प्रिय साथी,
ऑनलाईन शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये आणि सर्वांना ऑनलाईन शिक्षणाची मोफत संधी उपलब्ध व्हावी यासाठी VOPA संस्थेने "VSchool" या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे 1 ते 10 वी चा अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिला आहे.
त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी हा मेल लिहित आहोत.
या वर्षी कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे शालेय शिक्षणाचे काय करायचे? असा प्रश्न उभा राहिला.
ऑनलाईन शिक्षणासाठीचे सर्व उपलब्ध पर्याय वापरून झाल्यावर आम्हाला असे लक्षात आले कि,
1. ऑनलाईन शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण apps ची किंमत भरमसाठ आहे.
2. मोफत उपलब्ध apps सुमार दर्जाचे आहेत.
3. ऑनलाईन शिक्षण म्हणजे व्हिडिओ पाहणे अशी रचना बहुतेक ठिकाणी आहे. त्यामुळे स्क्रीन टाईम प्रचंड वाढतो.
4. मराठी माध्यमासाठी खूप कमी apps उपलब्ध आहेत.
यामुळे आपणच असा प्लॅटफॉर्म सुरु करायचे ठरवले.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म ची लिंक - http://edu.vopa.in

प्लॅटफॉर्मला महाराष्ट्रभरातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांचे अभ्यास करतानाचे फोटो, अभिप्राय, धन्यवाद देणारे ई-मेल, आम्हाला पाठवत आहेत.
जिथे सर्वांकडे मोबाईल नाहीत तिथे विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करत आहेत.
Google Analytics च्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यात व्हीस्कूलला 5 लाखाहून जास्त वापरकर्त्यांनी 60 लाखाहून अधिक पेज व्हिजिट्स केल्या आहेत आणि हा आकडा वाढतच जात आहे.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये –
• सर्वांसाठी मोफत उपलब्ध
• मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी
• प्राथमिक इयत्तांसाठी – पालकांनी घरी कसा अभ्यास घ्यावा यासाठी मार्गदर्शन
• शिक्षकांनीच निर्मिती केली आहे
• स्क्रीन टाईम कमी राहील याची दक्षता
• फक्त व्हिडिओचा भडीमार नाही, इतर साधनांचा वापर
• शिकण्याची प्रेरणा आणि कुतूहल निर्माण होईल अशी मांडणी
यासाठीचे Android Application तयार करण्याचे काम देखील सुरु आहे.
या काळात बीड आणि पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव आला. शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी 150 हून अधिक स्वयंसेवक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण करता आले. अभ्यासक्रम तयार करणे, निधी उभारणे, अनेक शिक्षक आणि स्वयंसेवकांशी जोडून घेणे, सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे प्रसिद्धी अशा अनेक पातळ्यांवर एकाच वेळी काम करावे लागत आहे.
हे काम पुढे नेण्या करिता आपल्या सहकार्याची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे.
आपण कसे सहकार्य करू शकता?
१. Volunteer - शैक्षणिक साहित्य निर्मिती
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कंटेंट तयार करणे. (तुम्ही आहात तिथून मदत करू शकता)
लेसन प्लान तयार करणे, व्हिडीओ तयार करणे, एडीट करणे, इ.
२. Internship
किमान एक महिना वोपा टीम सोबत काम करणे, यात खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
३. Donation - आर्थिक सहाय्य
हे काम पुढे नेण्यासाठी आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. मदत करण्यासाठी इथे क्लिक करा.
४. वस्तूरुपात मदत -
लॅपटॉप्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा व माइक, कलर प्रिंटर, टेबल व खुर्च्या.
यापैकी काहीही मिळवून द्यायला मदत करू शकता.
५. Partnerships - व्यक्ती/ संस्था/ शासन यांच्याशी जोडून देणे
शिकवण्यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती, आर्थिक मदत, वेबसाईट, application आणि इतर तांत्रिक बाबीमंध्ये मदत करण्यास इच्छुक व्यक्ती व संस्थांशी जोडून देणे.
सध्या सर्वात जास्त खर्च हा Website, Application development and maintenance यासाठी होत आहे. त्याकरिता एखाद्या सॉफ्टवेअर कंपनी सोबत जोडून घेता आले तर उत्तम.
६. Publicity - प्रचार व प्रसिद्धी
सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी साहित्य तयार करणे आणि सोशल मिडियावर शेअर करणे.
ह्या काळात टीम देखील वाढली आहे. सुधीर, प्रियांका, श्वेता आणि राहुल जॉईन झाले आहेत. VOPA च्या अहमदनगर येथील ऑफिस मधून आम्ही काम करत आहोत.
सध्या या कामासाठी पुणे येथून काम करू शकणाऱ्या दोन व्यक्तींच्या शोधात आहोत. त्यासाठीचा वेगळा इमेल तुम्हाला पाठवला आहे.
येत्या काळात आपल्याला या कामाबद्दल पुढील अपडेट्स कळवत राहू.
आमच्या सोशल मिडिया पेजला नक्की भेट द्या.
Facebook | Instagram | Youtube | LinkedIn
आपले विनीत,
प्रफुल्ल, ऋतुजा, आकाश
Email: contac...@gmail.com
Website: https://vopa.in