"देशातील वैद्यकीय भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर"
.
खरच भारतात कटप्रॅक्टीस, फसवी डॉक्टरगीरी, उगीच गरजेची नसताना केली जाणारी अनेक ऑपरेशन्स, हे प्रकार गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहेत, परंतु याकरता आवश्यक कायद्यात झपाट्याने सुधारणा, बदल घडुन येत नाहीयेत.
.
आज सत्यमेव जयते, विविध चॅनल मधुन भारतात, व Lancet सारख्या मासिकातुन हा प्रश्न जगात अधोरेखीत झाला आहे...
.
आज हिंमतराव बावस्कर हे एक जगप्रसिद्ध संशोधक आहेत. त्यांचे अनेक लेख , संशोधने Lanset मधे आलेले आहेत. त्यांच्या कार्याची जगात नोंद घेतली गेली आहे, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील लोकांना, राजकारण्यांना यांची किंमत नाही.
.
आज जो लॉबिंग करेल, राजकारण्यांशी जवळकी ठेवुन वागेल, कोणत्याही गोष्टींना थेट विरोध करणार नाही, त्यांना पुरस्कार, त्यांचे नाव, व जे असे करणार नाहीत, त्यांना संशोधनाला पैसे देणार नाहित, त्यांना पुरस्कार नाहीत. त्यांची दखल घेणार नाहीत, अशी स्थीती झाली आहे.
आज हा लेख वाचुन मला मागे एकदा नंदा काकांनी सांगीतलेल्या गोष्टीची आठवण झाली,
की कशाप्रकारे एका हॉस्पीटलने एका मेलेल्या पेशंटला 2 दिवस जीवंत ठेवले होते...
खरच खूपच भयानक व विदारक चित्र आहे.
.
पुर्वी डॉक्टरला भगवान वैगरे म्हणले जायचे, आजकाल सैतानालाही लाज येईल अशी डॉक्टरांची क्रुत्य असतात. याला वेळीच पायबंद घालणे अत्यंत गरजेचे आहे.
.
अशा लेखांमुळे, अभ्यासामुळे तरी सरकारचे डोके थोडेफार ठिकाणावर येईल अशी अपेक्षा...
.
(सोबत Lancet मधील लेख, लोकसत्तामधील लेख, व मागे एकदा निखील वागळे यांनी डॉ.हिम्मतराव बावस्कर यांची घेतलेली मुलाखत जोडतो आहे. नक्की बघा, प्रत्येकाने बघावी अशी मुलाखत आहे. मला अजुन निट वर्णन नाही जमत. विठ्ठल साळवे, सोनु, विक्रम,सुहेल, व ईतर माझे medical officer मित्र, अनेकांची मला ही मुलाखत पाहताना आठवण झाली. खूप छान आहे.)
.
.
.
.
(तसेच डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचे बॅरीस्टरचे कार्टे हे पुस्तकही अत्यांत सुंदर व प्रत्येकाने वाचावे असे आहे. ग्रामीण भागात राहुनही - आपले ज्ञान, संशोधन याद्वारे जगात प्रसिद्धी मिळवलेल्या, व अत्यंत साध्या राहणीत राहणार्या, आपल्या कामाचा अजिबात बडेजाव, गवगवा न करणार्या , मोजक्या काही व्यक्तीमत्वांपैकी एक डॉ.बावस्कर.)
(त्यांच्या पुस्तकाचे थोडक्यात कोणीतरी परीक्षण लिहावे अशी माझी विनंती आहे.) (तसेच याचा जास्तीत-जास्त प्रचार करावा ही विनंती.)
-सिध्दार्थ