वैभव ढेरे व अजिंक्य काळे यांना UPSC परीक्षेमधे अतिशय उत्तम यश !!!

1 view
Skip to first unread message

Siddharth Prabhune

unread,
May 4, 2013, 4:25:36 AM5/4/13
to

नमस्कार, 
             आपले सर्वांचे मित्र वैभव ढेरे व अजिंक्य काळे यांना UPSC परीक्षेमधे अतिशय उत्तम यश मिळाले आहे. 
वैभवची अपार मेहनत करायची वृत्ती, चिकाटी ही खरोखर कौतुकास्पद आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने हे यश प्राप्त केलेले आहे. 
खुप प्रयत्न करुन, सर्व गोष्टींमधे सहभागी होत पहील्याच प्रयत्नामधे अजिंक्यने हे यश मिळवले आहे. 

दोघांचीही समाजाप्रती काम करण्याची भावना,संवेदनशीलता, समस्या समजुन घेण्याची, काम करायची वृत्ती, लोकांशी जुळवुन घेणे, यामुळे दोघेही अतिशय चांगले, प्रामाणीक, कर्तव्यदक्ष अधिकारी बनतील ही मला खात्री आहे.
आज वैभवने माझे लाल दिव्याच्या गाडीतुन फिरायचे स्वप्न पुर्ण केले याचा मला खूप अभिमान आहे. मीच परीक्षा पास झाल्यासारखे मला वाटत आहे. 

काही वेळा काही जणांनी त्यांना या पासुन परावृत्त करायचाही प्रयत्न केला, परंतु तरीही हार न मानता त्यांनी हे यश संपादीत केलेले आहे. 
दोघांचेही मनापासुन खूप खूप खूप अभिनंदन !!! 

-सिध्दार्थ 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages