Invitation_Bhau Navrekar Smrutidin_Nashik

1 view
Skip to first unread message

Mukta Navrekar

unread,
Jan 7, 2020, 6:21:05 AM1/7/20
to Nirman Coordination Team, nirman-north...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, dry_land...@googlegroups.com
नमस्कार मंडळी 
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या भाऊ नावरेकर स्मृतिदिनाचं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. 

यावर्षी या कार्यक्रमात आपण आकाश बडवे यांचे जीवन आणि कार्य समजून घेणार आहोत. मूळच्या नाशिकच्या आकाश यांनी बिट्स पिलानी इथून इलेक्ट्रोनिक इंजीनियरिंग आणि एम एस सी अशी दुहेरी पदवी उत्तम गुणांनी संपादन केली. त्यांनी पी एम आर डी एफ या केंद्र सरकारच्या फेलोशिप द्वारा छत्तीसगढ मधील दांतेवाडा या आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करणे पसंत केले. फेलोशिप नंतरही शेती आणि शेतकरी हेच कार्यक्षेत्र निवडून आज तेथील ५०००० शेतकऱ्यांचं नेटवर्क प्रस्थापित केलं आहे. संपूर्ण सेंद्रिय शेतीच्या या मॉडेलमुळे भरघोस उत्पादन आणि मार्केट दोन्हीची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नातून दांतेवाडा हा जिल्हा सरकारने अधिकृत सेंद्रिय शेती जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. आकाश हा निर्माणच्या चौथ्या बॅचचा शिबिरार्थी देखील आहे. 

विषमुक्त व स्वावलंबी अन्नाचा हमखास मार्ग असं ज्याचं वर्णन करता येईल त्या 'गच्चीवरची शेती' या संकल्पनेला जीवनाचे मिशन मानणाऱ्या व त्यासाठी नवनवीन प्रयोग आणि प्रयत्न करणाऱ्या संदीप चव्हाण यांचा सत्कार हाही या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. 

कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : १२ जानेवारी २०२० (रविवार)
वेळ : दुपारी ३ ते ६
ठिकाण : निर्मल ग्राम निर्माण केंद्र गोवर्धन, (गंगापूर), नाशिक  
अधिक माहितीसाठी : ९४०५१७७१०६ / ०२५३२२३१५९८


आपली,
मुक्ता 

--

जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"
Reply all
Reply to author
Forward
0 new messages