Fwd: सीमोल्लंघन, जानेवारी २०१३

1 view
Skip to first unread message

Trishul Kulkarni

unread,
Feb 12, 2013, 11:57:11 PM2/12/13
to nirman_aurangabad


---------- Forwarded message ----------
From: nikhil joshi <josn...@gmail.com>
Date: 2013/2/12
Subject: Fwd: सीमोल्लंघन, जानेवारी २०१३
To: nirm...@googlegroups.com


नमस्कार मंडळी,

सीमोल्लंघन, या वर्षातील पहिला अंक देताना खूप आनंद होत आहे. या अंकावर काम करताना काही विशेषता जाणवल्या. 

१. या अंकातल्या बऱ्याच बातम्या निर्माणींनी स्वतःहून लिहून पाठवल्या. हे sustainability च्या दिशेने नक्कीच एक पुढचे पाउल आहे.

२. अगदी नुकतेच ज्यांचे निर्माण शिबीर झाले अशा मुलांचेही या अंकात मोठे योगदान आहे, मग सागर व मकरंदने लिहिलेली बातमी असो वा मकरंदने आपल्याला करून दिलेला 'गोष्ट मेंढा गावाची' (लेखक- मिलिंद बोकील) या पुस्तकाचा परिचय.

आपण सर्वजण असेच सहभागी पद्धतीने सीमोल्लंघन चालवण्याचा प्रयत्न करू. या अंकाच्या निमित्ताने काही प्रश्न पडले व काहींची उत्तरे मिळण्यास सुरुवात झाली. ते सर्वांसोबत शेअर करावेसे वाटतात.

१. कमीत कमी धनसंचय करून सामाजिक काम करता येते का? त्यासाठी कोणी 'रोल मॉडेल' आहे का?

२. बऱ्याचदा आपले नातेवाईक/ स्नेही पूर्ण वेळ सामाजिक काम करू शकत नाहीत. मात्र त्यांना योगदान देण्याची इच्छा असते. ते त्यांनी कसे द्यावे?

३. शिकत असणाऱ्या डॉक्टर मित्रांना सामाजिक कामासाठी कसे योगदान देता येईल?

४. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात आधुनिक तंत्रज्ञानकेंदित विकासासाठी प्रयत्नशील रहावे का?

५. दुष्काळावर काम करण्याच्या पद्धती कोणत्या? निर्माणचे कोणी अशा प्रकारचे काम करत आहे का?

६. गावात राहून micro पातळीवर काम करावे का policy maker बनून macro पातळीवर?

७. आदिवासींवर सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणारा अन्याय रोखता येईल का? कसा?

८. संसदीय लोकशाहीच्या युगात विकेंद्रीकरण हा पर्याय होऊ शकतो का? विकेंद्रीकरणाचा प्रयोग कोठे झाला आहे का? गावातल्या लोकांमध्ये आपले निर्णय घेण्याचं शहाणपण असतं का?

९. दारू नियंत्रित करण्याचे विविध मार्ग कोणते?

१०. माझ्या सामाजिक विचारांमुळे मी माझ्या ग्रुपमध्ये एकटा पडलोय. चांगल्या कामासाठी तर ग्रुपची गरज असते.  तर मी काय करावे? 

तुम्हाला मिळाली काही उत्तरे तर जरूर शेअर करा. आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर फोन/मेल करा. त्यांना खूप प्रेरणा मिळेल. धन्यवाद!

--
Regards,

Nikhil

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "nirman5" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to nirman__5+...@googlegroups.com.

For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 



--
Thanks,
Trishul Kulkarni
NIRMAN
http://nirman.mkcl.org/
M: +91 92709 33051

NIRMAN is a pursuit of leading a meaningful life!

Simollanghan_January13.pdf

Nishant Thombre

unread,
Feb 25, 2013, 3:33:03 PM2/25/13
to nirman_a...@googlegroups.com
nice 1
> "NIRMAN_Aurangabad" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to nirman_auranga...@googlegroups.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages