पिंपरी-चिंचवडचे पक्षीवैविध्य नोंदसाठी स्वस्तिश्रीचा उपक्रम
निसर्ग क्षेत्रात जनजागृती, शिक्षण व प्रत्यक्ष संवर्धनाद्वारे कार्यरत 'स्वस्तिश्री' संस्थे द्वारा पिंपरी-चिंचवड म.न.पा. क्षेत्रातील पक्षीवैविध्य नोंदीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. ताथवडे, तळवडे, चिखली, मोशी, चोविसावाडी, डुडुळगाव, पुनावळे, किवळे, रावेत, वडमुखवाडी, दिघी, दापोडी, भोसरी, सांगवी, वाकड, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, मामुर्डी, चर्होली(बु.), बोपखेल, आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड, थेरगांव, चाकण अशी एकुण ३० गावे असलेल्या पिं.चिं.म.न.पा.चे क्षेत्रफळ १७७.३० चौ.कि.मी. आहे. अनेक हौशी व अभ्यासू पक्षीनिरिक्षक परिसरात असंघटितपणे पक्षीनिरिक्षण करत आहेत. या सर्व पक्षीनिरिक्षकांच्या नोंदीचे एकत्रीकरण करुन पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्षी वैविध्याचा रीतसर अभ्यास व दस्तावेजीकरण करण्याच्या हेतूने 'स्वस्तिश्री'ने हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व पक्षीनिरिक्षकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी एक दिवस ते मागील पाच वर्षापर्यंतचे पक्षीनिरिक्षण अहवाल (बर्डींग रिपोर्ट) इमेल द्वारे पाठवावे. सदर बर्डींग रिपोर्ट मध्ये निरिक्षण केलेले ठिकाण, अधिवासचा प्रकार, दिनांक, पक्षीचे इंग्रजी नाव व शक्य असल्यास संख्येचा उल्लेख, निरिक्षकाचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक आवश्यक आहे. संपर्क इमेल: omsh...@gmail.com मोबाईल क्र. ९८८११०१५४१.
नोंदः सदर उपक्रम डिसेंबर २०१३ पासून सुरु असून, आपल्या नोंदी पाठवण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०१४. आपल्या नोंदीबरोबर पिंपरी-चिंचवड परिसरात क्वचित दिसणार्या, एकदाच दिसलेल्या, दुर्मिळ असलेल्या, अद्याप नोंद न झालेल्या, किंवा कमी संख्येत दिसणार्या व अनियमित दिसणार्या पक्ष्यांचे फोटो पाठवावे. सदर अहवालात सहभागी पक्षी निरिक्षकांच्याउल्लेख तर असणारच आहे तसेच आपण पाठवलेल्या फोटोंसह आपले नांवाचा उल्लेखही आवर्जून केला जाईल.
आपला विश्वासू
उमेश वाघेला
"स्वस्तिश्री"
निसर्गाचे नवसंजीवन