Fwd: Schedule and outline of JHA's Dhoran Badala Parishad, 24 Feb 2014; 'धोरण बदला' परिषद

0 views
Skip to first unread message

Yashwant Zagade

unread,
Feb 22, 2014, 1:19:41 AM2/22/14
to nirman...@googlegroups.com, nirman_m...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, Nirman Coordination Team, nirman_a...@googlegroups.com





                                              जगण्याच्या हक्काचं आंदोलन

सामाजिक सेवा सुरक्षेसाठी...

आयोजित

'धोरण बदला' परिषद

 

परिषदेची रूपरेषा 

वेळ

कार्यक्रम

व्यक्ती  

१२.१५ ते १.००

नाटक आणि गाणी

लोकायतचे कार्यकर्ते

१.०० ते १.१५

प्रास्ताविक

मेधा थत्ते

१.१५ ते १.२०

आरोग्य एका कष्टकरीचे मत

योगिता थेऊरकर- मासूम आणि जन आरोग्य अभियान

१.२० ते १.३०

आरोग्य मांडणी ७ मि. व ठराव ३ मि.

अभय शुक्ला- जन आरोग्य अभियान

१.३० ते १.३५

अन्नसुरक्षा- एका कष्टकरीचे मत

कॉ शंकर पुजारी एका कष्टकरी कार्यकर्त्याचे नाव सुचवतील

१.३५ ते १.४५

अन्नसुरक्षा मांडणी ७ मि., ठराव ३ मि.

उल्का महाजन- अन्न अधिकार अभियान

१.४५ ते १.५०

शिक्षण - एका कष्टकरीचे मत

राहुल गवारे , Active Teacher's Forum and BGVS

१.५० ते २.००

शिक्षण मांडणी ७ मि. व ठराव ३  मि.

अभिजित अ. मी. - लोकायत

२.०० ते २.०७

चळवळीचे गाणे

श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) चे कार्यकर्ते

२.०७ ते २.१२

घरघुती वापराचे पाणी - एका कष्टकरीचे मत

संतोष थोरात किंवा राजीव वंजारे मुंबई

२.१२ ते २.२२

घरघुती वापराचे पाणी- मांडणी ७ मि. व ठराव ३ मि.

कॉ धनाजी गुरव

२.२२ ते २.२७

पेन्शन - एका कष्टकरीचे मत

पेन्शन परिषद एका कष्टकरी व्यक्तीचे नाव सुचवेल

२.२७ ते २.३७

पेन्शन- मांडणी ७ मि. व ठराव ३ मि.

शैलजा अरालकर- पेन्शन परिषद

२.३७ ते २.४२

रोजगार हमी- एका कष्टकरीचे मत

जागृत कष्टकरी संघटना एका कष्टकरी व्यक्तीचे नाव सुचवेल

२.४२ ते २.५२

रोजगार हमी- मांडणी ७ मि., ठराव ३ मि.

शिराझ प्रभू- कष्टकरी संघटना

२.५२ ते ३.००

चळवळीचे गाणे

श्रमिक महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या

३.०० ते ३.०५

स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- एका कष्टकरीचे मत

मेधा थत्ते एका कष्टकरी व्यक्तीचे नाव सुचवतील

३.०५ ते ३.१५

स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- मांडणी ७ मि. व ठराव ३ मि.

कॉ विजय कुलकर्णी

३.१५ ते ३.२५

ट्रेड यूनियन - सामाजिक सेवा- सुरक्षांबाबतचे प्रश्न व भूमिका

कॉ विवेक मोन्टेरो- कामगार संघटना संयुक्त कृती समिती

३.२५ ते ३.५०

राजकिय पक्षांचे सामजिक सेवा-सुरक्षेबाबतचे धोरण

(प्रत्येकी ७- मिनिटे)

राजकिय पक्षांचे प्रतिनिधी

·         भारताचा कम्युनिस्ट पक्ष- डॉ भालचंद्र कांगो  

·         भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)- डॉ  अशोक ढवळे

·         शेतकरी कामगार पक्ष- आमदार धैर्यशील पाटील

३.५० ते ३.५८

चळवळीचे गाणे

कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते

३.५८ ते ४.२३

राजकिय पक्षांचे सामजिक सेवा-सुरक्षेबाबतचे धोरण

(प्रत्येकी ७- मिनिटे)

राजकिय पक्षांचे प्रतिनिधी

·         भारिप बहुजन महासंघ- पक्ष प्रतिनिधी येतील. नाव अजून समजले नाही.

·         लाल निशाण पक्ष- कॉ एम ए पाटील  

·         आम आदमी पार्टी- अॅड. शकील अहमद  

४.२३ ते ४.३८

प्रमुख पाहुणे

डॉ बाबा आढाव – असंघटीत कष्टकऱ्यांचे जेष्ठ नेते

४.३८ ते ४.५२

अध्यक्षीय भाषण

कॉ गोलंदाज- समन्वयक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य  

४.५२ ते ५.०० 

समारोप

मेधा थत्ते



कराचा पैसा कोणासाठीजनतेला सेवा देण्यासाठी!

कष्टकरी मागतो काय ? हक्कानं जगू द्या, दुसरं काय !!!


चलो आझाद मैदान, मुंबई

दि. २४ फेब्रुवारी २०१४, दुपारी १२ ते सायंकाळी ५  

ही परिषद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या परिषदेमध्ये आपण शामिल व्हावे…. 


  • निवडणुकीच्या तोंडावर योजनांचे तुकडे नकोत...सामाजिक सेवा-सुरक्षेचा हक्क हवा.
  • सर्व सामाजिक सेवांसाठी समग्र धोरण राबवा. त्यांच्या निधीमध्ये भरीव वाढ करा.सामाजिक सेवा-सुरक्षेसाठी इतर विकसित व अनेक विकसनशील देश राष्ट्रीय उत्पादनाच्या १५ ते २५% खर्च करतात. भारत फक्त ७% खर्च करतो. ते ताबडतोबीने दुप्पट करा. 
  • सामाजिक कल्याणाच्या योजना लक्षाधारित करून मर्यादित करण्याचा, एपीएल- बीपीएल कार्डांचा आणि अधिकृत-अनधिकृत वस्त्यांचा खेळ बंद करा. सर्वाना चांगल्या दर्जाच्या सामाजिक सेवा-सुरक्षा पुरवा. कार्डची अट न घालता अन्न-सुरक्षा कायद्याचा आणि आरोग्य योजनांचा लाभ सर्व कुटुंबाना द्या. सर्व असंघटीत कष्टकरी, शेतकरी वृद्धाना दरमहा २००० रुपये पेन्शन द्या. ० ते १८ वयोगटातील सर्वांना मोफत, दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था उभारा. कोणालाही शिक्षण-हक्कातून वगळू नका.
  • लोकांना सामाजिक सेवा देणाऱ्या सरकारी यंत्रणांची गुणवत्ता सुधारा, त्या बळकट करा. त्यांचे खाजगीकरण करू नका. राज्यातील शाळा, दवाखान्यांचे चालू असलेले खाजगीकरण रद्द करा. 
  • सरकारी यंत्रणामधील कायमस्वरूपी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करा
  • सरकारी सेवेवर लोकांची देखरेख येईल अशी स्थानिक व्यवस्था राज्यभर उभारा.
  • सरकारी यंत्रणा नीट राबवता येत नसेल, खाजगीकरण एवढेच उत्तर असेल तर मंत्री व IAS अधिकारी यांनी खुर्च्या खाली करा.
  • खाजगी शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स मधील लूट थांबवण्यासाठी त्यावर सामाजिक नियंत्रण आणा.

आपले

जगण्याच्या हक्काचे आंदोलन!

सामाजिक सेवा सुरक्षेसाठी..

जागतिकीकरण विरोधी कृती समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, अन्न अधिकार अभियान, जन आरोग्य अभियान, मुंबई शिक्षण कंपनीकरण विरोधी अभियान, पाणी हक्क समिती, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, कागद-काच-पत्र कष्टकरी पंचायत, रेशन बचाव समिती, लोकायत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, सर्वहारा जनआंदोलन, कष्टकरी संघटना, जागृत कष्टकरी संघटना, शेतकरी शेतमजूर पंचायत समाजवादी जनपरिषद, श्रमिक मुक्ती संघटना, शोषित जन आंदोलन, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी), नर्मदा बचाव आंदोलन, श्रमिक महिला मोर्चा, महिला-बाल हक्क अभियान, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, समाजवादी महिला सभा, महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, सीटू(सेंटर फॉर ट्रेड युनियन्स), न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह, जागृत कामगार मंच, पुणे शहर मोलकरीण संघटना, निवारा बांधकाम कामगार संघटना, कचरा वाहतूक श्रमिक संघ, असंघटीत श्रमिक पंचायत, स्त्रीवाणी संघटना, कष्टकरी घरकामगार संघटना, नवनिर्मिती, रिस्पॉन्झ, खोज, संग्राम संस्था, समता प्रतिष्ठान, ग्रामीण विकास परिषद, जन स्वास्थ्य अभियान-मुंबई, मुंबई मोबाईल क्रेशेज, कोरडवाहू गट, रायगड जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सोपेकॉम, मोलकरीण व घरेलू कामगार संघटना


--
You received this message because you are subscribed to the Google Groups "AnnaAdhikarAbhiyan" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to annaadhikarabhiyanma...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.



--
Yours,

Yashwant Zagade
9594057767

JHA Dhoran Badala Parishad, timetable.pdf
draft patrak_morcha_24th feb.14.pdf
bhoomika, maaganya, 20 Feb.14.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages