मित्रांनो,
आय . आय. एम. अहमदाबाद मधले प्रा. अनिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली SRISTI आणि NIF (National Innovation Foundation) या संस्था वर्षातून २ वेळा "शोध यात्रे" चं आयोजन करतात.
भारतातल्या खेड्यापाड्यातले, दुर्गम भागातले Grass-root Innovators शोधून काढणे; परंपरागत ज्ञान, शेतीच्या पद्धती, कला-संस्कृती यांचा अभ्यास करणे; सामाजिक , पर्यावरणाच्या समस्या जवळून समजावून घेणे हा शोध यात्रेचा उद्देश असतो. भारतातल्या एखाद्या दुर्गम भागात ६-८ दिवस , विविध खेड्यांना भेटी देत , १००-१५० किमी. पायी फिरणे असं ह्या शोध यात्रेचं स्वरूप असतं. भारतातले आणि भारता बाहेरचे, विविध क्षेत्रातले आणि स्तरातले लोकं ह्यात सहभागी होतात.
ह्या वेळची शोध यात्रा महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यात ५ ते १२ मे २०१३ च्या दरम्यान होणार आहे.
महाराष्ट्रातल्या निर्माणीं साठी हि चांगली संधी आहे. शोध यात्रेला apply करण्या साठी
अधिक माहिती-शंका-कुशंका आणि इतर कोणत्याही करणासाठी तुम्ही मला ०९४०६४८९४४९ ह्या नंबरवर शक्यतो रात्री फोन करू शकता!
- आकाश