२०-०७-२०१३
शेतकरी मित्रांनो,
गेली २५ वर्षे शेती व्यवसायातील विविध समस्या स्वत: अनुभवून त्यावर उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हया कामास ‘महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन’ च्या माध्यमातून मी आता पूर्ण वेळ वाहून घेतले आहे. महाराष्ट्राच्या ९ कृषी हवामान विभागात शेतीची नमुना प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतात उभारण्याच्या प्रयत्नात आहे.
हया निमित्ताने झालेल्या अभ्यासातून सध्या शेती व्यवसायापुढे मुख्यत्वे खालील प्रश्न आहेत असे जाणवले .-
१. जमिनीचा घटणारा कस व त्यामुळे उत्पादनात घट.
२. कीड,रोगांचा वाढता प्रादुर्भाव.
३. शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारावर अवलंबित्व व त्यातील अशाश्वतीमुळे वाढता उत्पादन खर्च व घटता निव्वळ नफा, व्यक्तिगत गरजांसाठी पुन्हा बाजारावरील अवलंबित्व त्यातून शेतकऱ्याची होणारी तिहेरी पिळवणूक.
हया प्रश्नांची आशादायक उत्तरे वर्धा येथील ‘चेतना विकास’ हया संस्थेच्या प्रक्षेत्रावर पहायला मिळाली. ऑगस्ट,सप्टेंबर हा तेथे भेट देण्यासाठी आदर्श काल आहे. त्यांच्या शेतीतील तत्वांचा ज्याप्रमाणे मला माझे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग झाला तसा आपल्याला आपल्या शेतीतील प्रश्न सोडवण्यासाठी होईल असा विश्वास वाटतो.
शुक्रवार दि. १६ व ३० ऑगस्ट २०१३ हे दिवस चेतना विकास संस्थेच्या सोयीचे आहेत. पैकी रेल्वेचे ३० ऑगस्टचे आरक्षण उपलब्ध आहे.
पुण्याहून संध्याकाळी ५.४० वाजता सुटणारी पुणे नागपूर एक्सप्रेस दुसरे दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचते. स्लीपर कोचचे एकेरी भाडे रु.३८०/- तर ३ टिअर एसीचे भाडे रु.९९०/- आहे. परतीसाठी वर्ध्याहून ७.४५ वाजता सुटणारी नागपूर पुणे गरीबरथ ही एसी ३ टिअर गाडी आहे तिचे भाडे रु.६७५/- आहे व पुण्यास दुसरे दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचते.
वर्धा स्टेशन पासून ५ कि.मी.अंतरावर आलोडी हया गावी हे शेत असून साधारण १००/- रु. रिक्षाभाडे आकारतात. सकाळी पोहोचून साधारण ५ तासाचा शिवार फेरी व चर्चा असा कार्यक्रम आखता येईल. तेथे चहा, नाश्ता, जेवण व बाथरूम-संडास आदी सोयी पुरेश्या प्रमाणात आहेत. हया सर्वाबरोबर शेत दाखवणे, माहिती देणे हयासाठी शेती तज्ञ असतात. मिळणारे ज्ञान हे अमुल्य आहे. हयासाठीचे सहभाग शुल्क ‘महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन’ तर्फे दिले जाईल.
शेतकरी पती-पत्नी आल्यास जास्त उपयुक्त राहील.तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधा. म्हणजे रेल्वे रिझर्वेशन करणे तसेच एकंदरीत कार्यक्रमाचे चांगले नियोजन करता येईल. पुण्याहून ट्रिपचा एकंदर खर्च माणशी अंदाजे १५५०/- ते २१५०/- येईल. आपल्या गावाहून जवळ असल्यास अथवा प्रवासाचे स्वतंत्र साधन असल्यास हा खर्च कमी अधिक होऊ शकेल. दि.३० रोजी सकाळी पोहोचण्याचे अंदाजाने आपापल्या गावाहून निघू शकता. फक्त आपल्या येण्याचे नक्की करून मला त्वरित कळवावे. आपल्या संपर्कातील जिज्ञासू शेतकऱ्यांनाही सांगावे.
महाराष्ट्रातील आत्महत्यापिडीत घरातील विधवांच्या सक्षमीकरणासाठी प्रवासखर्चाचा भारही महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन उचलेल.
त्या आधी आपण खालील फॉर्ममध्ये स्वत:बद्दलची माहिती भरून पाठवावी.
कळावे,
श्रीनिवास खेर
मोबाईल: ९८२३० ६६६४६
ई-मेल- shrin...@mkf.org.in
प्रार्थमिक माहिती
नाव:
पत्ता:
एकूण क्षेत्र: पैकी जिराईत: ८ माही बागाईत: वर्षभर बागाईत:
सिंचनाचे साधन:
सध्या घेत असलेली पिके:
कुटुंबातील व्यक्ती:
जनावरे:
गेल्या ३ वर्षाचे पिक कर्जाचे आकडे:
स्वत:चे शेतीतीत प्रश्न:
१.
२.
३.
४.
५.
Thanks & Regards,
Shrinivas Kher
Consultant & Research Asociate
Maharashtra Knowledge Foundation (MKF)
MS-IHMCT Campus, Ground Floor,
Pune 411 016, Maharashtra, INDIA.
Tel: +91-20-2566 1317, 2566 1318
Cell: +91-9823066646
kher...@yahoo.co.in
website: www.mkcl.org
Visit MKCL at: Facebook | Twitter | Linkedin | YouTube | Flickr | MySpace | Google
![]()
Celebrating the Decade of Digital Empowerment
उमेश खाडे98926 49664