Fwd: सामाजिक सेवा व सुरक्षा हक्क सप्ताह - (दि. ९ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन) - राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याबद्दल आवाहन

5 views
Skip to first unread message

Yashwant Zagade

unread,
Jul 18, 2014, 1:00:39 AM7/18/14
to Nirman Coordination Team, Nirman Search, nirm...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com, nirman_m...@googlegroups.com, nirman_a...@googlegroups.com, tiss_s...@googlegroups.com

Yours,

Yashwant Zagade
9594057767

“For ours is a battle not for wealth or for power. It is the battle for freedom. It is the battle of reclamation of human personality.” Dr. Babasaheb Ambedkar.



---------- Forwarded message ----------
From: Jaganyachya Hakkach Andolan <jhass...@gmail.com>
Date: 2014-07-16 11:59 GMT+05:30
Subject: सामाजिक सेवा व सुरक्षा हक्क सप्ताह - (दि. ९ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन) - राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याबद्दल आवाहन
To: Brian Lobo <brian...@gmail.com>, Shiraz Prabhu <shiraz...@gmail.com>, sunitag...@gmail.com, Gorakh Avhad <gorak...@gmail.com>, Gayasuddin Shaikh <gash...@gmail.com>, drsamee...@yahoo.co.in, Kishor Khilare <drkh...@rediffmail.com>, shripa...@rediffmail.com, Shakuntala Savita <sha...@gmail.com>, masum <mas...@bsnl.in>, Rachana <racha...@gmail.com>, Kiran Moghe <kiran...@gmail.com>, abhijit more <dr.abhi...@gmail.com>, Anand Pawar <anand...@gmail.com>, Anant Phadke <anant....@gmail.com>, Kagad Kach Patra Kashtakari Panchayat <kkpk...@gmail.com>, Suhas Kolhekar <kolheka...@gmail.com>, Shankar Pujari <shankar...@gmail.com>, shailesh...@rediffmail.com, vikramranjana kanhere <vikr...@gmail.com>, arogy...@rediffmail.com, dat...@yuvaindia.org, yuva...@yuvaindia.org, jyo...@yuvaindia.org, lokvikassam...@yahoo.com, KHOJ Melghat <khojm...@gmail.com>, Amhi Amchya Arogyasathi-gmail <arogy...@gmail.com>, Madhukar Gumble <apeksha...@gmail.com>, Purnima Upadhyay <purnim...@gmail.com>, saiba...@rediffmail.com, bhimsha...@yahoo.com, Rajiv Thorat <iss...@rediffmail.com>, Samata Pratishthan <samat...@rediffmail.com>, loksa...@yahoo.co.uk, santo...@rediffmail.com, Apnalaya <hea...@apnalaya.org>, Leni Chaudhuri <lenich...@gmail.com>, sanjay nagral <sanjay...@gmail.com>, Institute of Public Health Bangalore <djoh...@yahoo.com>, marya...@yuvaindia.org, anees.m...@rediffmail.com, gazel...@yahoo.com, Mahila Rajsatta Andolan Mra <mahila_...@yahoo.com>, prayas...@vsnl.net
Cc: annaadhikarabh...@gmail.com, "surekh...@yahoo.com" <surekh...@yahoo.com>, social worker <socia...@gmail.com>, inda...@gmail.com, योगिनी खानोलकर <yogini....@gmail.com>, he...@hotmail.com, IHMP PUNE <ih...@ihmp.org>, Abhay Shukla <abhays...@gmail.com>, "P.M. Shah Foundation" <pmsh...@gmail.com>, Savita Jeevandeep <savitaje...@gmail.com>, Hemraj patil <hraj.h...@gmail.com>, Dr Arun Gadre <drarun...@gmail.com>, rajendra mohite <mohit...@gmail.com>, cfar maharashtra <cfa...@gmail.com>, Ram Adsule <rama...@ccdtrust.org>, Yashwant Zagade <mapu....@gmail.com>, Rajan Kshirsagar - yahoo <raja...@yahoo.com>, mamtab...@rediffmail.com, jsa...@yahoo.com, Bhausaheb Aher <bhausa...@gmail.com>, in...@sangram.org, astit...@gmail.com


सामाजिक सेवा व सुरक्षा हक्क सप्ताह 

(दि. ९ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन)

राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याबद्दल आवाहन

प्रिय साथी,

आज देशात एका बाजूला आपली नैसर्गिक साधन-संपत्ती, सामाजिक मालकीच्या सेवा-वस्तू अक्षरशः कवडी मोलात काही कॉर्पोरेट कंपन्या आक्रमकपणे सत्ताधा-यांच्या मदतीने स्वतःच्या पदरात पाडून घेत आहे. तर दुसऱ्या बाजूला महागाई आणि भ्रष्टाचाराने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, प्रवाससेवा, अन्न-धान्य, भाजीपाला, गॅस आज प्रचंड महाग झाली आहे. या सेवा पुरवणारी सरकारी यंत्रणा अपुरी, अकार्यक्षम व भ्रष्टाचारात बुडलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्रातून या सेवा घेणे दिवसें दिवस परवडत नाही, तिथेही लोकांची लूटमार चालूच आहे. असंघटीत कष्टकरी, शेतकरी, कामगार, दलित- आदिवासी यांना सामाजिक सुरक्षा नाही, बहुसंख्य वृद्धाना पेन्शन नाही. सगळ्यांना काम मिळेलच याची हमी नाही. सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे शासनाच्या या धोरणाविरुद्धच्या आंदोलनांना, अभियानांना राज्य शासनाचा असलेला प्रतिसाद हा अतिशय क्षीण आणि असंवेदनशील असा झाला आहे. एकेकट्या मुद्द्यांवर आधारित, एकेकटी लढणारी अशी अनेक आंदोलने निकराचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा प्रस्थापित राजकारण्याच्या कक्षेतून लोकहिताचे कळीचे मुद्दे, त्यांचे धोरणात्मक प्रश्न बाहेरच ठेवले जातात, तेव्हा सामाजिक सेवांसाठी कार्यरत असलेल्या अभियानांच्या सध्याच्या रणनीतीच्या मर्यादा, पदोपदी जाणवत राहतात. त्यामुळे सामाजिक सेवांबाबत आजपर्यंत एकेकट्या मुद्द्यावर लढणा-या, पण धोरणात्मक पर्याय मांडू इच्छिणा-या विविध जन आंदोलनांनी आता एकत्र यायला हवे, आणि पर्यायी धोरणावर आधारित असा व्यापक लढा उभारून त्याच्या जोरावर नवी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करायला हवी. ही काळाच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे.


म्हणूनच आता राज्यातील वेगवेगळे सामाजिक आंदोलने, कामगार संघटना, पुरोगामी लोकशाहीवादी पक्ष आणि जन संघटनांनी मिळून ‘जगण्याच्या हक्काचं आंदोलन...सामाजिक सेवा-सुरक्षेसाठी’ नावाची व्यापक ‘महा-आघाडी’ तयार केली आहे. (आंदोलनाच्या भूमिका आणि मागण्या दर्शवणारे पत्रक सोबत जोडलेले आहे)


आज शासनाला जनता भरपूर पैसा कररूपाने देत असूनही, जनतेला त्यांच्या जगण्यासाठीच्या मुलभूत सेवा का मिळू शकत नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी आणि सामाजिक सेवा- सुरक्षेबाबत सध्याचे धोरण बदलण्यासाठी सदर आंदोलन गेल्या ९ महिन्यापासून कार्यरत आहे. सदर आंदोलन म्हणजे काही निवडणुकीसाठीची आघाडी नाही किंवा एकसंध वैचारिक गट नाही. तसेच हे आंदोलन सामाजिक सेवा व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारे आहे. अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, सार्वजनिक स्थानिक वाहतूक व्यवस्था, असंघटीत कामगारांना पेन्शन, रोजगार हमी या सामाजिक सेवा व सुरक्षा सर्वसामान्यांना मिळायला हव्यात या भूमिकेतून संघर्ष करण्यासाठी व्यापक आघाडी बनवण्याचा हा प्रयत्न आहे.


येत्या ऑगस्ट महिन्यात दि. ९ ऑगस्ट (क्रांती दिन) ते १५ ऑगस्ट २०१४(स्वातंत्र्य दिन) या आठवड्यात जगण्याच्या हक्काच्या आंदोलनातर्फे विविध कृती कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील अनेक भागात करण्यात येणार आहे. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी पुढील गोष्टी ठरविण्यात आल्या आहेत-

1.      या आंदोलनातील वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचे एकत्र जिल्हावार मेळावे आयोजित करणे(कालावधी- १५ जुलै ते १ ऑगस्ट). हे मेळावे/ बैठका आयोजित करण्यासाठी खालील व्यक्तींनी व संघटनांनी पुढाकार घ्यावा असे ठरले-

a.      मुंबई- कामगार संघटना संयुक्त कृती समिती, अन्न अधिकार अभियान, घर बचाव घर बनाव आंदोलन, जन स्वास्थ्य अभियान

b.      ठाणे- सीटू, आयटक, लाल निशाण पक्ष(लेनिनवादी), कष्टकरी संघटना

c.      रायगड- सर्वहारा जनआंदोलन- उल्का महाजन, विनिता बाळेकुंद्री, सीटू

d.      नाशिक- सीटू, आयटक,

e.      पुणे- लाल निशाण पक्ष(लेनिनवादी), पुणे शहर मोलकरीण संघटना, लोकायत, एन टी यू आय

f.       औरंगाबाद- सी पी आय, सुभाष लोमटे, लाल निशाण पक्ष(लेनिनवादी)

g.      नागपूर- आयटक

h.      जळगाव- सीटू, लाल निशाण पक्ष(लेनिनवादी)

i.        अमरावती- आयटक, खोज

j.        परभणी- सी पी आय

k.      नांदेड- लाल निशाण पक्ष(लेनिनवादी)

l.        यवतमाळ- लाल निशाण पक्ष(लेनिनवादी)

m.    बीड- आयटक, समता प्रतिष्ठान

n.      नंदुरबार- सी पी एम, जनार्थ, नर्मदा बचाव आंदोलन

o.      अहमदनगर- आयटक, सी पी आय, सीटू, लाल निशाण पक्ष(लेनिनवादी), श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी)

p.      कोल्हापूर- सी पी एम, रेशन बचाव समिती, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी)

q.      सांगली- आयटक, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी)

2.      हा मेळावा/ बैठक ही व्यापक स्वरूपाची असावी. आपल्या जिल्ह्यातील समविचारी संघटना, पक्ष, आंदोलने, नेटवर्क्स यांना सोबत घ्यावे.

3.      या मेळाव्यात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या सप्ताहात काय काय कृती कार्यक्रम घेता येतील याची सविस्तर चर्चा करून सामुहिकपणे निर्णय घेणे आणि तशी तयारी करणे अपेक्षित आहे. सदर मेळावा अगर बैठकीसाठी राज्य निमंत्रक समिती सदस्यांनी यावे अशी अपेक्षा असेल तर तसे अगोदर कळवावे.

4.      प्रत्येक जिल्ह्यातून दोन संपर्क व्यक्तींची नावे व संपर्क नंबर या आंदोलनाच्या राज्य निमंत्रक समितीस कळवायची आहेत.

5.      वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. यामध्ये जनसुनवाई, परिषदा, जनमंच, जनसंसद, मोर्चा, धरणे इ. पर्याय सुचविण्यात आले आहेत.

6.      जिल्हावार आंदोलनाची माहिती, पेपर कात्रणे, प्रेस रिलीज, फोटो यांची प्रत माहितीसाठी राज्य निमंत्रक समितीस पाठवावी.

7.      ऑगस्ट महिना अखेरीस एका राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतची तयारीची पुढील बैठक ही दि. १९ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील सीटू ऑफिस येथे होईल. त्यानंतर सायंकाळी प्रेस कॉन्फरंसचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

 

या आंदोलनांमध्ये आपण मोठ्या संख्येने शामिल होवून हे आंदोलन यशस्वी कराल अशी आशा आहे.

कळावे,

कॉ विवेक मोन्तेरो, कॉ ए डी गोलंदाज, चंद्रकांत यादव, उल्का महाजन, धनाजी गुरव, ब्रायन लोबो, मेधा थत्ते, नीरज जैन, शंकर पुजारी, डॉ अभय शुक्ला, सुभाष लोमटे, डॉ सुहास कोल्हेकर आणि डॉ अभिजित मोरे

राज्य निमंत्रक समिती,

जगण्याच्या हक्काचं आंदोलन... सामाजिक सेवा- सुरक्षेसाठी !

 

 

संपर्क- कॉ ए डी गोलंदाज- ९८२०६१३९९५, कॉ विवेक मोन्तेरो- ९८६९३६१६०२, कॉ मेधा थत्ते- ९४२२५३०१८६, डॉ अभय शुक्ला–९४२२३१७५१५,डॉ अभिजित मोरे – ९४२०२१८७८९ /७३८५७४८१७८

 

आपले,

जागतिकीकरण विरोधी कृती समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), अन्न अधिकार अभियान, जन आरोग्य अभियान, मुंबई शिक्षण कंपनीकरण विरोधी अभियान, पाणी हक्क समिती, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, कागद-काच-पत्र कष्टकरी पंचायत, रेशन बचाव समिती, लोकायत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सर्वहारा जनआंदोलन, कष्टकरी संघटना, जागृत कष्टकरी संघटना, शेतकरी शेतमजूर पंचायत समाजवादी जनपरिषद, श्रमिक मुक्ती संघटना, शोषित जन आंदोलन, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी), नर्मदा बचाव आंदोलन, श्रमिक महिला मोर्चा, महिला-बाल हक्क अभियान, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, समाजवादी महिला सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, सीटू(सेंटर फॉर ट्रेड युनियन्स), न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह, जागृत कामगार मंच, पुणे शहर मोलकरीण संघटना, निवारा बांधकाम कामगार संघटना, कचरा वाहतूक श्रमिक संघ, असंघटीत श्रमिक पंचायत, स्त्रीवाणी संघटना, कष्टकरी घरकामगार संघटना, नवनिर्मिती, रिस्पॉन्झ, खोज, संग्राम संस्था, समता प्रतिष्ठान, ग्रामीण विकास परिषद, जन स्वास्थ्य अभियान-मुंबई, मुंबई मोबाईल क्रेशेज, कोरडवाहू गट, रायगड जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, सोपेकॉम, मोलकरीण व घरेलू कामगार संघटना 




Report of 4th July 2014 meeting.pdf
Report of 4th July 2014 meeting.doc
bhoomika, maaganya, 21st.Feb....pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages