘शन्नाडे’, ‘झोपाळा’, ‘उनसावली’. ‘झोका’, हे त्यांचे ललित
लेखसंग्रह वाचकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. शन्ना
एक उत्तम नाटककारही होते. ‘एक असतो राजा’, ‘नवरा म्हणून नये आपला’,
‘धुक्यात हरवली वाट’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गुंतता ह्रदय हे’,'गहिरे
रंग’, ‘गुलाम’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘वर्षाव’, ‘रंगसावल्या’, ‘गर्ँट
रिडक्शन सेल’, ‘हसत हसत फसवुनी’ अशी अनेक नाटकं रसिकांना आवडली होती.
प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले शन्नांचं लिखाणही त्यांच्यासारखंच टवटवीत होतं.
त्यांच्या लेखनातली पात्रं आपल्याला हसवायची, विचार करायला लावायची आणि
अंतर्मुखही करायची..शन्नांच्या निधनानं मराठी साहित्याला कथांची नवीन ओळख
करून देणारा कथाकार हरपलाय.
माझया तर्फे ज्येष्ठ लेखक शं.ना.नवरे यांना मानाचा मुजरा